Skip to main content

वेडा

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी शुक्रवार, 04/12/2009 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
एक एस.टी 'स्टँडवरचा माणूस' मळलेली चड्डी , मळकट अन तेलकट असा लांबसा सदरा, विस्कटलेले केस, दोन पायात दोन वेगवेगळ्या चपला.... स्वता:शीच काहीतरी बोलत असतो, कधी झाड , कधी पक्षी ,कधी प्राणी कोणाबरोबरही तो बोलत असतो, प्रत्येकात तो स्वतःच्या कुठल्यातरी नातलगाला शोधत असतो... अन हो त्याच्याकडे एक चिंध्याचे गाठोडे पण आहे, त्यातल्या तो काही चिंध्या काढतो , काही फेकुन देतो , काही फाडतो, काहींच्या गाठी मारतो, काही नवीन शोधुन आणुन त्यात परत भरतो, हिच त्याची दिनचर्या.... त्याला सगळेच वेडा म्हणतात का कोणास ठावूक ? मीही स्वता:शीच बोलत असतो तासनतास.. कुठल्याही माणसात शोधतो की मी पण मित्र ,नातलग, प्रेम... मा

श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंवर पुन्हा दहशतवादी हल्ला !

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शुक्रवार, 04/12/2009 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई (ब्रेबॉन)- ता. ३ डिसेंबर (पीटीआय,एएफपी,एबीसी,ळक्षज्ञ) - दहशतवादी हल्ल्यांना सरावलेल्या मुंबईत आज पुन्हा दक्षिण मुंबईतल्या ब्रेबॉन स्टेडियमवर "क्रिकेट-ए-तोबा" ह्या भारतीय संघाने श्रीलंकन क्रिकेट संघावर हल्ला चढवला आणि पुन्हा मुंबईस (आणि अवघ्या क्रिकेटजगास) वेठीस धरले. ह्या हल्ल्यामध्ये श्रीलंकन क्रिकेटचे एटीएस प्रमुख मुथय्या मुरलीधरन ह्यांच्यासह सहा गोलंदाजांची गोलंदाजी शहीद झाल्याचे वृत्त आहे. सकाळी १० च्या सुमारास नुकताच "क्रिकेट - ए - तोबा" मध्ये निवड झालेल्या एम विजय ह्याने काही फैरी झाडल्या तेव्हा कमिशनर कुमार संगकारा ह्यांना पुढे यू घातलेल्या वादळाची कल्पना आली नाही.

कोपनहेगन परिषद

लेखक अमोल नागपूरकर यांनी शुक्रवार, 04/12/2009 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
पुढील आठवड्यात कोपनहेगनला भरत असलेल्या जागतिक हवामान बदल परिषदेविषयी माहिती हवी आहे. तसेच काल भारताने आपल्या कर्ब उत्सर्जनामधे २०२० पर्यन्त २०-२५ % कपात करण्याची घोषना केली आहे. त्याचे परिणम काय होतिल ?

(ते जीवच वेडे होते)

लेखक चेतन यांनी शुक्रवार, 04/12/2009 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांती ताईंची सुंदर गझल ते जीवच वेडे होते वाचुन आणि वर्षअखेर जवळ आल्याने नेहमीप्रमाणे अ‍ॅप्रायझल आठवलं : 8} ~X( असो.. ते जीवच वेडे होते, जुंपुन काम करणारे टेचात पुढे ते येती, मागे पुढे करणारे त्यांच्या न्यायाचा डंका, उंदरास मांजर साक्षी! मागावुन प्रमोशन घेती, काहिच न करणारे आपलेच आपण गाती पोवाडे मर्दुमकीचे, म्यनेजर म्हणवती स्वतःला, 'काडि'चे न कळणारे माहित जरी वरवरचे, आतून रिकामी घोडी, ते देखावे बघणारे, हे देखावे करणारे! नेहमीच पैदा करती, मुद्दाम पंक्ती घोळांच्या अन् पाठ थोपटुन घेती, "आम्हीच घोळ निस्तरणारे!" सुंदर रिसोर्
काव्यरस

मदत...मदत...SOS... SOS...वेब सर्व्हर होस्टिंग भारतात....

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 04/12/2009 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
मदत...मदत...SOS... SOS...वेब सर्व्हर होस्टिंग भारतात.... बंधूंनो (आणि भगिनींनो सुद्धा), आमच्या कंपनीचे काही वेब/ डाटा सर्व्हर्स भारतात शिप्ट करायचे आहेत. भारतात (मुंबईतच) कोणती ओरीजनल होस्टींग कंपनी आहे का की जिचे स्वत:चे डाटासेंटर आहे, NOC आहे? माझ्या माहितीत VSNL आहे पण ईतर कोणती कंपनी आहे? तिचा सपोर्ट कसा आहे? बँन्डविड्थ कशी आहे? डाऊनटाईम किती आहे? कोणी खरच भारतात होस्टींग केले आहे का? रिडन्डंसी आहे काय? मदत करा रे....मदत करा.... बॉस मागे लागलाय रे.....मदत करा रे....मदत करा.... SOS....SOS....SOS....SOS......

ते जीवच वेडे होते

लेखक क्रान्ति यांनी शुक्रवार, 04/12/2009 08:27 या दिवशी प्रकाशित केले.
ते जीवच वेडे होते, झुंजून रणी मरणारे झोतात पुढे आले ते, मागे झेंडे धरणारे त्यांच्या न्यायाचा डंका, उंदरास मांजर साक्षी! कैदेतुन निसटुन जाती, अक्षम्य गुन्हे करणारे आपलेच आपण गाती पोवाडे मर्दुमकीचे, म्हणती गजराज स्वतःला, मुंगीला घाबरणारे वादंग जरी वरवरचे, आतून सारख्या खोडी, ते देखावे बघणारे, हे देखावे करणारे! त्यांनीच विषारी जाती पैदा केल्या सापांच्या, अन् पाठ थोपटुन घेती, "आम्हीच साप धरणारे!" कित्येक पिढ्यांच्या नावे जमवून ठेवली माया, निश्चिंत, सुखी झाले ते; मरतील, मरो मरणारे!

दे दनादन....ईंडीयन अ‍ॅम्बेसडरला का उगाच?

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 04/12/2009 06:10 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच अक्षय कुमार आणि कत्रिनाची भुमिका असलेला "दे दनादन" हा चित्रपट पाहीला. हा चित्रपट म्हणजे कानफाडू पार्श्वसंगीत, टाईमपास गोंधळ आणि डोके न वापरता पहायचा चित्रपट आहे. त्याचे परिक्षण करायचा ह्या धाग्याचा उद्देश नाही. परंतु एक हीन आणि हिणकस घोडचुक त्यात केलेली आहे. ह्या सिनेमाची कथा जवळपास पुर्णपणे सिंगापूरच्या पॅन पॅसिफीक हॉटेल मधे घडते. त्यातील एक पात्र ईंडीयन अ‍ॅम्बेसडर लाम्बा दाखवले आहे. हा लाम्बा हॉटेलमधे चाललेल्या गोंधळात फसून स्वतःचे हसे आणि बदनामी करून घेतो.