लावणी: जाल हो राया उद्या
लावणी: जाल हो राया उद्या
जाल हो राया उद्या,रात आजची खास
शृंगाराच्या राती थांबा आज विनवीते तुम्हास ||धृ||
हात नका धरू हाती, सोडा मज थोडी
लांब नाही जायची नको ओढा ओढी
तुमच्या अशा वागण्यानं वेगळं वाटं खास
शृंगाराच्या राती थांबा आज विनवीते तुम्हास ||१||
तुम्ही शेवंती गजरा आणला मला माळला
शुर रसीक पाहूनी तोरा जिव भाळला
कसं जगावं तुम्हावीण लागली तुमची आस
शृंगाराच्या राती थांबा आज विनवीते तुम्हास ||२||
कालच्या
काव्यरस
मिसळपाव