Skip to main content

दुरावा

लेखक ऋषिकेश यांनी बुधवार, 04/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मिटून डोळे क्षणभर पाहून मग हा दुरावा जाता-जाता क्षणभर राहून मग हा दुरावा दिवस-रात्रीचा पाठशिवणीचा खेळ सांजवेळी क्षणभर भेटून मग हा दुरावा लाटेस भेटणारा किनारा शहारा चिंबचिंब क्षणभर भिजून मग हा दुरावा गाडीच्या प्रतिक्षेत थिजला फलाट धड-धड क्षणभर खेटून मग हा दुरावा भ्रमरासाठी नटून बसलेले फूल मनसोक्त क्षणभर शोषून मग हा दूरावा एकाच खिडकीस न्याहळीत बसता दृष्टीभेट क्षणभर लाजून मग हा दूरावा
लेखनविषय:

वाचने 2405
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

दृष्टीभेट क्षणभर लाजून मग हा दूरावा
क्या कहने!!! ही ओळ वाचता वाचता मला शुभा मुद्गलांच्या "सीखो ना नैनोंकी भाषा पिया" चा व्हिडिओ आठवला.. :) जाता जाता, हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यूँ है? अब तो हरवक्त यहीं बात सताती हैं हमे॥ पुकशु!!

गाडीच्या प्रतिक्षेत थिजला फलाट धड-धड क्षणभर खेटून मग हा दुरावा हे खूप आवडलं. ताजीतवानी ओळ वाटली...

In reply to by राजेश घासकडवी

गाडीच्या प्रतिक्षेत थिजला फलाट धड-धड क्षणभर खेटून मग हा दुरावा
वा, जहबहर्‍या कल्पना. जे न देखे रवी का म्हणतात याचे उत्तम उदाहरण.

छानच कविता, ऋषिकेश.

सहज सुंदर रचना!

सुरेख ! आणि फ्रेश ! ! आवडली ! ! !

सगळ्यांचे प्रतिक्रीयेबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल आभार

सुंदर कविता. शेवटच्या दोन व्दीपदी फारच छान.

दुरावा आवडला. ये दूरियां तड़पाती है दूरियां .................................