आभाळ लागले मिळू
काव्यरस
आता कुठे उजाडले आभाळ लागले मिळू
सविता प्रकाश लागला या चांदण्यात विरघळू
वेडेपणा सुखावला मी पाहिले जधी तुला
तव चोरटा कटाक्ष गे मग लागला जिवा छळू
येशील भेटण्यास तू जेव्हा पुन्हा मला प्रिये
प्राणात माळ केवडा दोघे मिठीत दरवळू
ना सांगता कधी तुला ना बोलता कधी मला
माझे तुला तुझे मला मनमीत लागले कळू
नाही कुठे उणेपणा संसारवेल मोहरे
एकेक स्वप्न साजिरे साकारते हळूहळू
-स्वानंद
http://amrutsanchay.blogspot.com/
वाचने
1409
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
"प्राणात माळ केवडा"
सुंदर अतिशय अतिशय सुंदर!!!!! मनोहर
वेडेपणा सुखावला मी पाहिले जधी तुला
तव चोरटा कटाक्ष गे मग लागला जिवा छळू
वा...
ना सांगता कधी तुला ना बोलता कधी मला
माझे तुला तुझे मला मनमीत लागले कळू
शॉलिट्ट...
प्रत्येक कडवं परिपुर्ण !
नाही कुठे उणेपणा संसारवेल मोहरे
एकेक स्वप्न साजिरे साकारते हळूहळू
-एक समंजस आणि संयमित वचन...
लिहीत रहा !
कविता आवडली.
छान आहे.
येशील भेटण्यास तू जेव्हा पुन्हा मला प्रिये
प्राणात माळ केवडा दोघे मिठीत दरवळू
फार छान...
"प्राणात माळ केवडा" सुंदर