Skip to main content

झोंबी

लेखक जयवी यांनी रविवार, 23/05/2010 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
आनंद यादव ह्या नावाला “नटरंग” सिनेमामुळे आता वलय प्राप्त झालंय. त्यामुळे “पुस्तक-मित्र” च्या लायब्ररीत त्यांचं “झोंबी” पुस्तक दिसल्याबरोबर लक्ष वेधल्या गेलं. पुस्तक उघडल्याबरोबर “झोंबी” ह्या पुस्तकाला मिळालेले पानभर पुरस्कार दिसतात त्यामुळे पुस्तक वाचायची उत्सुकता अजूनच वाढते. त्यात पुढे पु.ल.देशपांड्यांची प्रस्तावना…….मग काय विचारायलाच नको. त्यांनी त्या प्रस्तावनेला नाव पण इतकं सुरेख दिलंय….! “झोंबी- एक बाल्य हरवलेलं बालकांड” ! ह्या नावामुळे नक्कीच काहीतरी जगावेगळं असेल ह्याची कल्पना येते.

पुणेरी (सर)मिसळ...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 23/05/2010 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
हॉटेलमध्ये उपलब्ध असणारया शेव, चिवडा आदी खाद्यपदार्थाँची भेसळ म्हणजेच मिसळ. ही खातांना झणकेबाज 'शांपल' ची मागणी दणकेबाज खवय्यांकडून झाली की एक पाव दोन तुकडे झालेच म्हणून समजा! त्यातही मिसाळांची मिसळ पुढ्यात असेल तर विचारायलाच नको. वाढता वाढता कधी पोतंभर पाव अनेकांच्या उदरांत शिरून पावन होतात हे मिसाळांच्या पिसाळांनाही कळत नसायचे. पिसाळ महाशय मिसाळांचे सख्खे मेहुणे असले तरी दोघांची दुःखे वेगळीच असणार हे उघड आहे! कारण पिसाळ महोदय मिसाळांकडे वाढपी, आचारी, घरगडी अशा स्वरुपाचे हरकाम करणारे हरगडी होते.

पु्स्तक परिचय - 'आशावादी अनुमान' - एक निराशा

लेखक राजेश घासकडवी यांनी रविवार, 23/05/2010 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तकांचं पूर्ण नाव 'भारतीय लोकसंख्येचा शोध घेत केलेले माझे आशावादी अनुमान' लेखक : डॉ. वसंत गोवारीकर. अनुवाद : सुधा गोवारीकर. सत्तरीच्या दशकात लोकसंख्येच्या स्फोटाच्या प्रश्नाने भारतातल्याच नव्हे तर जगातल्या विचारवंतांना भेडसावलं होतं. माल्थसने ज्या संकटाचं भाकित केलं ते लवकरच खरं होणार की काय असं अनेकांना वाटत होतं. भारतात लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कुटुंबनियोजनाचा मोठा कार्यक्रम राबवला गेला. या पार्श्वभूमीवर डॉ. वसंत गोवारीकरांनी या समस्येचा अभ्यास करून नव्वदीच्या दशकात एक इंग्लिश पुस्तक लिहिलं, आय प्रेडिक्ट. त्या पुस्तकाचं हे संक्षिप्तीकरण. खूप आशेने वाचायला घेतलं.

(न्हाउन ओले केस घेवून)

लेखक मनिष यांनी रविवार, 23/05/2010 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
हेहे....आमची प्रेरणा पाषाणभेद यांची ही कविता आणि पाचवीला पुजलेली रविवारची कामे आणि त्यात होरपळणार्‍या उल्हसित चित्त्ववृत्ती तथा आमची (हरवलेली) अगाध प्रतिभा! ;) न्हाउन ओले केस घेवून सर्दी होईल की तुला शिंकानी मग बेजार होशील, त्रास नुसता मला| जा पटकन टॉवेल घेऊन, केस सत्वर कोरडे कर तेल लावून, भांग पाडून चहा पिऊन घे की कपभर| घरात झालाय नुसता पसारा, त्याचे आहे का काही तुला? सुट्टीची आहेत कामे ढिगभर, त्रास नुसता मला| - मनिष शीघ्रक(ड)वी ;)
काव्यरस

