Skip to main content

गणपती भी अल्लाह है !

लेखक पंख यांनी शनिवार, 18/12/2010 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
काल-परवा काही कामानिमित्त सोलापूरला जाणे झाले. आता पुणे-सोलापूर प्रवास महामार्गावरुन करणे अशक्यच वाटते, त्यामुळे ट्रेनचा पर्याय निवडला.. तिकडुन येताना दुपारच्या ईंद्रायणी एक्सप्रेसमध्ये अतिरीक्त डब्यात आरक्षण मिळाले होते. शुक्रवार त्यात मोहरम त्यामुळे गर्दी असणार हे अपेक्षित होतेच पण आरक्षणही अतिरीक्त ड्ब्यात मिळाल्याने काहिसा नाखूषच होतो.. पण पर्याय नसल्याने आत घुसून माझी जागा शोधली.. जागा मात्र खिडकीशेजारी असल्याचे बघुन जरा हायसे वाटले. (आम्ही नेहमीचे रेल्वेप्रवासी नसल्याने आरक्षण करताना ex02 म्हणजे अतिरीक्त डबा असतो हे समजले नाही त्यामुळे अगोदर हा डबा सापडायलाच पळापळ झाली !)..

संचित

लेखक रणजित चितळे यांनी शनिवार, 18/12/2010 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला रस्त्या मधून जाताना एखादा रोगाने त्रस्त असह्य भिकारी दिसतो, कोणाला जन्मताच असाध्य वेदना देणारा रोग असतो, कोणी अंबानीचा पोर असतो जो हजारो करोडोंचा मालक असतो कोणी राहुल गांधी जन्मताच एका साम्राज्याचा धनी असतो (पुढे ते टिकेल, नाही टिकणार तो मुद्दा सोडला तर) (अशी अजून टोकाची भरपूर उदाहरणे मिळतील). ह्या पार्श्वभूमीवर चर्चेचा प्रस्ताव मांडलेला आहे. १. संचित (हा जन्म व पुर्वजन्म) मानायचे का. नसेल तर वर वर्णन केलेली टोकाची परिस्थिती उपभोगण्याला कारणे कोणती. २. जे आस्तिक आहेत त्यांचे काय मत आहे (व काय उत्तर आहे ह्या टोकाच्या परिस्थितीवर). ३.

ओवलेकरवाडीतिल (ठाणे) उडती रत्ने

लेखक jaypal यांनी शनिवार, 18/12/2010 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी खुप दिवसांनी येत आहे. रिकाम्या हाताने कसं भेटायच ? म्हणुन नाराजी दुर करन्यासाथी हा उडत्या रत्नांचा खास आहेर आणला आहे . १. a २. b ३. पैलु न पडलेली रत्ने आधी दाखवतो c ४.

शब्दालंकार-१. छेकापन्हुती

लेखक शरद यांनी शुक्रवार, 17/12/2010 08:14 या दिवशी प्रकाशित केले.
हराच्या हाराच्या, किंवा कोडी हे गंमत म्हणून ठीक. पण त्यांची जागा ताटातील चटणी-कोशींबरीसारखीच. आज जरा एका अशा विषयाकडे वळू जो शाळेत आपण शिकलो व आज जवळजवळ विसरलोच आहोत." काव्यालंकार". उपमा, उत्प्रेक्षा, यमक इत्यादि. जेंव्हा यांची नावेही माहीत नव्हती तेंव्हाही या अलंकारांमुळे आपल्या नकळत आपल्या मनात ते कवितेची गोडी निर्माण करत होते. कविता पाठ होत होत्या, त्यांच्यामुळे. पण त्यावेळी त्यांची किंमत होती परिक्षेतील ५-७ गुण. आज आपण त्यांचा आस्वाद जास्त जाणकारीने घ्यावयाचा प्रयत्न करणार आहोत. उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, अनुप्रास, यमक, व्यतिरेक, इत्यादी ५०-६० अलंकार मम्मटाच्या काव्यप्रकाशात दिले आहेत.

