Skip to main content

माझी गादी

लेखक निखिल देशपांडे यांनी रविवार, 03/05/2009 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
(हा एक अतिशय फालतु लेख आहे त्या मुळे वाचणार्‍यांनी स्वः जवाबदारीवर वाचावा.) मित्रांनो ही कथा आहे एका गादीची. मला वारसाहक्काने मिळालेल्या गादिची. गेल्या काही वर्षापासुन ह्या गादिवर हक्क सांगणार्‍या लोंकामधुन आता फक्त माझा ह्या गादीवर हक्क आहे ह्याचा आनंद काहीतरी वेगळा आहे. ह्याच गादीसाठी आमच्या घराण्यात अनेक वेळा भांडण तंटे झाले. तर अशीही आमची गादी. काय रे कोण म्हणतोय पानाची गादी म्हणुन.

(पाऊस .....कळलांय का?)

लेखक मराठमोळा यांनी रविवार, 03/05/2009 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : उदय सप्रे यांची मोठी कविता मुसळधार पावसामधे दारु पिऊन चिखलात कधी लोळलांय का? मद्याबरोबर चखणा म्हणुन लसुण कधी तळलाय का? वाटेवरच्या मुलीची कधी छेड काढावी असा किडा वळवळलाय का? तिची छेड सोसवेना म्हणून तिचा धिपाड्ड भाऊ खवळलांय का? थरथरणार्‍या आवाजात ईंटरविव्यु मधे अचानक धीर कधी गळलाय का? भरभरुन उत्तरे दिली तरी ,त्यातून नेमका तुमचाच अर्ज फेटाळलाय का? दिवसभर अरबट चरबट खाउन पोटात अचानक डुचमळलय का? आणी तेव्हाच नेमके घरापसुन दुर म्हणुन तुम्ही कळवळलाय का? तारुण्याच्या उंबरठ्यावरची कूस अकाली म्हातारपणाकडे करून वळलाय का? ' बालपण ते तारुण्य ' ह
Taxonomy upgrade extras

बेवफा... एक वेगळी मिश्र गझल ( हिंदी - मराठी )

लेखक उमेश__ यांनी रविवार, 03/05/2009 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
आ गयी वो आज आखिर, हाल मेरा देखने... मी तिला धाडीत होतो, सारखी आमंत्रणे... देख लू इकबार तुझको, ये तमन्ना थी मेरी; पाहुनी तुजला सखे, हे श्वास माझे स्पंदले... आज भी मेरे लबोंसे, कुछ बयाँ ना हो सका; आसवांना पूर आला, शब्द माझे संपले... बेवफा से पूछता हू, क्या खता मुझसे हुई? का सखे तू टाळले, माझ्या मनाचे चांदणे... तू जफा दे या जहर दे, ये तुझे हक़ है सनम; शक्य नाही हे तुला, या भावनांना जाळणे...

वक्ता दशसहस्त्रेषु हरपला!

लेखक क्रान्ति यांनी रविवार, 03/05/2009 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
Ram Shewalkar राम शेवाळकर यांचं हृदयविकारानं निधन! एक थोर साहित्यिक, वक्ता, संतसाहित्याचा प्रगाढपंडित आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्व आपल्यातून गेलं आहे. मिपा परिवारातर्फे भावपूर्ण आदरांजली.

पाऊस .....कळलांय का?

लेखक उदय सप्रे यांनी रविवार, 03/05/2009 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस कळलाय का? मुसळधार पावसामधे भिजून तुमचा शाळेचा गणवेष मळलांय का? बालपणीच्या सखीच्या केसांत मोठेपणी गजरा माळलांय का? निसरड्या वाटेवर घसरून कधी पायाचा अंगठा भळभळलांय का? तुमच्या वेदना सोसवेनात म्हणून तिचा जीव तळमळलांय का? थरथरणार्‍या ओठातील तिची ती 'हाय्' डोळ्यातून अश्रू होऊन गळलाय का? भडभडून बोलणे झाले तरी ,त्यातून 'प्रेम' हा शब्द अचूक गाळलाय का? तिचा बालपणीचा निरागस भाव गाली लज्जा होऊन ओघळलाय का? भातुकलीतली नवरी खरी व्हावी इतके तुम्ही पाघळलाय का? तारुण्याच्या उंबरठ्यावरची कूस तिच्याचकडे करून वळलाय का? ' बालपण ते तारुण्य ' हा काळ तिची वाट पहाण्यात वाळलाय का? ऐन पावसा
Taxonomy upgrade extras

