Skip to main content

चुकुन आलेलं ईमेल : लाँग टाईम नो सी ~

लेखक ऋयाम यांनी शनिवार, 09/10/2010 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
काल मला एक ईमेल आलं. कोणा अनोळखी माणसाकडुन होतं. "काय माहित?" म्हणुन दुर्लक्ष केलं काल, पण आज त्यावर हे उत्तरही आलेलं दिसलं म्हणुन इथं पेस्टतोय.... ईमेल १ : --------------------------------------------------------------------------------------------- Subject : नमस्कार. लाँटानोसी. :) Text : काय रे नार्‍या? कसा आहेस? :) लाँगटाईमनोसी रे... :( कसा चाल्लाय जॉब? कसं आहे शेड्युल? आणि तुझ्या 'ट्रॅव्हल कंपनी सुरु करायचं' कुठपर्यंत आलं? व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या जमान्यात तुझा 'फिरण्याचा छंद, पार बंद' झालं असेल नाही!? मी खरंच वैतागलोय रे. जॉईन झाल्यापासुन तेच एक मोनोटोनस काम.

कोहम! कोहम!

लेखक मराठमोळा यांनी शनिवार, 09/10/2010 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
दहावीत असताना टायटॅनिक पाहिला होता, ईंग्रजी अ‍ॅक्सेंट तेव्हा तेवढा कळत नव्हता, पण आज पुन्हा अचानक पाहिला. मनात अनेक विचार उठले, कल्लोळ जाहला... माजला.... डोकं काम करेनासं झालं... का? कुणास ठाउक... काही काही वाक्ये मनाला स्पर्शुन नाही तर घासुन गेली.. ओरखडली.. इतके विचार कल्लोळ माजवुन गेले.. त्यातलाच एक विचार. (he exists in my memories).. अप्रतिम. त्यावरुन सुचलेलं काहीसं. माणसं... एखादी कुत्री मांजरी मेली तर कदाचित दुख: होणार नाही, पण एखादा रोज दिसणारा भिकारी अचानक गेला तर मनाला हुरहुर लागते. का? कितीही वाईट असो, मित्र, नातेवाईक कोणीही, पण एक नातं असतं जे ओढतं, जवळीक साधतं ते का?

पुन्हा क्रांती

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 09/10/2010 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
स्वार्थाचा कल्लोळ प्रेमाचा दुष्काळ स्नेहाचा अकाल चोहिकडे हिंसा आणि क्रोध धर्म भेदाभेद बुद्धाला निर्बुद्ध केले आम्ही रोज नवे पक्ष त्यांचे नवे झेंडे प्रत्येकाचे दांडे मजबूत क्रांतीबिंती काही होणारच नाही ऐसे काहीबाही वाटे मज कुत्र्याचे शेपूट कायम वाकडे करणारे वेडे सरळ ते होईल होईल मुठी वळतील मेलेला उठेल चितेतूनी चितेच्या या ज्वाला होतील मशाल तख्त हादरेल माजोरडे रयतेचे राज्य रयतेच्या हाती स्वप्नामध्ये क्रांती केली हो मी....!!!
काव्यरस

जोवरी आहे जीव, तोवरी घ्या रामराम

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 09/10/2010 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
जोवरी आहे जीव, तोवरी घ्या रामराम
(आज नाशिकचे आमदार डॉक्टर वसंत पवार यांची अंत्ययात्रा बघीतली. त्यांच्या नविन पंडीत कॉलनीच्या हॉस्पीटलाच्या शेजारच्या बिल्डींगमध्येच माझ्या कंपनीचे ऑफीस आहे. मी नाईट शिफ्ट करत होतो. ऑफीसमधल्या काचेमधून त्यांच्या अंत्ययात्रेचा सोहळा पाहत होतो. त्याचवेळी खालील कवीता सुचली. डॉ. पवारांना श्रद्धांजली.
काव्यरस

गौळण: अरे कान्हा तू मजला असा छेडू नको

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 09/10/2010 06:55 या दिवशी प्रकाशित केले.
गौळण: अरे कान्हा तू मजला असा छेडू नको
अरे कान्हा तू मजला असा छेडू नको हात धरूनी वाट माझी तू अडवू नको ||धृ|| नेहमीची मी गवळणबाई, जाते आपल्या वाटंनं डोक्यावरती ओझं आहे, लोणी आलंय दाटून बाजारात मला जावूदे, वाट माझी अडवू नको अरे कान्हा तू मजला असा छेडू नको ||१|| लांबून मी आले बाई, जायचे अजून कितीक लांब चालून चालून थकून गेले, करू किती मी काम इथे थांबले थोडा वेळ, दम माझा तोडू नको अरे कान्हा तू मजला असा छेडू नको ||२|| सासू माझ
काव्यरस

ढग - १

लेखक जिप्सी यांनी शनिवार, 09/10/2010 01:57 या दिवशी प्रकाशित केले.
डोंगरात उनाडताना नेहमीच ढगांची वेगवेगळी रूपं,आकार बघायला मिळतात्,असे अनेक फोटो माझ्या संग्रहात आहेत्,जर आपल्याला आवडतं असेल तर माझा संग्रह तुमच्यापुढं खुला करीनं. आभाळातलं पाखरू (हरिहर) मेघअश्व (प्रबळ्गड)

माझ्याही घरात.......

लेखक utkarsh shah यांनी शुक्रवार, 08/10/2010 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या बॅंकेच्या लोन डिफॉल्टरच्या लिस्टवर दर तीन महिन्यानी सही करायचे काम फिल्ड ऑफिसर म्हणुन माझ्याकडेच आहे , सहसा मी या यादीवर नुसती नजर टाकतो , आणि सही करुन टाकतो . यात विशेष असे काहीच बघण्यासारखे नसते. ही लिस्ट आमच्या रिकव्हरी एजन्सीकडे जाते , आणि ती एजन्सी येन केन प्रकारेण लोनची रिकव्हरी करुन बॅंकेत भरते. याबद्दल काही पर्सेंटेज रिकव्हरी एजन्सीला मिळते . आज मात्र या यादीत गजानन बंडोपंत कुलकर्णी हे नाव बघुन माझा हात थबकला. या महाशयांनी तीन महिन्यांचा कार लोनचा हप्ता चुकवला होता .हे महाशय म्हणजे माझा परममित्र गजा . वर्षभरापुर्वीच हे कारलोन घेण्यासाठी मी गजाला मदत केली होती .

उत्सव रानफुलांचा

लेखक योगेश२४ यांनी शुक्रवार, 08/10/2010 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
जास्वंद गेंद Eriocaulon Sedgewickii पिवळी अबई_Reinwardtia indica शंकासूर शंकासूर