चार दिवसांपूर्वीच माझ्या सात महीन्यांच्या मुलीला फणफणुन ताप आला होता.नुकतेच प्रवासावरुन परत बेंगलोरला आलो होतो आणि येतानाच जाणवले की लेकराला ताप भरला आहे.पण प्रवासाचा शीण असेल आणि थोड्या विश्रांतीनंतर तिला बरे वाटेल असे वाटले.कंपनीमध्ये अगोदरच प्रोजेक्टची डेडलाईन जवळ आल्याने आणि बॉसनेही यांनंतर कृपया रजा घेऊ नको अशी विनंती करुन रजा दिल्याने त्या दिवसाचीही रजा टाकणे मला पटले नसते म्हणुन प्रवासावरुन आल्या आल्यावर पटापट आवरुन कंपनीमध्ये गेलो.कंपनीत जाऊन दोन-तीन तास झालेच नसतील तोवर बायकोचा फोन आला कि पटकन घरी या मुलीला १०३ टेम्परेचर आहे.बॉसला सांगुन लगोलग निघालो.डॉक्टरचे क्लिनिक ५-३० ला उघडते. जाऊ पर्यंतच ५-४५ वाजले.जाण्याआधी डॉक्टरला फोन केला होता व त्याला सर्व परिस्थिती सांगितली होती.त्याने सांगितले की बाहेर जर कुणी आणखी पेशंट उभे असतील तर त्यांना विनंती करुन बघा. आणि लवकर मला दाखवा.पण जायला उशीर झाल्यने अगोदरच ७ पेशंट आले होते आणि माझा नंबर आठवा होता.बायकोने विचारले कुणाला विनंती करायची का? मी म्हटले कुणाकुणाला करणार आणि आठवाच तर नंबर आहे.थोडाच वेळ वाट पाहावी लागेल.वगैरे.तिला संयमाने घे असे वारंवार सांगत होतो.पण खरेतर मलाच कुणाला विनंती करायची हिम्मत झाली नाही.बाकीची कारणे हुडकत बसलो.माझ्या आधीचे सातही जण काहीना काही प्रॉब्लेम घेऊनच आले आहेत.त्यांनाही त्यांच्या लहान मुलांना दाखावायचे आहे ते कशाला मला त्यांच्या अगोदर जाऊ देतील वगैरे वगैरे.. थोड्या वेळाने नंबर आला आणि लेकराला डॉक्टरला दाखविले.आता मुलगी ठिक आहे.
ही गोष्ट इथेच संपली असती आणि माझ्या मनात काट्यासारखी रुतुनही बसली नसती.पण आज तीन दिवसांनंतर मुलीला घेऊन पुन्हा एकदा त्याच डॉक्टरकडे गेलो.सर्वकाही ठिक आहे आणि मुलीला दिलेली औषधे अजुनही चालु ठेवु का ह्याबद्दल विचारायला.आज शनिवार.सुटीचा दिवसा त्यामुळे दवाखान्यात गर्दी होती.कंपनीत गेले काही दिवस टेबल टेनिसच्या मॅचेस चालु होत्या आणि त्यात चीअर करताना बेंबीच्या देठापासुन बोंबलल्यामुळे माझा आवाज पूर्णपणे बसला होता. अक्षरशः एकेक शब्द बोलायला महत्प्रयास करावे लागत होते.सकाळची वेळ.बायकोला दवाखान्यात बसुन वाट पाहत बसण्यापेक्षा त्यावेळात शनिवारची इतरची कामे उरकता आली तर उरकुन टाकायची होती.त्यामुळे मला दवाखान्यात थांबायला सांगुन ती इतर कामे करायला गेली. नंबर येण्याच्या आधी पाच मिनिटे फोन करा मी लगोलग येत असे सांगुन ती निघुन गेली.मी वाट पाहत बसलो.अकरावा नंबर आला आणि पुढचा नंबर माझाच होता म्हणुन मी डॉक्टरच्या केबिनबाहेर मुलीला घेवुन थांबलोच होतो.तेव्हाच एक स्त्री माझ्या आणि डॉक्टरच्या केबिनचे दार ह्यामध्ये येऊन उभे राहुन चुळबुळ करत राहीली.मी अस्वस्थ झालो.बायकोला फोन लावत होतो.अकरावा पेशंट केबिनमधुन बाहेर आला.त्या स्त्रीने कन्नडमध्ये मला काहीतरी सांगितले .मला फक्त त्यातले रिपोर्ट रिपोर्ट एवढेच कळले.