Skip to main content

अताशा असे हे मला काय होते

लेखक उपटसुंभ यांनी बुधवार, 30/09/2009 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
(संदीप-सलिलच्या चाहत्यांची क्षमा मागून) अताशा असे हे मला काय होते. कुण्या बारचे मद्य ओठात येते. कसा पाहता पाहता तर्र होतो. नशा केवढी 'एक' पेगात येते. कधी वीट येतो तुझ्या श्रावणाचा. कसा तांबडा रंग हो लोचनांचा. नको ड्राय डे रोज यावी गटारी, असा योग यावा सुरा प्राशण्याचा. असा ऐकु येतो सायरनचा इशारा.
काव्यरस

मध्यल्या वेळचे खाणे (ब्रेड रोल्स)

लेखक गणपा यांनी बुधवार, 30/09/2009 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
काल सकाळी न्याहारीचा ज्याम कंटाळा आला होता. (अहो स्वतः बनवाव लागत. आयत गिळायला मिळत आसेल आमची ना कशाला?) दुपारी ऑफिस मध्येपण फळांवर वेळ मारुन नेली. संध्याकाळी खास जेवण बनवायचा मुड न्हवता, त्यामुळे प्रयोगशाळेला कुलुप. (कोण रे तो म्हणाला सुटलोSSSS ? :W बर इतक्या लवकर सोडीन >:) ). रात्री ९ ला पोटात कावळे ओरडायला लागलेच. मग आता आयत्या वेळी काय कराव बर :? झटपट खिचडी करावी का? पण माझ्या जिभेचे चोचलेच फार त्यामुळे ती आयडिया रद्द [( . फ्रिज उघडुन कच्च्या मालाचा अंदाज घेतला. ब्रेड दिसला. काही तरी असेच मध्यल्या ( ?

Laptop साठि योग्य Wireless Innternet कुठले

लेखक राजा यांनी बुधवार, 30/09/2009 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
Laptop साठि कोणत्या प्रकारचे Wireless Internet योग्य आहे. क्रूपया जाणकारानि मार्गदर्शन करावे. DELL Inspirion 14 Vista SP1 Home Basic

आत्माराम की जय

लेखक हर्षद आनंदी यांनी बुधवार, 30/09/2009 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम मंड्ळी, हिंदु धर्माच्या मान्य तेनुसार "आत्मा" अमर असतो. प्रत्येक आत्मा एका देहाच्या मृत्युनंतर दुसर्‍या देहात प्रवेश करतो.. योनी कुठली का असेना. पण आत्म्याला मरण नाही..

उपहासात्मक जिवनाच्या उत्तेजनार्थ

लेखक टारझन यांनी बुधवार, 30/09/2009 01:38 या दिवशी प्रकाशित केले.
ढुस्क्लेमर्स : सदर लेखाचा कोणशीही वैयक्तिक संबंध नाही, संबंध वाटल्यास आपण स्वतःला जालिय हुच्चभ्रू म्हणून मिरवायला हरकत नाही. लेख पचायला अंमळ जड आहे , जमालगोटा जवळ ठेवल्यास वाचल्यानंतरचे त्रास टाळू शकता. जालावर फिरताना एक जड लेख वाचनी पडला , सहज विचार केला ... हे लोकं आपल्या घरी सुद्धा असंच बोलत असतील ? तर ? आणि कथा सुचली ! कथा काल्पनिक , पात्र वातावरणातली !!

`बाल'हट्ट

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 30/09/2009 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
""बाबा, मला जादूचे प्रयोग बघायचेत.'' आमची "लाडली लक्ष्मी' हट्ट धरून बसली होती. मध्यंतरी टीव्हीवर "छोटा चेतन,', "भूतनाथ'वगैरे पाहिल्यापासून तिची ही इच्छा अधिकच चिघळली होती. त्यामुळे गणपतीच्या आधीपासून अशा संधीच्या शोधात होतो. गणपतीत-नवरात्रात बरेच ठिकाणी जादूच्या प्रयोगांची जाहिरात होती, पण वेळ जमण्यासारखी नव्हती. अशा सार्वजनिक प्रयोगांना जाण्याबद्दल वावडं नव्हतं, पण तिथली सोय आणि व्यवस्था यांविषयी शंका होत्याच. एवढं करून गर्दीतून प्रयोग नीट दिसला नाही, तर सगळंच मुसळ केरात, असं वाटलं होतं. त्यातच अचानक गेल्या गुरुवारी "सकाळ'मध्येच जादूगार संजय रघुवीर यांच्या प्रयोगांची जाहिरात वाचली.

मायावतींचा असाही दलित उध्‍दार

लेखक मड्डम यांनी मंगळवार, 29/09/2009 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
दलितांच्‍या नेत्या असल्‍याचा आणि त्यांच्‍या उत्‍थानासाठी झटण्‍याचा दावा करणा-या बसपा सुप्रिमो मायावती सत्तेत आल्‍या. आणि अनेकांना आता सोन्‍याचे दिस येतील असे वाटले. मात्र झाले वेगळेच सत्तेवर आल्‍या-आल्‍या यापूर्वी त्रासदायक ठरलेल्‍या अधिका-यांच्‍या बदल्‍या, चौकशा आणि निलंबने यातच सुरूवातीची वर्षे घालविल्‍यानंतर आता बहन मायावतींनी पार्क उभारणीचे (स्‍वतःचे पुतळे उभारण्‍याचे) महत्‍कार्य हाती घेतले आहे. ते बरेच वादग्रस्‍तही ठरले. अनेक राजकीय पक्षांचा विरोध आणि न्‍यायालयाचा आदेश डावलून ते अजुनही सुरूच आहे. उत्तर प्रदेशचे राजकारण असूयेच्‍या पायावर उभे आहे. ही गोष्‍ट तर सर्वमान्‍यच आहे.