Skip to main content

पाककृती हवी आहे -- फिन्गर मिलेट पीठ

लेखक शिल्पा ब यांनी गुरुवार, 20/05/2010 07:56 या दिवशी प्रकाशित केले.
इथे फिंगर millet flour मिळतं ते आणलेलं आहे...एक तर millet म्हणजे काय? नाचणी का ? आणि त्या पीठाच काय काय करता येईल ?

तुझी घागर नळाला लाव...

लेखक फटू यांनी बुधवार, 19/05/2010 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
छान झोप झाली. होणारच होती. सलग साडे तीन तास बाईक चालवून ताम्हीणी घाटातून कोकणात उतरल्याचा शीण होता. त्यातच संध्याकाळी एका कोंबडीला सद्गती देऊन तिचा मर्त्य देहही सत्कारणी लावल्यामुळे शरीर समाधी अवस्थेत जाणं स्वाभाविक होतं. जागे होताच एक छानसा आळस दिला. सुस्ती उडताच समोर घडयाळावर नजर टाकली. सकाळचे अकरा वाजले होते. छे ! खुपच लवकर जाग आली होती. आळोखेपिळोखे देत जाग का आली याचा विचार करू लागलो. आणि जाग येण्याचं कारण माझ्या खोलीत वाजणारं तुझी घागर नळाला लाव हे अप्रतिम गाणं आहे हे जाणवलं.

पाकिस्तान-दहशतवाद आणि अमन की आशा

लेखक चिरोटा यांनी बुधवार, 19/05/2010 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
काही महिन्यांपूर्वी टाइम्स ग्रूप आणि पाकिस्तानी 'जंग ग्रूप' तर्फे दोन्ही देशांतले संबंध सुधारावेत म्हणून 'अमन की आशा' हा संयुक्त प्रकल्प चालु झाला.दोन्ही देशांत व्यापार उदीम वाढीस लागावा व सांस्कृतिक संबंध अधिक दृढ व्हावेत हा हेतु.दोन्ही ग्रूप्स तर्फे काही कार्यक्रमही राबवण्यात आले. २६/११ नंतर संबंध किती सुधारले हा वादाचा मुद्दा आहे.पण दोन्ही देशांच्या प्रतिनिधींकडून्/काही उद्योजकांकडून मात्र अजुनही संबंध वाढवावेत अशी मागणी होते तेव्हा आश्चर्य वाटते.काल दिल्लीत झालेल्या सोहळ्याला प्रणव मुखर्जी(व काही पाकिस्तानी मंत्री) सकट अनेक उद्योजक उपस्थित होते. (

प्रकाशनातील मनोविकार

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी बुधवार, 19/05/2010 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकाशनातील मनोविकार
दै. सकाळ १७ मे २०१० मुक्तपीठ मधील एका लेखकरावांचा प्रकाशनाविषयी अनुभव वाचला.लेखन प्रकाशन किती सोपे किती अवघड ही मनिषची पोस्टही वाचली. या निमित्त आम्हाला आमचा ही ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातुन सुसंवाद या पुस्तकाचा अनुभव सांगावासा वाटतो. मी ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी...प्रश्नोत्तरातुन सुसंवाद या पुस्तकाची १००० प्रतींची प्रथम आवृत्ती २००१ मधे स्वत:च आत्मविश्वासाने काढली.

"देवा ....कंटाळलो या रक्तदाबाला ... करतो आता आत्महत्या...!!"

लेखक इन्द्र्राज पवार यांनी बुधवार, 19/05/2010 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
शीर्षकातील वाक्य.... हे आहे दोन दिवसापूर्वीच दुनळी बंदूक आपल्या नरड्याला लाऊन घेऊन उजव्या पायाच्या अंगठ्याने चाप ओढून स्वत:च्या जीवाची अखेर करून घेतलेल्या श्री. रामचंद्र गिरी या फौजदाराच्या चिठ्ठीतील एक वाक्य ! वय वर्षे ५४... "गोसावी" अशा भटक्या (अनुसूचित) जमातीमधील व्यक्ती.... पहिलवानासारखी देहयष्टी... प्रथम पोलीस म्हणून कोल्हापूर परिक्षेत्रात भरती आणि दहा वर्षाच्या कालावधीतच एक अत्यंत कार्यक्षम आणि कामातील तडफ पाहून वरिष्ठांच्या मर्जीत बसलेले पोलीस अशी ख्याती... शहर, तालुका आणि ग्रामीण भागात सर्वत्रच आपल्या हसर्‍या चेहर्‍याने वावरून भोवतालच्या लोकांची मने जिंकण्याची किमया साधलेली....

लेखन आणि प्रकाशन - किती सोपे, किती अवघड?

लेखक मनिष यांनी बुधवार, 19/05/2010 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळ (मुक्तपीठ) मधे हा लेख वाचला, आणि आश्चर्य वाटले. http://72.78.249.107/esakal/20100517/5127259570058392107.htm
आमच्या मित्राला काय करावे हे कळेना. अक्षरजुळणी करणारे तसेच मुद्रकाचा पैशांसाठी तगादा सुरूच होता. शेवटी वैतागून त्यांनी दहा, पंधरा, वीस टक्‍क्‍यांनी पुस्तके विकून रिकामे झाले. दहा व वीस टक्के म्हणणाऱ्या दुकानदारांनी रोख पैसे दिले. पंधरा टक्के म्हणणारा सातवा दुकानदार व त्याची पत्नी दोघेही द्विपदवीधर आहेत. त्यांची अ. ब. चौकात दोन मोठी दुकाने आहेत.

प्रतिक्षा ? ? ?

लेखक निरन्जन वहालेकर यांनी बुधवार, 19/05/2010 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतिक्षा ? ? ? निद्रेच्या अधिनस्तहि उगडेच असतात नेत्र, परतीच्या प्रतिक्षेत तुझ्या. न जाणो मिटले ते अन….. अवतरली तू अवचित…….. .? ? ? ? आजही स्मरतात ते दिवस ....... धुंद ! धुंद ! ! पुनवेच्या चांदण्यांत, मोकळ्या केशसंभारांत, निरागस उभी तू. मला वाटले, चंद्रमाच झाला लुप्त धरणीवर, काळ्या मेघाआड. पुन्हा बहरला तोच वसंत, तारकांची धुंद बरसात, आसमंती तोच मंद वारा, ? ? ? ?
काव्यरस

विजय तेंडुलकरांचा !

लेखक दिपोटी यांनी बुधवार, 19/05/2010 04:54 या दिवशी प्रकाशित केले.
एप्रिल २०१० मध्ये अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनात प्रकाशित झालेल्या 'हितगुज'च्या संमेलन विशेषांकात हा माझा लेख प्रथम छापला गेल्यानंतर शुक्रवार १४ मे रोजी 'सकाळ' वर्तमानपत्राच्या ऑनलाईन आवृत्तीत व आज १९ मे रोजी विजय तेंडुलकरांच्या दुसर्‍या स्मृतीदिनानिमित्त याच वर्तमानपत्राच्या मुंबई आवृत्तीत छापला गेला आहे.

बिपीनदाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

लेखक धमाल मुलगा यांनी बुधवार, 19/05/2010 02:47 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या सर्वांचा लाडका बिपीनदा उर्फ मिपाचे संपादक बिपीन कार्यकर्ते ह्यांचा आज (१९ मे) रोजी वाढदिवस! त्यानिमित्त बिपीनचंद्ररावजी कार्यकर्तेसाहेब ह्यांना आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!!! पार्टी कुठे आणि कधी ते कळवा सायबा :D