(तिला बहुदा म्हणायचे होते कि फक्त रिपोर्ट दाखवायला आत जायचे आहे.) रिपोर्ट रिपोर्ट असे सांगुन मला तिने आत जायची विनंती केली.माझ्या डोक्यात गोंधळ चालु.एकतर ती कानडीभाषक स्त्री होती.आणि एकुण आविर्भाववरुन कामगार वर्गातील वाटत होती.तिच्याशी बोलताना एकतर आवाज बसल्यामुळे माझ्या तोंडातुन नीट शब्द बाहेर पडत नव्हते आणि तिला हिंदी किंवा इंग्रजी बोलता येत असण्याची शक्यता कमीच होती.बायको अजुनही आली नव्हती.माझ्या मनात विचार आला तिचा नंबर एक्स्चेंज करावा म्हणजे तोपर्यंत बायकोही येईल.तिचे रिपोर्ट रिपोर्ट चालु होते.ह्या सगळ्याच एकत्रित परिणाम झाला आणि माझा हात आपोआप तुम्ही जा केबिनमध्ये अश्या अर्थाने पुढे झाला.ती बाई लगेच केबिन मध्ये गेली.आणि तेव्हा मला कळले आपण चूक केली.तेरावा नंबरला एक मराठीच फॅमिली होती.माझ्या आधी मी दुसर्याच कुणाला जाऊ दिले हे पाहुन त्यातील स्त्री मला म्हणु लागली तुम्ही जाता की आम्ही जाऊ?.तोपर्यंत मला काय झाले ह्याची कल्पना आली आणि मी म्हटले कि ती बाई आत घुसली आहे पोराला पुढे करुन्.मी तिला जाऊ दिले नाही.(पण मी तिला पुढे हो म्हणुन हात केला होता हे सर्वांनीच पाहीले होते.).बाकीच्या इतर लोकांना कुठला नंबर आत गेला आहे आणि काय झाले आहे ह्याची कदाचित कल्पना नसावी.पण त्या मराठी बाईला दुसरीने विचारले काय झाले आणि पुढच्या चार पाच नंबर्सना समजले कि मी कुणाला तरी मध्ये घुसु दिले आहे.माझी अवस्था विचित्र झाली.उगाच फोनवर मेसेज पाहत आहे असे भासवुन वेळ मारुन न्यायला लागलो.बायकोला फोन केला आणि तितक्यात ती मध्ये घुसलेली बाई केबिनबाहेर आली.आणि थॅन्कु थँक्यु म्हणत निघुन गेली.मी मात्र हे काय केलेस बाई अशी चर्या घेवुन आत घुसलो.बायको फोनवर होती आणि लेकराला काय होतेय हे तिच जास्त चांगल्या पध्दतीने डॉक्टरला सांगु शकेल असे वाटल्याने मी माझा फोन डॉक्टरला दिला.तिने डॉक्टरला सांगितले की ती दवाखान्यातच येत आहे. त्यामुळे डॉक्टर मला म्हणाला की तुम्ही बाहेर बसा आणि बायको आल्यावर आत या.मी पुन्हा मुलीला घेवुन बाहेर आलो.केबिनबाहेर पुढचा नंबर चिकटुनच बसला होता आणि मी बाहेर आल्या आल्या तो लगोलग आत गेला आणि त्याचा पुढचा नंबर येऊन केबिनला चिकटुन उभा राहीला.मी तिला विनंती केली की असे असे झाले आहे आणि डॉक्टरने मला आता आत गेलेल्या पेशंटनंतर आत यायला सांगितले आहे.त्यामुले तो पेशंट बाहेर आल्यावर मी आत जातो त्यावर ती स्त्री म्हणाली कि माझ्यानंतर जा.मी ठिक आहे म्हणालो पण आता बाहेरचे सगळे समीकरणच बदलले होते.प्रत्येक नंबरला त्याचा पुढचा नंबर कोणता आहे हे माहीत होते त्यामुळे ती बाई आत गेल्यावर मला आत जाणे मुश्किल झाले असते. तिथला एकजण मला विचारता ही झाली कि तुमचा नंबर किती आणि हे अगदी प्रोफेशनल इंग्लिशमध्ये चेहर्यावर अगदी कनिंग हावभाव ठेवुन. सुदैवाने तोपर्यंत बायकोही आली आणि आम्ही दोघे वाट पाहत बसलो.आतला पेशंट बाहेर आला आणि पुढचा नंबर आत जाण्याअगोदरच सुदैवाने डॉक्टरनेच आम्हाला आत बोलावल्याने आमची सुटका झाली.
