शेवटी "कुकर्म" अंधारातच उरकावे लागले...
लेखनप्रकार
पुण्यात मनपामध्ये जो राडा झाला, त्याबद्दल काय प्रतीक्रीया द्यावी , हे लोक काहीतरी निर्णय घेतात आणि आपण फक्त "प्रतीक्रीयावादी" बनुन प्रतीक्रीया द्यायच्या आणि परत आपासतात वाद घालायचा, हे कुठपर्यंत चालणार ? महाराष्ट्रात हे जातीपातीचे, जातीयद्वेषाचे टोकाला पोहोचलेले राजकारण कधी संपणार ? हे न संपणारे प्रश्न आहेत. आपापसात वैचारीक मतभेत जरुर असतील परंतु त्यात जो द्वेष आणि कडवटपणा येतो आहे त्याला जबाबदार कोण ?
पुणे महापालीकेने केवळ संख्याबळाच्या आधारावर जो तुघलकी निर्णय घेतला आणि एखाद्या अतिरेक्याला जेरबंद करावे तसे प्रचंड पोलीस बंदोबस्तात रात्रीच्या अंधारात घाईघाइने हे कर्म्र केले त्याला "कुकर्म" नाहीतर काय म्हणावे ?
इतिहास "इतिहासजमा" करण्याचा हा प्रयत्न निषेधार्ह आहेच आहे परंतु स्वराज्याच्या उभारणीत त्याकाळी त्यांचे काहीतरी योगदान असेलच ना त्या योगदानालाही यांनी मातीमोल केले. अनादीकलापासुन ब्राम्हणांनी विद्यादानाचे आणि क्षत्रीयांनी राष्ट्रनिर्माणाचे कार्य केले, पुर्वी राजे-महाराजे आपल्या राजपुत्रांना विवीध प्रकारच्या विद्या मिळवण्यासाठी आश्रमात पाठवत असत मग याच बाबतीत हा वाद का ? हा फक्त जातीय द्वेष नाही का ? ब्राम्हण जातीविषयी इतका कडवट जातीय द्वेष करुन खुपच मन:शांती आणि जग जिंकल्याचे समाधान मिळाले का ? आणि मिळत असेल तर आपले मनापासुन अभिनंदन ! पुणे महापालीकेने पुण्यातील बाकी सर्व प्रश्न बाजुला सारुन सर्वात महत्वाचा असणारा हा प्रश्न तातडीने सोडवण्याची जी तत्परता दाखवली व एका रात्रीत पुणे शहराचे सर्वच प्रश्न सोडवले त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन !!
वाचने
2420
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
पुणे महानगपलिकेच्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांना ' महाराष्ट्र भुषण ' जाहीर करावे , किलोभर कांदे आणि पोतेभर साखर त्यांना या थोर कार्याचे स्मृतीचिन्ह म्हणुन देण्यात यावे.
तसेच 'मिस्टर महाराष्ट्र' नावाच्या इसमास भारतरत्न देण्यात यावे व त्याचे नाव त्वरीत शांततेच्या नोबेल करता पाठविण्यात यावे अशी शिफारिश करत आहे.
गोब्राम्हणप्रतिपालक, सिंहासनाधिश्वर, राजाधिराज शिवछत्रपती महाराजांना खरे पाहता गुरुची गरजच नव्हती, ते एक स्वयंभू व्यक्तिमत्व होते, गेल्या हजार वर्षात असा राजा झाला नाही, पुढे होणार नाही, त्यांच्या गुरुविषयी आपण का बोलावे, त्यांचे व्य्क्तीमत्वच ईतके उत्तुंग होते की आपले विचारही त्यां उंचीर्यंत पोहोचत नाहीत, मग हे चर्चेचे गु-हाळ कशासाठी ही चर्चा केल्याने काय होईल, महाराष्ट्रातले काही लोक म्हणतात हे त्यांचे गुरु होते, काहींचे म्हणने आहे ते नाही हे होते, उगाच वाद वाढतो आहे, त्या वादाचे आता राजकारण होत आहे. बालपणी गुरु असल्यामुळे शिष्याच्या व्यक्तिमत्वाला एक दिशा मिळते, विचार मिळतो, परंतु स्वयंभु व्यक्तिमत्वाच्या शिष्याला गुरु असला काय अन नसला काय काय फरक पडतो ? मग हा वाद कशासाठी, या वादचा मुळ उद्देश काय ? सामान्य माणसाच्या जीवनात याने काय फरक पडेल ? या वादाला वैचारीक क्रांती म्हणायचे का ?हे आपल्याच मागील लेखातील विचार आहेत ना ? मग एका स्वयंभू माणसाच्या सो-कॉल्ड गुरुचा पुतळा हलवला गेला त्यावर आज लगेच तुम्ही त्याला 'कुकर्म' वगैरे म्हणुन धागा का काढलात बॉ ? एका बाजुला ठाम उभा राहून लिहा की :) का तुमचा स्वतःचाच काहीतरी वैचारीक गोंधळ आहे ? संपादक मंडळाने ह्याची गंभिर दखल घेउन असे मुद्दाम काढले जाणारे (कही ह्या बाजुने तर कधी त्या) खोडसाळ धागे नियंत्रणात आणावेत अशी विनंती.
In reply to गोब्राम्हणप्रतिपालक, by परिकथेतील राजकुमार
सहमत आहे.
सदर धागा संपादित करावा...
वाटल्यास भारतात अंधार झाल्यावर करावा कारण शीर्षकही तसेच आहे.... :)
In reply to गोब्राम्हणप्रतिपालक, by परिकथेतील राजकुमार
तुमचा आक्षेप नक्की कशाला आहे? तुमच्या मते गुरु नसलेल्यांचा पुतळा काढून टाकल्याला, की ते करण्यासाठी रात्रीची वेळ निवडल्याला?
जोरदार अनुमोदन
आवाक्याबाहेर गेलेली महागाई, रोज बाहेर येणारी मंत्र्याच्या भ्रष्ट्राचाराची प्रकरणे, लवासा ह्या पासुन जनतेचे लक्ष विचलित करण्याचा हा एक अतिशय जाणिपुर्वक डाव आहे. पण हा डाव खेळणार्यांना एक गोष्ट समजत नाहि कि त्यांच्या शुद्र राजकिय हव्यासापोटी महाराष्ट्राला ले काहि दशके मागे नेत आहेत..
जनतेने पुढल्या निवडणुकीत ह्याचे उत्तर द्यावे...
पुण्यात जल्लोष चालु आहे आणि तुमचं आपलं काहितरीच कुकर्म वगैरे!.. हा पुण्यात उरलेला शेवटचा प्रश्न होता.. आता पुतळा हटवल्यावर कसे सगळे आबादीआबाद आहे.
जाहिरातः यामुळे झालेला"पुण्यातील जल्लोष" इथे वाचता येईल. जरूर वाचा.
त्रिवार अभिनंदन !!