मंडळी मी विज्ञानवाद्यांना एक आक्रस्ताळे आव्हान दिले होते.
त्यातून चांगल्या गोष्टी उजेडात आल्या.
महत्त्वाचे म्हणजे शालेय मराठीसाठी खुप लोक काम करायला आनंदाने तयार आहेत.
अनेकांनी मला व्यनिद्वारे कळवले. काही जणांनी मदतीबद्दल तेथेच लिहिले आहे.
मुक्तसुनीत, ३_१४ विक्षिप्त अदिती ,पाषाणभेद, धनंजय, राजेश घासकडवी, भेन्डि बाजार, मन, शानबा५१२, जगताप, विनायक पाचलग, अक्षय पुर्णपात्रे, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
रामपुरी , llपुण्याचे पेशवेll यांनी आपला फुल्ल सपोर्ट असे सांगितले.
मी रुचा, अवलिया यांनी पाठींबा दिला आहे.
अरुंधती यांनी तत्सम काही मिळते आहे का याची चाचपणी केली.
प्रदीप साध्या सोप्या भाषेची आठवण करून दिली.
आप्पा यांनी तर आपली साईटच द्यायची तयारी दाखवली.
या सर्वांचे मनापासून आभार!
श्री. मिसळभोक्ता, टारझन यांनी धागा हलकाफुलका ठेवला त्याबद्दलही आभार!
मी आवाहन करतो की, 'ते आणि आपण' असा भेद बाजूला ठेउन
आपण सगळे मिळून शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेले हे स्थळ कसे असावे यावर चर्चा करू या!
तुमच्या कल्पना येथे मांडा.
मला काही अगदी प्राथमिक असे प्रश्न पडले आहेत, ते देतो. तुमचेही प्रश्न द्या
- यासाठी प्रकल्प कसा आखावा
- काल मर्यादा आणि काल निश्चिती कशी असावी
- किती पैसे नक्की लागतील?
- पैसे उभे करण्याच्या कल्पना
- सॉफ्टवेयर कोणते वापरावे? मायक्रोसॉफ्टला गळ घातली तर फुकट देतील का? कशी घालावी?
- इतर पर्याय?
- रूप कसे असावे?
- जोडण्या कश्या द्याव्यात? देता येतील?
- शिक्षकांना प्रशिक्षण हा कार्यक्रम कसा आखावा?
- प्रशिक्षणात काय द्यावे?
- संगणक अभ्यासक्रम कसा असला पाहिजे?
- अनेक विद्यार्थी एकत्र गणित स्पर्धा खेळू शकतील अशी मल्टीयुझर ऍनिमेशन बनण्यासाठी काय केले पाहिजे?
- की निव्वळ आकडेमोड वापरावी?
- विज्ञानाच्या संकल्पना कशा मांडाव्यात?
- की आपण डोके न चालवता, मुलांनाच सांगू द्यावे काय हवे ते?
- कळफलक कोणता वापरावा? इन्स्क्रीप्ट की गमभन? का?
- त्याचे प्रशिक्षण कसे आयोजित करावे?
- मुख्य म्हणजे शाळा शाळांपर्यंत कसे पोहोचावे?
- प्रकल्प कायम चालू राहण्यासाठी काय केले पाहिजे?
- विद्यार्थ्यांची सुरक्षा?
वाचने
5001
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुळ प्रकल्पाची रूपरेखा
- - हे एक सर्व शाळांना सामील होता येईल असे पोर्टल असावे
- - तेथे मुलांना आपले वाटावे म्हणून मराठी शाळा शाळांना त्यांचे पान द्यावे.
- - तसे त्या शाळांना कळवावे
- - या प्रकल्पाला वृत्तपत्रातून प्रसिद्धी द्यावी - ती नक्की मिळेलच
- - शालेय मुलांना मराठीमध्ये, सहजतेने एकमेकांना जोडू शकतील असे वैज्ञानिक प्रकल्प तेथे राबवावेत
- - मराठी माध्यमाच्या शाळातील संगणक विभागांशी संपर्कात येऊन, त्यांना मराठीतही वैज्ञानिक गोष्टी मिळतात याची जाणीव करून द्यावी.
- - मराठीचा संगणकावर सुयोग्य वापर कसा करावा यावर प्रयोगासहीत व्याख्याने आयोजित करावीत.
- - देण्यासाठी संगणकीय मराठी कशी वापरावी याची पत्रके छापून घ्या ती शाळा शाळांना द्या.
- - शिक्षकांना मराठी मराठीतून संगणक कसा वापरावा याचे प्रशिक्षण द्यावे
- - मराठीसाठी उपलब्ध असलेली गमभन ते ओपन ऑफिस मुक्तशब्दकोश एका सीडीवर मोफत उपलब्ध करून द्यावे
- - मराठी माध्यमाच्या शाळातील संगणक विभागांशी संपर्कात येउन मराठीतून शैक्षणिकरित्या देता येतील अशी संगणकाची एखादी शिक्षण पद्धती विकसित करून द्यावी
- - मराठी माध्यमाच्या शाळात आंतरजालिय जोडण्या देण्यासाठी साधने उभी करावीत.
- - या प्रकल्पासाठी उपयुक्तता पटावून देऊन पैसे उभे करावेत.
आपला गुंडोपंतजमेल तितकी मदत करेनच.
छान !
+१
In reply to छान ! by अवलिया
उद्देश जर
पंत,
आपले
+१
उत्तम!
सहमत
In reply to उत्तम! by धमाल मुलगा
मी पण
सपोर्ट
काम करता येणार नाही
ह्या एकुणच
>>> >>मराठी
In reply to ह्या एकुणच by धमाल मुलगा
उत्तम प्रकल्प
आयला ...
छान!
प्रकल्पास
चांगला उपक्रम