Skip to main content

(देवाने मुलींना अस का बनवलं?)

लेखक अनामिक यांनी शनिवार, 28/03/2009 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा ********************************* देवाने मुलींना अस का बनवलं? की बघताच मन पत्येकीवर बसावं सगळ्याच मला हव्याहव्याश्या वाटतात पण तिने कोणा दुसर्‍याच्याच गळ्यात का पडावं? कुणाचे डोळे, तर कुणाचे ओठ प्रत्येकीचा काहीतरी वेगळाच गुण दरिद्री मेलं मन, एकीवर बसत नाही पाहताच त्यांना वाजते हृदयात धून कुणी हसून आपलंसं करतं कुणी लाजून हृदयात शिरतं प्रत्येकीची खुबी निराळीच असते मग आपली निद्रा कुठे आपल्याजवळ उरते कुणी गुलुगुलू बोलून गार करतं कुणी नुसत्या नजरेनेच वार करतं किती अदा त्रासवण्याच्या असतात मन हे वेडं प्रत्येक नखर्‍यात फसतं सगळ्याच मुली कमाल क
Taxonomy upgrade extras

डरना मना है

लेखक मराठमोळा यांनी शनिवार, 28/03/2009 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
मी कॉलेजात असतानाची गोष्ट. अभियांत्रिकीच्या तिसर्‍या वर्षाच्या परिक्षेचा शेवटचा दिवस. जून महिन्याचा दुसरा आठवडा. माझे दोन्ही सिनिअर रुम पार्टनर आदल्या दिवशीच परिक्षा आणी त्यानंतरची पार्टी संपवुन घरी गेलेले. माझी एक तोंडी परिक्षा बाकी असल्याने अजुन दोन दिवस थांबणे भाग होते. त्याचबरोबर रुम बदलायची असल्याने पॅकिंग करायचे होते आणी वस्तु दुसर्‍या रुमवर हलवायच्या असल्याने घरी जाता येत नव्हते. माझे मुंबईचे मित्र दोन दिवसांसाठी घरी निघुन गेल्याने मी एकटाच उरलो होतो. संध्याकाळी ५:३० ला परिक्षा संपल्याची घंटा वाजली आणी सगळेजण खुष होऊन एकमेकाना शुभेच्छा देऊन घरी जाण्याच्या तयारीला लागले.

आता नको

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शनिवार, 28/03/2009 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
भावनांचे पसारे खुप झाले हे असे वेडावणे आता नको ... ! वळणावर त्या रेंगाळलेल्या आठवांची साथ आता नको ... ! हृदयात तू कोंडलेल्या सखे सुखांचा गुदमर आता नको ... ! चल सखे स्वप्न स्वप्न खेळु वास्तवाचा धाक आता नको ... ! हरवले स्वर ते सारे आता हुरहुर मारव्याची आता नको ... ! त्या तिथे पलिकडे .., ते चित्र फसव्या सुखाचे आता नको ... ! चल सखे पैलतीरी जावू मोह ऐलतीराचा आता नको ... ! विशाल

(देवाने मिपाकरांना अस का बनवल ?)

लेखक दशानन यांनी शनिवार, 28/03/2009 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा ******************* देवाने मिपाकरांना कंपुबाज का बनवल? माझे लेख बघताच प्रत्येकजण माझ्यावर चिडायच सगळ्यांनाच लेख नकोनकोसे वाटायचे मग ५० प्रतिसाद भलत्याच कोणा एकाच्याच लेखाला का पडायचे? कोणाचे सहमत, तर कोणाचे पुलेशु प्रत्येकीची काहीतरी वेगळीच गुणगुण दरीद्री मेली मलाच प्रतिक्रीया देत नाही पाहताच वाजु लागते कामत असल्याची धुन कोणी विडंबुन नकोस करत कोणी बोंबलत खवत शिरत प्रत्येकीची खरड निराळीच असते मग आपली इज्जत कुठे आपल्याजवळ उरते कोणी खरडून गार करत कोणी स्कॅन करुन वार करत किती अदा त्रासवण्याच्या असतात मन हे वेडे प्रत्येक प्रतिसादाला फसत

देवाने माश्यांना अस का बनवल ?

