करी ऑफ कॉन्स्पीरसी उर्फ कटाची आमटी
कटाची आमटी ही नाजूक पाककृती आहे.सरावानी जमते.बिघडली तर गुळवणी होते.या आमटीचा किचनमधून येणारा सुगंध आणि दरवळ हेच या आमटीचे आयएसओ ४१००० प्रमाणपत्र आहे.सौ.रामदास यांच्या सौजन्याने ही पाककृती येथे देत आहे.
साहीत्य : मसाल्यासाठी-जीरं ,लवंग ,दालचिनी,तेजपत्ता.
भिजवलेले कच्चे शेंगदाणे, खोबर्याचे पातळ काप खोबर्याचा तुकडा (भाजण्यासाठी)
काजू तुकडा (ऐपतीप्रमाणे),कढीपत्ता, तेजपत्ता, हिरव्या मिर्चीचे तुकडे,कोथींबीर, लिंबाएव्हढी चिंच,थोडासा गूळ.
कृती :
कट काढणे : पुरणासाठी चण्याची डाळ शिजवून घेताना त्यावर पांढरा फ