Skip to main content

मदत हवी आहे...

लेखक चिऊ यांनी शुक्रवार, 09/04/2010 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
मला थोडी माहिती हवी आहे.... चेन्नई मधे रहाणे, खाणे कसे आहे, घर भाडे... ही माहिती कोणी देऊ शकेल का??

वाचने 2380
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

चेन्नई महाराष्ट्र मंडळ ची ही साईट पहा, थोडीफार माहिती नक्की मिळेल : http://mahamchennai.page.tl/ त्यांच्या गेस्ट हाऊसची माहिती व दर : http://mahamchennai.page.tl/MBT-_-Guest-House.htm चेन्नईला जाणार्‍यांचे बहुतांश प्रश्न व त्यांची उत्तरे : http://mahamchennai.page.tl/Chennai-FAQs.htm अरुंधती http://iravatik.blogspot.com/

१. चहा आपल्यासारखा फारच कमी ठिकाणी मिळतो (मध्य कैलाश जवळ हौट चिप्स मधे मुम्बैसारखा चहा आणि उत्तर भारतीय जेवण व पाणीपुरी) २. वेल्लाचेरि बस स्थानकाजवळ मारुति भवन हाटेलात मुर्ति नावचा वेटर ला चक्क अस्खलित मराठी येते हाटेल हि छान आहे ३. बेसन्त नगर बीच जवळ मुर्गैन इडलि ४. स्पेन्सर प्लाझा माउन्ट रोड उत्तर भारतीय जेवण ५. टुकार पाणी (घरातील नळाचे पाणी तसेच्या तसे वापरु नये जड आहे) ६. रात्री अपरात्री बीच वर चुकुन सुदधा जाउ नये पोलिसान्चा तामिळ येत नसेल तर त्रास होउ शकतो (ही गोष्ट ऐकीव आहे सत्य माहीत नाहि) पण रात्री शहरात प्रवास करणे नक्की सुरक्षीत आहे काहीही धोका वाट्त नाही (हा स्वानुभव आहे) ७ रात्री (९ ०० नन्तर) महानगर पलिकेच्या बसेस फारच कमी असतात पण खाजगी बस उप्लब्ध असतात (महिती २००७ सालाची आहे) ८. हल्ली लोक हिन्दि समजु शकतात ९. रिक्शावाले अत्यन्त माजोरडे आहेत पण बाकी लोक खुप मदत करतात मला बरेच वेळा रिक्षा ठरवताना स्थानिक लोकानी मदत केली आहे

विजुभाउ सांगु शकतील बहुतेक.

चेन्नई बद्दल माहिती आवश्यकते नुसार देण्यास आनंद वाटेल.. मला तरी ते गाव बरे वाट्ते. जुन्या वळणाचे लोक बरेच आहे... पिण्याचे पाणि विकत घ्यावे लागते . मराठी लोक ही बरेच आहेत.. शिक्षण दर्जेदार मिळू शकते. जागांचे व भाड्याचे दर मात्र खूप भडकले आहेत... आणि असह्य उकाडा सहन करता आला पाहिजे... पावसाळा व उन्हाळ्याचे चक्र आपल्या पेक्षा थोडे वेगळे आहे... पर्यट्नाची लयलूट आहे..

खाणे वगैरे .. थोडा लवचिक पणा असेल तर छान आहे.. फक्त काही काही गोष्टी... / पिठे वगैरे इकडुन नेलेली बरी पड्तात

तात्या मला लोकांच्या खवत लिहिता येत नाही आहे You are not allowed to post in this guestbook. असा मेसेज येतो माझा लोकांच्या खवत लिहायचा अधीकार काढुन घेतला काय :?

मलाही तिथे आय आय टी च्या परिक्षेसाठी जायचे आहे. त्यामुळे वरील मार्गदर्शनाचा उपयोग होईल.

सगळ्या॑चे मनापासून आभार :-)