लेखकसागरलहरीयांनी रविवार, 22/02/2009 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
हं... इथे खण....
खणत रहा ...हा भूतकाळ आहे ....
तो तुला खणायचाय...
खणताना निघतील अवशेष
आठवणिन्चे... यशाचे .. चुकांचे... हवेसे... नकोसे
लक्षात ठेव, .... अवशेषामधे मन गुंतवायचं नसतं.....!
पुढे लागतील थडगी,
सोडून गेलेल्या आप्तांची... दगलबाज मित्रांची,
लक्षात ठेव, ... थडग्यांपुढे फुलेच ठेवायची..... मन नाही !
खण .... खणत रहा ......
खणता खणता संपेल सारं ..
थकून पाहशील अवती भवती ..
.... तहानलायस ..!
उतर .. या खोल भूतकाळाच्या गाभा-यात ..
शोध मूळ जाणीवेचा निर्मळ झरा..
आता या झ-यालाच वर्तमानकाळ बनव
अन् पडून रहा, ... या झ-याकाठी .. निपचित ...!
-- सागरलहरी
लेखकसागरलहरीयांनी रविवार, 22/02/2009 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
मुग्ध वेड्या चान्दणिचे , गीत हे हळुवार आहे
घाव लेवुन तव स्मृतींचे , मम मनी फुलबाग आहे...
हासणारे नेत्र माझे, अश्रुना आव्हान देती
आज दाटे या उरी हा, कोंडला नि:श्वास आहे ..
माळलेली तू फुले मज, गंधुनी मी धुंद होते,
कायेस या अजुनी तुझ्या रे, देहिचा घनगंध आहे ....
-- सागरलहरी
लेखकसागरलहरीयांनी रविवार, 22/02/2009 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
अभ्यागता तुझा सूर्य मला उसना दे,
खरंय की, तूच वाट चुकलेल्या पान्थस्था सारखा आलास,
आशा होती तुला
अंधारल्या माळावरच्या मिणमिणत्या कन्दिलाचीच फक्त ......
अरे पण माझ्या कड़े तर सूर्य होता !
अर्थात .. तुला हे ठाऊकच नाही म्हणा.
अरे, अनंत कालपटावर स्वतेजाची पखरण करणारा
माझा सूर्य .....
तो असंख्य जीवनांचा जनक !
त्या चन्डान्शुच्या प्रखरतेने निथळतानाही वाटे....
त्याचा अनादी जीवनांश तो किरणकरांनी
आम्हाला देतोय.
अभ्यागता ! पण हां इतिहास झाला.
आमचा सूर्यही आता मळल्यासारखा झालाय बघ.
वाटते कळिकाळपटाशी झुंजत तो श्रांत झालाय !
त्या हिरण्य गर्भावर चढलीत जळमटे ....
लेखकसागरलहरीयांनी रविवार, 22/02/2009 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
अंतीच्या कळान्चे | जिवाला लागीर |
सोसेना उशीर | काही केल्या ||
भयकारी चित्र | दिसते सर्वत्र |
घरदारा पुत्र | धूसरती ||
धुमस ही कंठी | नाही येत ओठी |
राहिल्या त्या गोष्टी | सांगायच्या ||
सांगितल्याविण | समजावे मन |
उतरावे ऋण | कसे आता ||
पिन्डाला वेढीन | गुज सुचवीन |
मग घास देइन | काक मित्रा ||
- सागरलहरी
लेखकराज-नितीयांनी रविवार, 22/02/2009 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी
पुण्याच्या सकाळ पेपरमधल्या "ग्राफिटी " हा प्रकार तुम्हाला परिचित असेलच. मी काही ग्राफिटी तयार केल्या आहेत, त्या अशा :
१. कुठल्याही अवघड गोष्टीच 'बाळंतपण' हे 'जीव' काढणारं असतं
२. टोपी घालायला 'डोकं' लागतं.
३. जागतिक मंदीची लाट सध्या ' तेजीत ' आहे.
लेखककिरण जोशीयांनी रविवार, 22/02/2009 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार व कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त 27 फेब्रुवारीला 'मराठी भाषा दिन ' साजरा होतोय. मध्यंतरी मराठी - अमराठी वाद खूपच रंगला. पण, झाले गेले विसरून जाऊन पुढे चालताना आपण अन्य भाषांवर राग काढण्याऐवजी मराठी दिन कसा साजरा करायचा यावर चर्चा करू. यासाठी तुमच्या कल्पना सूचवा...