<अस्वस्थ मन!>
प्रेरणा: प्रेरणा यांची "मन" ही कविता..
काय करु आज विडंबनाची हुक्की आली.. ह. घ्या.
कधी सकाळी उगाच पोट दुखुन येतं..
टाकीतलं पाणी नेमकं तेव्हाच आटुन जातं..
पाण्याची जाण, फक्त, कोरडा नळ देतो!
तेव्हा फक्त टिश्यु पेपर मदत करु पाहतो..
थरारलेल्या क्षणांमागे मन जाऊन लपतं..
ते क्षण सरले की मग खुद्कन हसतं!
काल काय खाल्ले मन पुन्हा उकलू पाहतं..
पुन्हा असे खायचे नाही, वेडं, शपथ घेउन जातं!
भरलेल्या ताटावरती पुन्हा फिरून येतं..
थरारलेले क्षण पुन्हा विसरुन जातं..
Taxonomy upgrade extras
मिसळपाव