Skip to main content

धोंडू आणि धोबंग

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 24/09/2010 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
एका अज्ञात ठीकाणी खलबतं चालली असतात- मलईखा पोरा: छैया छैया करून करून मी नाच नाच नाचून दमले गो बाई. नंतर हे बेबी, ते बेबी, घे बेबी, दे बेबी केले. मग हाऊस फुल्ल झाले. पण म्हणावेसे यश मिळत नाही आहे मला. अर्रर्र बास खान: आरं आरं आता बास की. काय हे अभद्र बोलतेस! माझ्या डोस्क्यात भन्नाट आयडीया आहे. ती आपण प्रत्यक्षात उतरवू या. मसल्स खान: हॅल्लो ब्रदर! सांग ना मला सुद्धा ती आयडीया. मी पण पार्टनर मध्ये शरिराचे सगळे सिक्स पॅक अ‍ॅबचे पार्ट पार्ट दाखवले. "नर" असल्याचा फायदा घेवून मसल्स चे "पार्ट" दाखवून पार्टनर चित्रपट केला. मग मी अनेकांना "वान्टेड" होतो.

तु आणि मी (मिसळपाव स्टाईल!)

लेखक इंटरनेटस्नेही यांनी शुक्रवार, 24/09/2010 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिसळपावच्या इतिहासात प्रथमच खफ वरील साहित्य इथे प्रकाशित करतो आहे. आपण धाग्याचा खफ अनेकदा झालेला पाहिला असेल पण ही अशी ही पहिलीच वेळ असावी की आम्ही खफचाच धागा करुन एक प्रकारे बॅकवर्ड इंटीग्रेशन केले आहे. तरी कोणत्याही पुर्वग्रहदुषित नजरेने आमच्या सदर धाग्याचा आस्वाद घ्यावा आणि प्रतिक्रियांचा पाऊस त्यावर पाडावा ही न्रम विनंती. हे साहित्य आमचे एकट्याचे नसुन आमच्या ह्या योजनेत अभावितपणे सहभागी झालेल्या श्री नावातकायआहे, श्री भेन्डिबाजार, श्री कुक, श्री स्वानंद व सौ.

पुढच्या वाटचालीत, अर्थात "गोइंग फॉरवर्ड"

लेखक विकास यांनी शुक्रवार, 24/09/2010 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रकूल स्पर्धेसंदर्भात अनेक चर्चा येथे आणि इतरत्र, तसेच वास्तव जगात चालू आहेतच. त्यातील सगळा सूर केवळ हुकमी एक्क्यामुळे अर्थात कलमाडी मुळे अथवा इतर काही हुकमांच्या पानामुळे पक्षी: सत्ताधारी राजकारण्यांमुळे झाले असा आहे. त्यात काहीच चुकीचे नाही. त्याच्याशी सहमत देखील आहे. त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा जर कायद्याने होऊ शकली तर इतरांना देखील चांगला संदेश मिळू शकेल असे वाटते. मात्र पत्यांमधील हात केवळ हुकुमाची पानेच करत नाहीत.

फ....फ....फ....फ्लोरिडा

लेखक प्रभो यांनी शुक्रवार, 24/09/2010 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
दोन-तीन विकांतापुर्वी फ्लोरिडाला जाण्याचा योग आला.. त्यातले काही निवडक फोटू खाली देत आहे. १. क्लीयरवॉटर बीच - सुर्यास्त २. क्लीयरवॉटर बीच - सुर्यास्त ३. सेंट पीट्स बीच ४.

आमचा नवसाला (न) पावणारा.....

लेखक भारी समर्थ यांनी शुक्रवार, 24/09/2010 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, सर्वात आधी क्षमाच मागतो. अहो त्याचं काय आहे की, बोलवायचं-बोलवायचं करून राहूनच गेलं बघा. नाही म्हणजे, हल्ली आमच्याकडच्या गणपतीला सार्वजनिक ठेवलाच नाहीये आम्ही. फक्त निमंत्रितांनाच बोलावतो. म्हणजे कसं आहे बघा की वर्गणीदार आणि ऊत्सवकाळात त्यांच्या घरी आलेले पाहूणे, एवढेच लोक मिळून गणपती साजरा करतो. वाटलेलं, इकडच्या सर्व मंडळींना आमंत्रण (की निमंत्रण, जे काय असेल ते) धाडेन या वर्षी, पण नाही जमलं. काय विचारलत, आमच्या मंडळाच्या गणपतीमधे विशेष काय म्हणून? अहो, आमच्या मंडळाचा गणपती आहे ना त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तो कोणत्याच नवसाला पावत नाही.

झुरळांचा बंदोबस्त

लेखक अभिमोहित यांनी शुक्रवार, 24/09/2010 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
किचन ट्रॉलीमधे फार झुरळं होतात बुवा! कसा बंदोबस्त करावा? आपला सल्ला मिळाल्यास आभारी आहे.

माझे पहिले गीत ..

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 24/09/2010 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
गीत ऐकण्यासाठी खालील ब्लोग ओपन करावा, आणि उजव्या प्लेयर मधील पहिले गाणे लावावे. www.jayshreeganesha.blogspot.com गाण्याचे नाव : झाडांच्या पानात शब्द : गणेशा. गायिका: स्वप्नजा लेले. संगितकार: सत्यजीत केळकर. अल्बमः ये ना तू सख्या ... नोट: नविन असल्या कारणाने गीत कसे अपलोड करतात ते माहीत नाही , शमस्व , एकदा पहिले गाणे ऐकुन बघा, निश्चित मजा आल्या शिव्फाय राहणार नाही अशी वेडी आशा आहे
काव्यरस