राम आणी वाली
आंतरजालावर बागडत असताना एका ठिकाणी प्रभु रामचंद्रानी वालीची हत्या करुन कसे अधर्म चरण वगैरे केले आहे ह्याची मनोरंजक कहाणी वाचायला मिळाली. त्यात सितेकडे केलेली अग्नीपरिक्षेची मागणी कशी अन्यायकारक वगैरे होती हे ही वाचायला मिळाले.
रामचंद्र हे आधी राजा असल्याने त्यांनी स्वत:चा आदर्श जनतेपुढे घालुन देण्यासाठी त्यांनी सितेकडे अशी अपेक्षा व्यक्त केली असावी काय ?
वाली वधाविषयी मात्र खुप बोलायची इच्छा आहे. खरेतर मागे मिपावर हा प्रश्न उपस्थीत झाल्याचे पुसटसे आठवते पण तेंव्हा भवतेक कंटाळ्यामुळे हे येव्हडे सगळे टंकले नाही. आज वेळ मिळाला आहे तर हा राम आणी वाली संवाद तुमच्या पुढे सादर करत आहेत.
मिसळपाव