काल पासुन अनेकांचे फोन, इमेल द्वारे एकच संदेश येत होता. ऑर्कुट उघडु नकोस. अकांउट हॅक होइल. (मिपामुळे तिकडे नसतोच मी).
आज सकाळमधे सविस्तर बातमी आली आहे.
'ऑर्कुट'वर 'बॉम सबाडो'चा धुमाकूळ!
'ऑर्कुट' या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळावर बॉम सबाडो नावाच्या 'बग'ने शनिवारी धुमाकूळ घातला. प्राथमिक माहितीनुसार हा 'बग' पासवर्ड हॅकर असून, तो संबंधित "ऑर्कुट'धारकाचे अकाऊंट हॅक करतो.
'ऑर्कुट'धारकांच्या स्क्रॅपबुकवर त्यांच्या मित्रगटातील व्यक्तीकडून 'बॉम सबाडो' नावाने स्क्रॅप येतो. इंटरनेट एक्सप्लोररमध्ये त्या स्क्रॅपवर क्लिक केल्यास एक्सप्लोरर हॅंग होते.