दवाखान्यातुन बाहेर आल्यावर माझे विचारचक्र सुरु झाले.काही दिवसांपूर्वी मलाही असे मध्येच घुसायची गरज असताना मी नुसताच बसुन राहीलो आणि इथे त्या स्त्रीला कदाचित काहीही गरज नसताना माझ्या मूर्खपणाचा फायदा घेवुन आत जाता आले.माझी स्वत:वर आणि बायकोवर फार चिडचिड झाली.तुझ्यामुळेच झाले असे म्हणुन तिच्यावर सुध्दा डाफरलो.चिडचिड व्हायचे महत्त्वाचे कारण म्हणजे मला ह्या गोष्टीचे मनाला पटेल असे काहीही स्पष्टीकरण सापडले नाही.(पहील्या अनुभवात निदान सगळ्यांनाच इमर्जन्सी असेल असे मनाला पटवता तर आले होते.) कुणी असे तुम्हाला व्यवस्थित मूर्खात काढुन तुमचा वापर केला तर ती गोष्ट मनाला फार बोचते.
मला मिपाकरांना इथे हेच विचारायचे आहे कि पहिल्या प्रसंगात माझ्याकडुन नेमके काय करणे अपेक्षित असायला हवे होते आणि दुसरा प्रसंगात जे घडले त्यात नक्की माझा मूर्खपणा होता की कधी कधी असे होते असे म्हणुन ही गोष्ट सोडुन द्यायला हवी.?
(पहील्या प्रसंगातील आणि दुसर्याप्रसंगातील विनंती करुन मध्ये घुसणे ह्या योगायोगाचेही मला आश्चर्य वाटते.(दुसर्या प्रसंगात तिथे इतके नंबर असताना सुध्दा नेमका माझाच नंबर आल्यावर त्या स्त्रीने मला आत जाऊ द्या म्हणुन विनंती करावी.))
ता.क :- काही दिवसांपूर्वी मिपावर मॉलमध्ये रांगेतुन मध्ये घुसणार्यांबद्दल एक कौल वा तत्सम धागा प्रकाशित झाला होता.त्यावर आलेल्या एकसेबढकर वाईट/बर्या/चांगल्या प्रतिक्रिया वाचुन क्षणभर असाही विचार केला कि त्या दवाखान्यात समजा काही मिपाकरच बसले असते आणि मी वर उल्लेखिलेली गोष्ट केली असती तर मिपाकरांनी माझे नक्की काय केले असते?
वाचने
5064
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
जनरली
शक्य आहे. माझी बायकोही हेच
In reply to जनरली by चिरोटा
बापू अशी चूक पुन्हा नको!
धन्यवाद संजयजी. जाण्याआधी
In reply to बापू अशी चूक पुन्हा नको! by संजय अभ्यंकर
खरं तर असे काही प्रसंग
फार विचार केला तरी त्रास
In reply to खरं तर असे काही प्रसंग by शिल्पा ब
थोडेसे अवांतर : १०३ ताप
खूप ताप असेल तर थंड नाही तर
In reply to थोडेसे अवांतर : १०३ ताप by पक्या
पक्याजी तुम्ही अगदी परफेक्ट
In reply to थोडेसे अवांतर : १०३ ताप by पक्या
विचारून बघायला पाहिजे
विचार करू नका.
माझी तर कायमच तुमच्या सारखी
नवीन संशोधनानुसार कपाळावर थंड
उपयुक्त माहीती
In reply to नवीन संशोधनानुसार कपाळावर थंड by डॉ.प्रसाद दाढे