लेखक मूखदूर्बळ यांनी शनिवार, 28/03/2009 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
देवाने माश्यांना अस का बनवल? की बघताच मन पत्येकीवर चिडायच सगळ्याच मेल्या नकोनकोश्या वाटायच्या मग कोणा एकाच्याच ताटात का पडायच?
Taxonomy upgrade extras

ताई आणी दादा

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 28/03/2009 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
दादा :- या या या , या ताई... ताई :- नमस्कार दादा. कसा आहेस ? दादा :- मी अगदी मनसे मजेत आहे, तु कशी आहेस ? आज अचानक इकडे कसे काय येणे केलेस ? ताई :- अरे दादा, आज गुढीपाडवा, तुला आणी तुझ्या पक्षाला सुयश आणी किर्ती मिळो आणी तुझा पक्ष खुप मोठा होवो अशा शुभेच्छा द्यायला आलिये मी. दादा :- खरच गहिवरुन आले बघ, तुमच्या सारख्यांचे पाठबळ खुप मोलाचे वाटते. ताई :- अरे वरचेवर भेटत नसलो आणी तु आता घर सोडून गेलास म्हणुन काय झाले ? मी मनानी कायम तुझ्याच मागे उभे होते.

अविस्मरणीय वासोटा!!!

लेखक सुवर्णा यांनी शुक्रवार, 27/03/2009 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
मी २ वर्षांपूर्वी वासोट्याचा trek केला होता, त्याचं वर्णन लिहिलं होतं. तेच मिपावर परत टाकतेय. आवडेल अशी आशा.. :) आम्ही officeमधल्या लोकांनी सातार्‍यापासून अवघ्या 35Km वर असणार्‍या वासोटा डोंगराचा trek केला. वासोट्याचा trek म्हणजे माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यातील सगळ्यांत जास्त आनंददायी event.. जसा एखाद्या टुकार cricket match मध्ये टुकुटुकु खेळणार्‍या batsmanचा चुकून six बसावा अगदी तसा.. तो एक क्षण, तो आनंद.. तो जल्लोष.. त्याच्यापुढे मग सगळं काही फिकं पडतं.. सगळं जग अचानक सुंदर वाटू लागतं.. सगळ्या काळज्या, चिंता अचानक गळून पडतात आणि मस्त नवीन पालवी फुटते.. उमेदीची.. उत्साहाची.. मस्त!!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या स्क्रीनसेव्हरचे प्रकाशन

लेखक सागर यांनी शुक्रवार, 27/03/2009 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो, आज गुढीपाडवा.... चैत्र शुद्ध प्रतिपदा , शके १९३१ (२७ मार्च २००९) छत्रपती शिवराय म्हणजे अवघ्या महाराष्ट्दैवत आराध्य दैवत. तर अशा या आराध्याच्या चरणी पुण्यातील संगणक सॉफ्टवेअर कंपनी संकेतस्थळ.कॉम च्या सौजन्याने छत्रपतींच्या जीवनावर आधारीत अशा अनेक उपक्रमांची सुरुवात करण्याकरिता शिवमुद्रा.कॉम (http://www.shivamudra.com/) हे संकेतस्थळ आकारास आले आहे. हे संकेतस्थळ छत्रपतींच्या पुण्यतिथीच्या दिवशी सुरु करण्याची योजना आहे. या संकेतस्थळाने सुरु होण्यापूर्वीच शिवाजी महाराजांवर मराठीतील पहिलाच स्क्रीन-सेव्हर प्रकाशित केला आहे.

दि ड्रॉईंग्ज इन बोरिंग ट्रेणिंग !!

लेखक टारझन यांनी शुक्रवार, 27/03/2009 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स !! , णव्या जॉब ला जॉईन झालो .. गेले आठवडा झाले ट्रेणिंग णावाचा एक माहा बोरिंग कार्यक्रम चालू आहे .. अस्मादिक जरा दिडशहाणे असल्याने त्यांना कसल्याही ट्रेणींगची गरज वाटत नाही ... हे आपल्यासाठी नाहीच असे समजून अस्मादिक झोपा झोडणे , कमेंट पास करणे , विंडोज स्पायडर (पत्त्यांचा गेम) खेळणे .. इत्यादी कामे करून बाकी पेंगू लागलेल्या पब्लिक्स ला चैतण्य देण्याचं एक मोलाचं काम देखिल करतात ! अशाच एका बोरिंग सेशण मधे हि कलाकृती संगणकावर (एमेस पेंट) खरडण्यात आले !~~! अर्थात टाईमपास आहे ..