||ससा, मधमाशा आणि मासे सारे ॥झाडून॥ अर्थात- मळ्यातले बोल तळ्यात फ़ोल||
ससा, मधमाशा आणि मासे सारे ॥झाडून॥
अर्थात- मळ्यातले बोल तळ्यात फ़ोल
आधूनिक मिपाप निती कथा
एकदा एक ससा रानातील हिरव्या गार गवतावर उड्या मारत खेळत होता. रानफ़ुलांच्या गंधानी थोडे जास्तच मोहित होऊन त्याने एक टुणकन उंच उडी मारली. त्या उडीने नेमके तिथले एक मधमाशांचे मोहोळ उठले. त्यातल्या मधमाशा ह्या बेफ़ाम उडीने दंग होऊन “ सुटल्या ”. त्यातल्या काहींनी सशाच्या कानाभोवती गुणगुणून त्याला गुदगुल्या केल्या. सशाची जरा करमणूक झाली. ते स्मित विरते न विरते तोच सशाला असे वाटले की एखाद-दोन माशांनी त्याला दंश देखील केला की काय. कदाचित खेळात असे अभावितपणे झाले देखील असेल.
मिसळपाव