पुस्तक परिचय: छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 23/05/2010 08:55 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तक परिचय: छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे लेखक: प्रा: डॉ. प्रल्हाद नरहर देशपांडे, विद्यावर्धीनी महाविद्यालय, धुळे. प्रकाशक: सुषमा प्रकाशन, धुळे. मुद्रक: स्वस्तीक मुद्रणालय, पुणे. प्रकाशित: १९८३ मुल्य: रू. ६५/- छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे म्हणजे त्यांनी लिहीलेली पत्रे नव्हेत. त्या काळी शिवाजी महाराजांच्या वतीने त्यांच्या कारकुनांनी, अधिकार्‍यांनी लिहीलेली पत्रे जी त्यांच्या त्यांच्या कचेरीतून पाठवली जात ती. या पुस्तकात विविध २०० च्या वर पत्रे संपादित केलेली आहेत. लेखकाने विविध संदर्भ घेवून हि पत्रे शोधली आहेत.

न्हाउन ओले केस घेवून

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 23/05/2010 04:05 या दिवशी प्रकाशित केले.
न्हाउन ओले केस घेवून

न्हाउन ओले केस घेवून का सतावीतेस तू मला ओले ते केस झटकून हसवणूक बरी जमते तूला ||धृ|| प्रात:समयी दृष्य दिसे मनावरती फिरते पिसे हलकेच उडे मनपाखरू पिसारा फिरता अंगावरून न्हाउन ओले केस घेवून ||१|| कांता तू ग आहेस सुंदर समयी असल्या कसला अव्हेर वेळ कसला कसा जातसे ओल्या त्या केसात गुरफटून न्हाउन ओले केस घेवून ||२|| - पाषाणभेद (दगडफोड्या) २३/०५/२०१०
काव्यरस

प्रेमभंगी

लेखक chipatakhdumdum यांनी रविवार, 23/05/2010 03:01 या दिवशी प्रकाशित केले.
हल्लीचे प्रेमभंगी (म्हणजे प्रेमभंग झालेले) आणि पूर्वीचे प्रेमभंगी यांच्यातला एक फरक जाणवतो, की पूर्वीचे प्रेमभंगी जन्मभर अविवाहीत रहायचे आणि आताचे लगेच दुसरी शोधायला लागतात. या शिवाय तुम्हाला त्यांच्यात काही इतर फरक सांगता येइल का? वा वा काय तान घेतली आहे बुवानी ?

नकोस माझी आठवण काढू

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 23/05/2010 02:27 या दिवशी प्रकाशित केले.
नकोस माझी आठवण काढू नकोस माझी आठवण काढू नकोस मजला मोही पाडू भोगले क्षण ते ओले नकोच त्यांना आता कुरवाळू || ओठांवरी ओठ घट्ट मिटी ते शब्दही त्यातून नच फुटी ते कढ दु:खाचे बाहेर काढण्या हुंदकाही नकोच सांडू || उष्ण उमाळा अंतरी गाभ्यात लाव्ह्यापरी जाळे तो मनास काय राहीली शेवटली बाकी गणितही त्याचे नकोच करू || - पाषाणभेद (दगडफोड्या) २३/०५/२०१०
काव्यरस

(जखमी वाचकांची रिपु)

लेखक मराठमोळा यांनी रविवार, 23/05/2010 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
जळजळीत प्रेरणा अंतर्जालावर मराठीची भुक भागवण्यासाठी आलेल्या वाचकाला, नखुरडे ठसठसत प्रतिसाद टंकणार्‍या रसिकाला, वास येतोय सटरफटर कुजलेल्या कवितांचा, स्टोन स्टोन स्टोन (फेकुन मारा) काव्यप्रतिभेचे अंतर्गत वस्त्रहरण आणी धिंडवडे लेखन/ साहित्य दारूण विनाशाकडे लोचट ओशट कविताकरती त्यावर खंडीभर प्रतिसादभरती कविताथैमान प्रतीक कॅत्रिना अघोरी मळमळ गप्प बसवेना तुटतो संयम कर्रम कुर्रम कविता पडिती गर्रम गर्रम वाटावाटा कायमचुर्ण वाटा महाअजीर्णाची ही वरदेवता नाहीतर मरमर बधिरसंचिता यातुन वाचव रे वल्लभा कवितावाचनी होता चलबिचल विडंबन करिती मन हे घायल स्टोन स्