Skip to main content

भ्रष्टाचाराची पाळेमूळे

लेखक सुनिल पाटकर यांनी बुधवार, 10/02/2010 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
भ्रष्टाचाराची पाळेमूळे भ्रष्टाचाराची पाळेमूळे आपल्या देशात आपल्या संस्कृती इतकी खोल रुजली गेली आहेत असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे.गल्ली पासून दिल्ली पर्यंत पसरलेल्या या समाजव्यवस्थेतील किडीला ` चलता है '’ म्हणत आपण अधिकच खतपाणी घालतो.भ्रष्टाचार करणार्‍यांची ही अफाट बुध्दिमत्ता त्यांनी योग्य कामी वापरली तर भारत महासत्ताक होण्यास फार वेळ लागणार नाही.

पुणे शहरातील पीएमपी बसमध्ये डावीकडील स्त्रीयांची राखीव जागा आणि बिचारे पुरुष, मुलगे आणि वृद्ध

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 10/02/2010 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
--पुण्याच्या पीएमपी बसेस मध्ये डावीकडची पूर्ण बाजू स्त्रियांसाठी रविवार वगळता आठवडाभर राखीव असते, असा "स्त्री-पुरुष" समानतेच्या काळातही कायदा आहे. (स्त्री-पुरुष समानता पण हवी आहे, आणि प्रत्येक ठीकाणी आरक्षण सुद्धा) पण याचा नेहेमी स्त्रीयांकडून गैरफायदा घेतला जातो तो असा- (१) समजा डावीकडील सीट रिकामी आहे, आणि तरीही स्त्री उजवीकडच्या रिकाम्या सीटवर बसते, तर हा सुद्धा हा कायदा टोडण्याचाच प्रकार आहे. कारण, डावीकडची सीट रिकामी असल्यावर सुद्धा मुद्दाम मुली/स्त्रीया/आडदांड बाया, उजवीकडेच बसतात. थोडे काही म्हटले तर उगाच सगळ्या प्रवाशांचा रोष पत्करण्याची भीती. कारण बहुतेक कायदे पुन्हा स्त्रीकडून.

मिपासंबंधी..

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 10/02/2010 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपकरहो, मिपासंबंधी कुणाची काही तक्रार असल्यास, कुणा सभासदाचे सभासदत्व गोठवले/रद्द करण्यात आले असल्यास त्या संदर्भात काही विचारणा असल्यास कृपया मला व्यक्तिगत निरोप पाठवावा. मी सवडीनुसार उत्तर द्यायचा अवश्य प्रयत्न करीन. या संदर्भात येथे जाहीर विचारणा करण्यास/लिहिण्यास मनाई आहे. तरी असे धागे अप्रकाशित केले जातील याची कृपया नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे, ही विनंती.. आपला नम्र, तात्या अभ्यंकर, मालक, मिसळपाव डॉट कॉम.

सतिश शेट्टी यांना मरणोत्तर सजग नागरिक पुरस्कार

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी बुधवार, 10/02/2010 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
७ फेब्रुवारी २०१० ला पुण्यात सजग नागरिक मंचा तर्फे सतिश शेट्टी यांना मरणोत्तर सजन नागरिक पुरस्कार देण्यात आला. संस्थापक विवेक वेलणकर यांनी पुरस्कारामागची भुमिका विशद केली. अण्णा हजारे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार होता परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते येउ न शकल्याने त्याच क्षेत्रातील एक खरेखुरे आयडॊल सातारा जिल्ह्यातील शिवाजी राउत यांच्या हस्ते देण्यात आला. सतिश शेट्टी यांचे एक धाकटे बंधु संदीप शेट्टी व अमेरिकेतुन आलेले दुसरे बंधु संतोष शेट्टी यांनी तो स्वीकारला. माहिती अधिकार क्षेत्रात सामाजिक काम केलेले सतिश शेट्टी हे भारताच्या दुसर्‍या स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्मा ठरले.

आज हिंदुस्तानका हर नौजवान अ‍ॅक्टर बनना चाहता है!

लेखक नीधप यांनी बुधवार, 10/02/2010 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली कधी कधी असे इमेल्स येतात की त्या वाचून मला जाम महत्वाची व्यक्ती झाल्यासारखं वाटतं. आणि नंतर त्यावर मी देणार असेन ते उत्तर आठवून मग मी महत्वाच्या जागी बसलेली सर्वात खडूस व्यक्ती आहे असंही वाटायला लागतं. शीर्षक आणि सुरूवातीच्या दोन ओळी तुम्हाला गोंधळवायला आणि लेखाची सुरूवात म्हणून बर्‍या आहेत. तेव्हा आता डायरेक्ट मुद्द्यालाच हात... गेले १० वर्षं माझा नेट संचार मुक्तपणे चालू आहे. मायबोलीसकट इतरही अनेक पोर्टल्स आणि आता स्वतःचा ब्लॉगही अश्या सर्व ठिकाणी माझा वावर असतो. या गेल्या १० वर्षात माझ्या आयुष्यात शिक्षण, करीअर इत्यादी संदर्भात अनेक उलथापालथी घडल्या.

बार्बेक्यू सॉस

लेखक स्वाती२ यांनी मंगळवार, 09/02/2010 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
बार्बेक्यू सॉस म्हटले की जीभेवर येते ती टिपिकल चव. काहिशी आंबट-गोड, काहिशी तिखट. टॉमॅटोचा बेस. आंबट पणा वाढवण्यासाठी विनेगर, गोडीसाठी ब्राऊन शुगर, कॉर्न सिरप, मध, काकवी वगैरे, मसाला म्हणुन कांदा-लसुण, मिरे,पाप्रीका आणि जोडीला तिखट. चव अजून वाढवायला वुस्टरशर सॉस, मोहरी कुट आणि शौकिन असाल तर चक्क थोडी रम किंवा विस्की देखील. माझ्या फाईलमधल्या दोन कृती देतेय.