Skip to main content

मी माझ्यातच संतुष्ट आहे.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 08/02/2009 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
"माझ्या अशुद्ध बोलण्याच्या पद्धतीमुळे माझ्या व्यक्तिमत्वात काही फरक झालेला नाही.मला वाटतं मी कोण आहे त्याची व्याख्या मीच करावी आणि माझ्या जीवनात काय कारवाई करावी ते पण मीच ठरवावं." मी एकदा एका लायब्ररीत पुस्तकं चाळीत बसलो होतो.दोन तीन पुस्तकं मला आवडली आणि वाचायला न्याविशी वाटली.ती घेऊन मी काऊंन्टरवर गेलो.काऊंटरवर बसलेली व्यक्ति मला जरा वयाने लहान वाटली.मी कुतुहलाने त्याला विचारलं, "तू शाळेत शिकत असशिलच."तो हो म्हणाला.

घेतली ओठात आम्ही

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी रविवार, 08/02/2009 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
घेतली ओठात आम्ही पाकिटातली त्या सिगारेट ती ठाउक हे होते जरी की छातीस हो जाळेल ती जाळणे हे काम तिचे तक्रार नाही आंम्हास हो घेतली होती ओठात कौतुक त्याचे आंम्हास हो ठसका जरी बसला असा पण हौस नव्हती भागली फिरुनी पुन्हा ओठात आंम्ही सिगारेट होती घेतली आमची प्रेरणा :- घेतली मिठीत आम्ही
Taxonomy upgrade extras

सुंगटांची हुड्डामेथी (कोळंबीची उडीदमेथी)

लेखक धनंजय यांनी रविवार, 08/02/2009 07:48 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ पाककृती अमिताबाय सलत्री यांची माझ्या सोयीनुसार बदलली आहे: - - - कोळंबी - अर्धा किलो तांदूळ - एक मोठा चमचा उडदाची डाळ - एक छोटा चमचा मेथी - एक छोटा चमचा एक मोठा कांदा ओले खोबरे - एक वाटी (खोवलेल्या खोबर्‍याऐवजी सुक्या खोबर्‍याचा बारीक कीस मिळतो, त्यात नारळाचे दूध डब्यात मिळते, ते घातले.) धणे - एक मोठा चमचा मिरी - पाच कण सुक्या लाल मिरच्या - १२ (मी चार घेतल्या - अमेरिकेत वाढलेल्यासाठी बनवायचे होते!) घट्ट चिंचेचा कोळ - १ छोटा चमचा आणखी तीन मोठे कांदे - - - १.

घेतली मिठीत आम्ही

लेखक पुष्कराज यांनी रविवार, 08/02/2009 06:09 या दिवशी प्रकाशित केले.
घेतली मिठीत आम्ही मेघातली त्या वीज ती ठाउक हे होते जरी की आंम्हास हो जाळेल ती जाळणे हे काम तिचे तक्रार नाही आंम्हास हो घेतली होती मिठीत कौतुक त्याचे आंम्हास हो चटका जरी बसला असा पण हौस नव्हती भागली फिरुनी पुन्हा मिठीत आंम्ही वीज होती घेतली
Taxonomy upgrade extras

लेखक पुष्कराज यांनी रविवार, 08/02/2009 06:06 या दिवशी प्रकाशित केले.
घेतली मिठीत आम्ही मेघातली त्या वीज ती ठाउक हे होते जरी की आंम्हास हो जाळेल ती जाळणे हे काम तिचे तक्रार नाही आंम्हास हो घेतली होती मिठीत कौतुक त्याचे आंम्हास हो चटका जरी बसला असा पण हौस नव्हती भागली फिरुनी पुन्हा मिठीत आंम्ही वीज होती घेतली
Taxonomy upgrade extras

कोणास ठाऊक कसा पण्...विडंबनात उतरला पिडा...

