Skip to main content

जीवन-मृत्यू!

लेखक राघव यांनी गुरुवार, 08/07/2010 02:50 या दिवशी प्रकाशित केले.
ही कल्पना बरीच आधी सुचली होती.. पण शब्द सापडत नव्हतेत.. यशोधरातैंचा ये परतीचा वारा... हा लेख वाचून शब्द आपोआप स्फुरायला लागलेत.. म्हणून ही कविता त्यांचीच!

"स्पेन" रे बाबा "स्पेन" --- अंतिम फेरीत !!!!!

लेखक बबलु यांनी गुरुवार, 08/07/2010 01:55 या दिवशी प्रकाशित केले.
बलाढ्य जर्मनीला १-० ने मारून स्पेनने अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या आहे !! स्पेनसाठी दोनच शब्दात वर्णन करायचे तर....."तुफान आक्रमण". कमाल केली स्पेनने. कॉर्नरवर केलेला एकमेव गोल तर एकदम चाबूक. स्पेन v/s नेदरलँड. पाहूया काय होतेय ? काय म्हणता ? स्पेन की नेदरलँड ? स्पेन की नेदरलँड ?? स्पेन की नेदरलँड ??? स्पेन की नेदरलँड ???? स्पेन की नेदरलँड ????? ....बबलु
विशेष

रानवा संस्थेबद्दल माहिती हवी आहे.

लेखक पिंगू यांनी गुरुवार, 08/07/2010 01:25 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यामध्ये "रानवा" नावाची पर्यावरणाशी निगडीत संस्था आहे. मला या संस्थेचा पत्ता आणि संपर्क क्रमांक हवा आहे. कुणाला माहिती असल्यास व्यनि करुन कळवावे.. धन्यवाद, पिंगू

(अत्रंग)

लेखक अडगळ यांनी गुरुवार, 08/07/2010 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
जयपाल साहेब माफी द्यावी http://www.misalpav.com/node/13084 पाखरु देखणं, ऊसात नेणं, जोश्यांचं बेणं, अत्रंगी. पाटलाची लक्षी, हिरवीन आक्शी, अंगावर मॅक्शी, सतरंगी झाडाच्या मागं, देवळाच्या पाठी, वढ्याच्या काठी, जलरंगी. उठे वहाण, फाटे तुमान , पाटील पैल्वान, बजरंगी कवी म्हणा, कवडा म्हणा, अडगळ हाथरे , सतरंजी

येऊन येऊन येणार कोण?

लेखक श्रावण मोडक यांनी बुधवार, 07/07/2010 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
बोला, येऊन, येऊन येणार कोण? जर्मनी की स्पेन? आजचा सामना जिंकणाराच विश्वचषक जिंकणार? जर्मनीची घोडदौड कायम राहील की स्पेनचा नजाकतदार आणि विलक्षण खेळ बाजी मारणार? होऊ द्या सुरवात.
विशेष

हळूहळू हा तापच झाले संपादन...

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 07/07/2010 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
काल आम्ही संपाकांची वेदना विडंबनातून मांडली आणि ती वाचून एक श्री.रा.रा.जालकंटक आमच्याकडे तक्रार घेउन आले की तुम्ही फक्त संपादकांचीच बाजू मांडता आम्हाला पण आमची बाजू आहे आणि ती ही तुम्ही मांडली पाहिजे..

निषेध निषेध तीव्र निषेध...

लेखक प्रशु यांनी बुधवार, 07/07/2010 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
सुप्रीम कोर्टात मराठी द्वेषाची गरळ ओकणार्या केंद्र सरकारचा तीव्र निषेध... त्याहुन हे सगळ षंढ पणे आणी थंड पणे पहाणार्या सर्वांचाच तीव्र निषेध...

अंतरंग

लेखक jaypal यांनी बुधवार, 07/07/2010 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
अंतरंग पावसाच गाणं मातीच न्हाणं माझ समुद्र होण अंतरंगी ओला पक्षी हिरवी नक्षी मी एक साक्षी अंतरंगी चींब सर ओली थरथर अधिर हे अधर अंतरंगी उठे उधाण नुरे देहभान मन हे तुफान अंतरंगी झाकल्या खुणा उघड्या पुन्हा घडे काय गुन्हा? अंतरंगी जयपाल ७/७/२०१०
काव्यरस