मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दे दनादन....ईंडीयन अ‍ॅम्बेसडरला का उगाच?

अरुण मनोहर · · काथ्याकूट
नुकताच अक्षय कुमार आणि कत्रिनाची भुमिका असलेला "दे दनादन" हा चित्रपट पाहीला. हा चित्रपट म्हणजे कानफाडू पार्श्वसंगीत, टाईमपास गोंधळ आणि डोके न वापरता पहायचा चित्रपट आहे. त्याचे परिक्षण करायचा ह्या धाग्याचा उद्देश नाही. परंतु एक हीन आणि हिणकस घोडचुक त्यात केलेली आहे. ह्या सिनेमाची कथा जवळपास पुर्णपणे सिंगापूरच्या पॅन पॅसिफीक हॉटेल मधे घडते. त्यातील एक पात्र ईंडीयन अ‍ॅम्बेसडर लाम्बा दाखवले आहे. हा लाम्बा हॉटेलमधे चाललेल्या गोंधळात फसून स्वतःचे हसे आणि बदनामी करून घेतो. गैरसमजुतीमुळे एका वेश्येबरोबर पकडला जातो, छातीवर लाथा खातो वगैरे आणखीनही बरेच मुर्ख प्रकार सोसतो. कथेच्या घडामोडींसाठी हे पात्र ईंडीयन अ‍ॅम्बेसडरच असण्याची काहीच गरज नाही. असे असता, परदेशात भारताचा सर्वोच्च प्रतिनिधी असलेल्या ह्या पदाची अशी खिल्ली का उडवण्यात आली तेच कळत नाही. हे मुद्दाम केले आहे का ते कथा लेखक (असलाच तर), किंवा दिग्दर्शकच जाणे. परंतू विक्रम गोखलेंसारख्या सुजाण कलाकाराने अशी भुमिका करायला नको होती. किंवा करण्या आधी ते पात्र एखादा बिझीनेसमॅन आहे असे दाखवा अशी अट घालायला हवी. अजूनही वेळ गेली नाही. भारतीय सेन्सॉरने ह्यात जी काही चार दोन वाक्ये ईंडीयन अ‍ॅम्बेसडर असा उल्लेख करतात, ती बद्लून घेण्याची सक्ती करावी. दृष्य चित्रात अ‍ॅम्बेसडर असल्याची जाणीव कोठेच नाही, त्यामुळे हे सहज शक्य आहे. मिपाकरांची ह्यावरची मते काय आहेत, आणि ह्या साठी आपण काही करायला हवे कां हे जाणून घेण्यासाठी हा काथ्याकुट......

वाचन 9109 प्रतिक्रिया 0