दिवाळी जवळ आलेली आहे. हा भारतातील त्यातही हिंदूंचा सण असल्याने त्यातल्या अनेक ब-यावाईट परिणामांबद्दल जसे की फटाके फोडल्याने होणारे प्रदुषण, भरमसाठ खाण्यामुळे होणारी अन्नधान्याची टंचाई, एकमेकांना भेटुन मोठ्याने गप्पा मारुन होणारे ध्वनीप्रदुषण, सुट्ट्यांमुळे होणारी मानवी कार्यतासांची हानी, त्याचा जीडीपीवर होणारा परिणाम इत्यादी इत्यादी विषयांवर विचारवंतांच्या चर्चा सुरु होतील. आपण त्यात भाग घेण्याचे काही कारण नाही.
आज आपल्याला चर्चा करायची आहे फटाक्यांविषयी... :)
फटाके अनेक प्रकारचे असतात. काही आवाज करणारे असतात. तर काही नुसतेच शोभेचे असतात.