लेखक शितल यांनी शनिवार, 07/02/2009 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
कोणास ठाऊक कसा पण विडंबनात उतरला पिडा पिडाने हसविले जाम घेऊन मालवणी ताल मिपाकर म्हणाले वा वा ! पिडा म्हणाला ...... ब्रॆण्ड हवा ! कोणास ठाऊक कसा पण विडंबनात उतरला पिडा पिडाने घेतली बडती विडंबक ह्याला आता म्हणती तात्या म्हणाला छान छान ! पिडा म्हणाला खाऊक पान हवा ! कोणास ठाऊक कसा पण विडंबनात उतरला पिडा पिडाने मारली चपटी आणी पडला खाल्यावरती तात्या म्हणाला जिओ जिओ पिडा म्हणाला गाणा गायो !

मी बोचले म्हणालो

लेखक केशवसुमार यांनी शनिवार, 07/02/2009 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
मी बोचले म्हणालो, ती कोणत्या ठिकाणी? मी हे तुला कसे पण सांगू मिठीत राणी ठरवून काल लुटले मॉलात बायकोने आधी तिला कशाला न्यावे अशा ठिकाणी! गुंगीत राहतो मी सुस्तीत वागणारा असते सदैव पिउनी स्वारी घरी उताणी! असतो खुशीत तेव्हा घेतो मजेत झुरके जातो हवेत तेव्हा होते बधीर वाणी होणार काय ह्याचे आहे जगास पत्ता (हा ढोसतोय दारू समजून रोज पाणी ) खोड्या अशा कवींच्या का काढतोस "केश्या"? लिहिती कधी तरी हे असली सुरेल गाणी - केशवसुमार (सुवर्णमयींच्या ''मी बोचलो म्हणाले' या गझलेवर आधारित)

तु राजा की राजदुलारी मै....

लेखक दशानन यांनी शनिवार, 07/02/2009 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
तु राजा की राजदुलारी मै.. सिर्फ लंगोटे आला सुं ! भांग रगड के पिया करु....मै.. मुंडी सोटि याआला सुं ! तु राजा की छोरी से... मेरे एक भी दासी दास नही ! साधुसा आले ओढण आली म्हारा कंबल तक पास नही ! नवीन चित्रपट ओय लकी लकी ओये मधील हे एक गाणं ! हरयाणवी लोक संगितावर आधारलेले हे एके नितांत सुंदर गाणे आहे... ! हरयाणवी शब्दांमुळे ह्या गाण्याची गोडी एकदम अप्रतिम वाढते... ! एकदा प्ले करा.... तुम्हाला देखील आवडेल नक्कीच !!

मैने प्यार किया

लेखक बेसनलाडू यांनी शुक्रवार, 06/02/2009 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमाच्या बाबतीत तर मला पाडगावकरांचं 'तुमचं आमचं अगदी सेम असतं', हे मुळीच पटत नाही. म्हणजे प्रत्येकाचं प्रेम त्याच्या किंवा तिच्यासाठी इतकं जिवलग आणि खास असतं की ते इतर कुणासारखं होऊच शकत नाही. मग त्यात फोनवरचं तासन् तास बोलणं असो; समुद्रकिनार्‍यावर एकत्र हिंडणं, एकत्र खाल्लेली भेळ किंवा भुट्टा किंवा 'कच्ची कैरी'चा गोला असो; की क्लासला ज़ातो/ते आहे सांगून बागेत भेटणं असो. सगळं अगदी स्पेशल आणि इतरांपेक्षा वेगळंच असतं.

अजितकाका

लेखक संदीप चित्रे यांनी शुक्रवार, 06/02/2009 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
“बिरजू महाराज, प्रभा मराठे, रोहिणी भाटे या कलावंतांचा अजित सोमण लाडका बासरीवादक होता” esakal.com वाचताना, वर दिलेल्या ओळीतला 'होता' हा भूतकाळ दर्शवणारा उल्लेख खटकला. मनात शंकेची पाल चुकचुकली…. पण म्हटलं, “हॅ ! तसं काही नसेल; आता अजितकाका कार्यक्रमांतून वाजवत नाहीत म्हणून तसं लिहिलं असेल. आपल्याला अजितकाकांनीच तर फोनवर दोन-तीन आठवड्यांपूर्वी सांगितलंय की ते आता कार्यक्रमांतून वाजवत नाहीत म्हणून !” दुर्दैवाने काही शंका खऱ्या ठरतात !