Skip to main content

कोणत्या मापात मी पेला भरू?

कोणत्या मापात मी पेला भरू?

Published on सोमवार, 19/07/2010 प्रकाशित मुखपृष्ठ

आमची प्रेरणा चित्त यांची अप्रतिम गझल कोणत्या चिमटीत मी त्याला धरू

कोणत्या मापात मी पेला भरू?
आमचे होईल मग फुलपाखरू

आमची होणार वाताहत अता
लागली दारू जशी ही ओसरू

रोज मी तेव्हाच गुत्ता सोडतो
लागता ती बारबाला आवरू

सोडती घरला बरोबर सोबती
लागते अमुचे जसे माथे फिरू

लडखडाया लागला पाया किती!
बिल भरू ? की हा अधी गल्ला धरू ?

प्यायली इतकी अता मग मी कसे
प्यायलो नक्की किती पेले स्मरू?

---------कलम १ -----------------

खूप नक्षीदार आहे बाटली
ही उद्या पाण्यास आता वापरू

पेग भरण्या वेळ दवडाया नको
बाटली उघडू, तिचे पेले करू

बायकोने  नेत्र आहे रोखले
(सांग मी पुढचा कसा पेला भरू?)

ही विदेशी आणि देशी  हातभट्टी
बोल "केश्या" ही भरू की ती भरू

१. देशी किंवा विदेशी मदिरेत बेवड्याला जेव्हा झिंगायचे असते (चार किंवा त्यापेक्षा जास्त पेग) , तेव्हा त्या पेगाच्या वर किंवा मध्ये किंवा दोन क्वार्टरच्या नंतर तिथे  हाफ़ असे मोजून पुढील पेये  ही एकत्रितपणे ओतावीत, असा बेवडांचा निर्देश असतो. मराठी विडंबनात ही पद्धत राबवायची असल्यास मला कलम हा शब्द किंवा क हे अक्षर मला प्रस्तुत वाटते. कलम ह्या शब्दाचा एक अर्थ तुकडा करणे किंवा पाडणे. आणि दुसरा अर्थ दोन वस्तू मिसळणे असाही आहे.   (ह्याबाबतीत मार्गदर्शन केल्याबद्दल मी उर्दू-फारशीचे माझे जाणकार मित्र श्री. चित्त ह्यांचा अत्यंत आभारी आहे. )


लेखनविषय:

याद्या 2249
प्रतिक्रिया 11

आठवड्याची मस्त सुरवात :) अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

हा शनिवार / रविवार चा उतारा मस्तच.... विकारंभ छान झाला! आंबोळी

तळटीप भारीच. त्यातही मार्गदर्शनाबाबतचा मजकूर खासच!

In reply to by श्रावण मोडक

विडंबन चांगले झाले असले तरी खास असे म्हणणार नाही कारण हा केसुंचा हातखंडा विषय आहे.. चतुरंग

कदी बसाच दादुस ? पन मापात पाप नको. क बोल्तो ? मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ

टाळ्या टाळ्या ! फार भारी.. फुलपाखरू , बारबाला, माथे फिरू हे तर फारच आवडले :) -- लिखाळ. देवाने विचारले अक्कल हवी की टू-व्हिलर? अनेक पुणेकरांनी टू-व्हिलरची निवड केली.

"स्मरू" जरा खटकते. जरा सोपा, बोली भाषेतला, बेवड्यांना कळण्यासारखा शब्द वापरता येईल काय ? -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

आम्ही पाहिलेले बेवडे ह्या पेक्षा जडजड शब्द बोलतात.. (अनुभवी भोई)केशवसुमार स्मरू त्यातल्या त्यात मुळ यमकाच्या जवळाचे आहे म्हणून वापरले (त्यातल्या त्यात्)केशवसुमार तुमच्या विनंती नुसार बेवड्याला समजेल असे अजून एक कडव घ्या.. मुळ यमक तसेच ठेवून (पर्यायी)केशवसुमार प्यायलो इतक्या जणीच्या मुळे मी / प्यायलो इतक्या तर्‍हेचे ब्रँड मी आठवू कोणास, कोणा विस्मरू ?

In reply to by केशवसुमार

कठीण कठीण शब्द नको असतील तर... प्यायली इतकी अता मग मी कधी डीयूआय चार्जेस ऐकोनि मरू?

In reply to by मुक्तसुनीत

डीयूआय चार्जेस ऐकोनि मरू? त्येंच्याकडं ऑटोभान आसतंय..... आनि मर्सिडीसचं इंजानबी असतंय... मग भां** बा***, डीयूआय आसंलच ह्ये कशावरून? :) आप्ला, हानिकेनदास