ताड गोळा / ताड फळ / ताडा गेदली

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 03/05/2009 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
ताड फळ / ताडा गेदली खालील लिखाण नक्की कोठे टाकावे त्याबद्दल माझा गोंधळ झाला. फोटु आहे म्हणुन कलादालनात टाकावी तर हे फोटू म्हणजे काही कला नाही. जनातलं, मनातलं मध्ये टाकावे तर त्या सारखे लेखन नाही. शेवटी खाण्याशी संबंधीत आहे म्हणून पाककृती या सदरात टाकावे असा विचार केला. पण मी या लेखात तर शेवटी प्रश्न विचारला आहे. म्हणून मी हा लेख काथ्याकूट मध्ये टाकला. आपण मला माफ करालच ही अपेक्षा. असो. कालपरवाच कामानिमीत्त सुरतेवर स्वारी केली. जातांना एका छोट्या गावात (जिल्हा डांग) आठवडे बाजार भरला होता. स्टेपनी चे पंक्चर काढायचे होतेच. त्यामूळे वेळ होता म्हणून सहज बाजारात फिरलो.

वेगळा होता.....

लेखक उदय सप्रे यांनी रविवार, 03/05/2009 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
वेगळा होता..... चांदण्याही त्याच होत्या पौर्णिमेच्या रातीला तुझ्या डोळ्यांतील आकाशाचा , रंग वेगळा होता ! एक होता सूर अपुला एक होती रागदारी तुझ्या गळ्यातून ठहरणारा , ढंग वेगळा होता ! न होतो विश्वामित्र मी , न होतीस अन् तू मेनका ती तपस्या पावली , माझा तपोभंग वेगळा होता ! फुलला कधीचा परसदारी धम्म पिवळा सोनचाफा मोकळ्या केसांत सजला , तो संग वेगळाहोता ! हाय् ! ओलेत्या तुझ्या कांतीस बिलगली ती उन्हे लाज गाली पाहणारा सूर्य , दंग वेगळा होता ! सोळा सहस्त्र नारींस होता एक त्राता अन् सखा प्रीत राधेचीच मोठी , तिचा श्रीरंग वेगळा होता !
Taxonomy upgrade extras

त की थ ?

लेखक नेटकिडा यांनी रविवार, 03/05/2009 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
ब-याचदा दक्षिण भारतीय शब्दांमध्ये (विशेषतः नाम) त, द चे इंग्रजीमध्ये स्पेलिंग लिहिताना TH वापरले जाते. उर्वरित भारतात शक्यतो फक्त T वापरले जाते व थ, ध साठी याच्या विरुद्ध. जसे की भारत चे स्पेलिंग दक्षिण भारतात BARATH असे लिहिले जाते, तर उर्वरित भारतात BHARAT असे लिहिले जाते. बंगळुरु मध्ये माझा एक मराठी मित्राचे , नाव कायम Mandhar असे लिहिले जायचे, तो खूप वैतागत असे. मग आम्ही प्रत्येक नाव, ज्याच्यात त किंवा थ आहे, त्याची वाट लावत असू.

गल्लीत नुसता गोंधळ.. दिल्लीत मुजरा नाहीच.

लेखक देवदत्त यांनी शनिवार, 02/05/2009 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
गेले २ आठवडे 'गल्लीत गोंधळ.. दिल्लीत मुजरा' ह्या चित्रपटाच्या जाहिराती पाहत होतो. काल हा सिनेमा प्रदर्शित झाला. आज वेळ जमून आल्याने हा सिनेमा पहावयाचे ठरविले. आज सकाळी फोनवरून सिनेमाचे तिकीट काढून ठेवले. वाटले आज शनिवार आहे, त्यात नवीन हिंदी चित्रपट आले नाहीत. म्हणून गर्दी असायची. (मराठी सिनेमाला गर्दी असते हे आता मान्य करण्यासारखे आहे.) तिकीटखिडकीवर जाता जाता पाहिले ४ पैकी ३ पडद्यांवर मराठी चित्रपट आहेत.

कोयना अभयारण्य

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शनिवार, 02/05/2009 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
तसे आम्ही अप्रवासी. पण मुलीच्या अक्षरनंदन शाळेतल्या मैत्रिणी व त्यांचे पालक यांच्यामुळे कोयनानगर अभयारण्यात जायचा बेत ठरला. उत्साही पालकांमध्ये मित्र असल्याने गाड्याबरोबर नळ्याची यात्रा म्हणुन आम्ही समाविष्ट झालो. आम्ही माणसाळलो हे पाहुन त्यांनाही आनंद झाला. इकडची काडी तिकडे करावी लागणार नसल्याने आमचीही ना नव्हती. हं आता वसंतव्याखानमालेतील एका मित्राचे व्याखान नेमके त्याच वेळेला असल्याने त्याचा बळी द्यायचा आम्ही ठरविले.(त्याचा म्हणजे व्याखानाचा मित्राचा नव्हे). पुण्याहुन नियोजित ट्रॆव्हलर गाडीने आम्ही पाच कुटुंबे सोळानग पहाटे साडेपाच म्हणता म्हणता साडेसहाला निघालो. आमी किन्नर शीट पकडली.