सी.ए.एंटरटेनमेंट ओपन अनलिमिटेड- २
लेखनप्रकार
मास्तरला प्रष्न पडला तात्याबा ना गाठावे तरी कसे. कधीही फोन केला की तात्या प्रतिक्षिप्त क्रियेत उत्तर द्यायचे. "मी आता बिझी आहे. शनिवार रविवार कधीतरी भेटु" करावे तरी काय? तात्यांचे बरेच उद्योग आहेत हे मास्तराना माहित होते. त्यात दिवस रात्र प्रार्थना, शेळी पालनाची भर पडली होती. जंगलात जाउन शेळीच्या जखमासाठी पाला गोळा करणे येरा गबाळांचे काम नाही. ह्या नादात तात्यानी तंबोरा वादनाचे क्लासेस तुर्तास बंद ठेवले होते. त्यामुळे देशी आणि आंग्ल युवतींची भलतीच कुचंबणा झाली होती.पण मास्तर पडला चिवट. त्याच्या फॉलो-अप ला कंटाळुन शेवटी तात्यानी भेटायची वेळ दिली.
रात्री ९ वाजता सुरु झालेली मिटींग सुमारे ४ तास चालली. त्याच सारांश खालील प्रमाणे,
तात्यांसमोर मास्तरांनी एक कल्पना मांडली. "बघा तात्या, मिपा सदस्य संख्या ३००० पोचली आहे. सर्व एक कुटंबासारखे नांदत आहेत. लोकप्रियतेबद्दल प्रष्नच नाही. सरासरी प्रतिसाद संख्येचा विक्रम होतो आहे. आपण सर्वानी एकत्र येउन एक कंपनी काढु. उसा मधील एका प्रसिद्ध लेखिकेने सद्य परिस्थीतीचे भाकित ५० वर्षापुर्वी केले होते. त्यात तीने म्हटले होते, "कितीही मंदी आली तरी एंटरटेनमेंट इंड्स्ट्री केव्हाही फायद्यात रहाणार". त्या मुळे आपण कंपनीचे नामकरण करु आणि त्यात चित्रपट काढु.
तात्यानी काहीच प्रतिसाद दिला नाही. मास्तराना तात्याची सवय बरोबर माहित होती. कल्पना आवडली नसती तर त्यांनी लगेच नाही म्हटले असते.
सुमारे १० मिनिटानी तात्या म्हणाले. " मास्तर, कल्पना चांगली आहे. राबवायला हरकत नाही. पण भांडवलाचे काय? आणि कंपनीचा मालक कोण?
सर्व जण मालक. भांडवलाच्या गुंतवणूकी प्रमाणे मालकी हक्क. आणि नफ्याचा वाटा. सुमारे १० कोटीचे भांडवल उभे करणे मिपाकराना सहज शक्य आहे.-मास्तर
कंपनीचे नाव काय ठेवायचे- तात्या
सी.ए. एंटरटेनमेंट ओपन अनलिमिटेड्-मास्तर
चांगले नाव आहे-तात्या.
कसल्या प्रकारचे चित्रपट काढायचे- तात्या
तुर्तास एक मराठी, एक हिंदी, एक भोजपुरी . सर्व सोशल टाईप चे असतील. सद्ध्या कंपनीला एवढेच सोसल.-मास्तर
कुणाला फिमेल लीड मधे घ्यायचे? "कातरीना" मला लगेच डेट्स देईल. स्क्रिप्ट मधे विदेशी युवतीचा रोल असेल तर त्याची प॑ण व्यवस्था मी करेन्-तात्या लगेच प्रोड्यूसरच्या भुमिकेत शिर॑ले.
अहो तात्या म्हणुनच सर्व प्रथम तुम्हाला भेटलो आहे. मेन प्रोड्युसर तुम्ही. तुम्ही म्हणत असाल तर माझा अमेरिकेत एक मित्र आहे. सध्या "कॉमर्स कोचींग क्लासेस" सुरु केल्यापासुन गब्बर झाला आहे. मी सांगितले तर तो पण भांडवल गुंतवायला नाही म्हणणार नाही. बाकी इतर मिपाकर हातभार लावतीलच की.-मास्तर
बघु- तात्या (तात्या आजकाल बरेच निवळले आहेत - नाहीतर???)
इतर व्यवस्था कोण करणार. तुम्ही काय करणार. - तात्या
मी जातीने मास्तर असल्यामुळे 'ए.के. हंगल 'ची "दिवार "टाईप भुमिका मानधन न घेता करीन. आणि दोन लाख गुंतवीन- मास्तर
तात्या गालातल्या गालात हसले. ठीक आहे. सर्व कागदावर मांडुन परत एकदा भेटू.
चला मंडळी मला मदत करा ह्या प्रोजेक्टला. कोणाकोणाला कंपनीत आपले भांडवल गुंतवायचे आहे त्यांनी लगेच कळवावे. बहुतेक सर्व भुमिका मिपा गणगोत करणार असे ठरले आहे. तेवढाच बजेट वर लोड कमी. कोणाला कोणती भुमिका द्यावी हे इतरांच्या सुचनेने ठरवले जाईल. कमीत कमी ३ सुचना कराव्यात. कोण सद्स्य साधारण कुठल्या भुमिकेला शोभेल ह्यावर सुचना असाव्यात. ती देताना रेफरन्स म्हणुन पिक्चरचे नाव पण सुचवावे. दिग्ददर्शक,एडीटर, संगीतकार्,नृत्यदिग्ददर्शक, खलनायक, खलनायिका, सहनायक सहनायिका, छाया चित्रकार, मॉब सिन कलाकार ,फडका मारणारा पोर्या व इतर सर्व जागा भरायच्या आहेत. नाव सुचवताना मास्तर सोडला तर कोणावरही बिलो द बेल्ट वार नको. ज्यांना विनोदाचे वावडे आहे त्यांच्या वाट्याला जाउ नका. वादाने शीण आला असेल तर होउन जाउ द्या.
जाता जाता: मिपावर एक एक लय भारी आयटम आहेत. त्यामुळे चिंता नाही. सुरुवात मी करतो.
वाचने
8675
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
छान
भुमिका
In reply to भुमिका by विनायक प्रभू
स्टंट्स-
सुंदर
गटणे
नायक ज्या
"कॉमर्स कोचींग क्लासेस"
In reply to "कॉमर्स कोचींग क्लासेस" by रामदास
स्टो पीन
सी.ए.एंटरटे
In reply to सी.ए.एंटरटे by विसोबा खेचर
पुन्हा
In reply to सी.ए.एंटरटे by विसोबा खेचर
मिपा
मी स्पॉट
In reply to मी स्पॉट by घाटावरचे भट
काय हो
In reply to काय हो by ३_१४ विक्षिप्त अदिती
मास्तरांन
In reply to मी स्पॉट by घाटावरचे भट
भटोबा अन
खूपच बिज्जी!
In reply to खूपच बिज्जी! by अघळ पघळ
जाळ
In reply to जाळ by विनायक प्रभू
वादाने
In reply to जाळ by विनायक प्रभू
जाळ
मास्तरला
वा.. प्रभूसर
म्या
१ला भाग ???
In reply to १ला भाग ??? by सुचेता
१ला भाग
कातरीनाचे "खजूर"
आपली पण तय्यारी आहे.
फडका मारणारा पोर्या...
कलंत्री साहेबांची भूमिका
सुट्टी