कंट्रोल झेड
लेखनविषय:
काव्यरस
आयटीतल्या नवरा बायकोंचं एकमेकाशी पटेनासं झालं
काउन्सिलिंगला कपल शेवटी आमच्यापाशीच आलं
(मी विचारलं, हं सांग रे लग्न कसं ठरलं? तो म्हणाला..)
माझं सर्फींग चाललं होतं, ही विंडोत उभी दिसली
सहज पिंग केलं तशी सांगतो काय गोड हसली
आयडिया केली, आयडी शोधला, चॅटींगला इन्व्हाईट केलं
डेटाफाईल डाउनलोड केली, सांगा काय वाईट केलं?
फेसबुक, ऑर्कुट, हायफाय भेटी, मेसेज, मेल रोजच्या रोज
कॉन्फिग्रेशन जुळतंय वाटलं, मॅरेजसाठी केलं प्रपोज
(नंतर आमचं लग्न झालं... आता कळून चुकलंय...)
सुंदर आहे देखणी आहे पण नको तितकी बडबड आहे
हार्डवेअर तसं चांगलं, पण सॉफ्टवेअरमध्ये गडबड आहे
किचनमध्ये हिचं मन जरा सुद्धा रमत नाही
आयटीतल्या या मुलीला साधी भातआमटी जमत नाही
हट्टी, आळशी, हेकेखोर साध्या गोष्टीत करते प्रॉब्लेम
व्हायरस तेव्हा गावलाच नाही, कुणाला आता करायचं ब्लेम
(मग तिनं तिची बाजू मांडली)
हिरमुसलेली चिडून म्हणाली, याची माझी नोकरी निराळी
मी दिवसा कामाला जाते, याची नेहमीच रात्रपाळी
मी ही कमावते, याला म्हटलं, घरकामात कशाला मरु
स्वयंपाकपाणी, धुणीभांड्यांचं सरळ आउटसोर्सिंग करु
कामाचा इतका ताण, प्रोजेक्ट म्हणजे नसतो खेळ
हा मिसकॉल देतो तेव्हा, मला बघायलाही नसतो वेळ
महिनोन्-महिने भेट नाही, संसार पार घसरलेला
सुखाचं क्रेडिटकार्ड हातात, पासवर्ड मात्र विसरलेला
(संसार मोडू द्यायचाच नव्हता, मी समजूत काढत म्हणालो...)
सोसणं आणि सॅक्रिफाईज हाच संसाराचा असतो अर्थ
मॅरेजीस आर अरेंज्ड इन हेवन बट सफर्ड ऑन अर्थ
केल्या चुका विसरुन जा, फक्त धरा धीर थोडा
असा त्रागा नका करु, डायव्होर्सचा तर विचार सोडा
नोकर्या बदलतील, काळ बदलेल, भेगा काय सहज सांधाल
घरात पाळणा हलल्यावर, कायम कायम सुखानं नांदाल
प्रोग्राम त्याचा*, कंट्रोल त्याचा, बदलायचं आपल्यात बळ नसते
आयुष्याच्या कीबोर्डावर "कंट्रोल झेड"ची कळ नसते
*परमेश्वर. अर्थात System Administrator
-अविनाश ओगले
वाचने
3829
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
खुसखुशीत...
मॅरेजीस आर अरेंज्ड इन हेवन बट
मस्त!
मी बर्याच दिवसांनी कविता
वा वा
In reply to वा वा by केशवसुमार
+ १
In reply to + १ by मेघवेडा
+२
In reply to +२ by गणपा
+३
In reply to +३ by धनंजय
+४
मस्त
हॅ
चांगली कविता
ओगले साहेब, एकही शब्द....
In reply to ओगले साहेब, एकही शब्द.... by बहुगुणी
+१
मस्त
अ-प्र-ति-म
मस्त !
In reply to मस्त ! by मिसळभोक्ता
कंट्रोल-झेड
छान!
अरे वा मस्तच कविता!
In reply to अरे वा मस्तच कविता! by चतुरंग
असेच
एक नंबर कविता.
मस्त कविता.........
प्रोग्राम त्याचा*, कंट्रोल