कधी येणारगं तू सखये
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
संध्याकाळी वारा वाहता
मेघदूत नी गारा होत्या
मन माझे मग काहूरते
कधी येणारगं तू सखये
झाडावरचा राऊ मजला
हळुच घालतो शीळ स्वरांची
जाणुनबुजूनी माझ्याभोवती
आठवण करीतो तुझ्या सुरांची
रवीराज तो गहीवरलेला
सांजवेळी बहरत होता
मुक्तहस्ते तळ्याकिनारी
तुझा रक्तिमा वाटत होता
कोपरावरच्या वळणावरती
मोगराही बहरलाय
माझ्या वेड्या जिवाबरोबर
तो ही तुझ्यासाठी आतुरलाय
एक नभ जो जाई सुसाट
वाटे तयावर स्वार होउनी
मी यावे ऊडीनी अलगद
कुशीत तुझया एक क्षणिक
सरूनी जाते संध्याकाळ
तुझ्या आठवणित नकळत
मन माझे मग काहूरते
कधी येणारगं तू सखये
- अडाणि.
वाचने
1223
वाचनखूण
प्रतिक्रिया
1
अडाणि अडाणि म्हणता आणि सुंदर तराणी लिहिता.. मस्त !!
सखये