झाशीची राणी - मूळ छायाचित्र (??)

लेखक यकु यांनी शुक्रवार, 17/12/2010 04:21 या दिवशी प्रकाशित केले.
आंतर्जालामध्ये फेरफटका मारत असताना एका ब्लॉगवर हे छायाचित्र दिसले. हे झाशीच्या राणीचे मूळ छायाचित्र आहे असा दावा इतिहासाचा विद्यार्थी असलेल्या त्या हिंदी ब्लॉगलेखकाने केला आहे. कलकत्त्यात राहाणारे इंग्रज फोटोग्राफर जॉनस्टन आणि हॉटमनकडून 1850 मध्येच हे छायाचित्र काढण्यात आले होते आणि अहमदाबादचे रहिवासी चित्रकार अमित अंबालाल यांच्या संग्रहात उपलब्ध आहे असेही तो म्हणतो.

नाताळची चाहूल!

लेखक स्वाती दिनेश यांनी शुक्रवार, 17/12/2010 03:58 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता सगळीकडे ख्रिसमसचे वातावरण आहे,ते वातावरण सगळ्यांमध्ये वाटावेसे वाटले म्हणून हा इतरत्र पूर्वप्रकाशित लेख - नोव्हेंबर सरत आला की नाताळची चाहूल लागते.दुकानादुकानातून मोठीमोठी ख्रिसमसची झाडे सजू लागतात.दिव्यांच्या रोषणाईने करड्या,ढगाळ संध्याकाळी थोड्या रंगीत होतात,त्यात 'जान' आल्यासारखी वाटते.पोस्टातून भेटकार्डे, भेटपाकिटे पाठवण्यासाठी गर्दी होते.नाताळचे खास बाजार मैदानात,चर्चच्या आवारांत, नदीकाठी भरायला लागतात.हौशे,गवशे आणि नवशांची गर्दी तेथे व्हायला लागते.मेणबत्त्यांचे असंख्य प्रकार,चांदण्यांच्या आकाराचे आकाशदिवे, रेनडियरची वीजेवर लुकलुकणारी गाडी,दिव्

मध्यरात्र..!!

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 17/12/2010 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यरात्री कधीतरी येते जाग कशी कुणास ठाऊक ...? मी बघत बसतो खिडकीतून डोळे किलकिले करून माझ्या खिडकीतून दिसणारे आभाळ नि खिडकीतून दिसणारे हे पारिजातकाचे झाड मध्यरात्री कधी जाग आली की झाडावर ओठंगलेला चंद्र दिसतो माझ्या सुरक्षित अंतरावरून हे दृश्य सुंदर मस्त दिसतेय !! चीडीचीप्प रात्र नि हे जीवघेणे झाड ध्यान लावून बसलेले.... बायको मस्त गाढ झोपलेली नि मी असा बेचैन मी उठतो नि किचन मध्ये जातो सकाळी काहीच नसणारे झुरळे आता मस्त फिरत असतात अन्न-कण शोध मोहिमेवर .... कोठे लपतात नि कोठून येतात अचानक कुणास ठाऊक.. ?
काव्यरस

पुन्हा तुझीच वाट पहात आहे

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 16/12/2010 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
तू उशीरा येण्याची आता सख्या सवय झाली आहे तरी ही टेबलावर जेवण अन दारावर डोळे ठेवून मी पुन्हा तुझीच वाट पहात आहे अश्यातच ... आयुष्याच्या पानावरती नव्यानेच लिहिलेले काही क्षण मन पटलावर पुन्हा एकदा थैमान घालू लागले.. अन विचारांच्या वादळात अनेक अनुत्तरीत प्रश्न पुन्हा एकदा ह्रदयाच्या दारावर अस्त व्यस्त पणे धडकू लागले का रे सख्या असा करतोस ?