Skip to main content

व्हेजिटेबल ऑ ग्रातिन : Veg Au Gratin...अर्थात बेक्ड व्हेज

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी शनिवार, 18/12/2010 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : दीड कप वाफवलेल्या भाज्या दीड कप व्हाईट सॉस ( रेसिपी पुढे देते आहे) २-३ क्युब्ज चीज बटर व्हाईट सॉस साहित्य : दीड tbsp बटर दीड tbsp मैदा दीड कप दूध चवीपुरते मीठ ताजी ताजी मीर पूड (आपल्या खलबत्त्यात जर्राशी खरबरीत बनवलेली असेल तर उत्तम) व्हाईट सॉस कृती : पॅन मध्ये बटर वितळवा..... फक्त वितळवायचे आहे... पुढे गेले तर काळे काळे होते. त्यात मैदा घाला. छान परतवा. मैद्याचा कच्चटपणा गेला पाहिजे. पण रंग बदलु देउ नका. साधारण फेस येणं (मैद्याला :) ) बंद झालं कि मग हळू हळू दूध घाला. सतत हलवत रहा. गुठळ्या होउ देउ नका.

संजयदॄष्टी

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 18/12/2010 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
असावी एक "संजय दृष्टी" आपल्या जवळ आपल्याच मनातले महाभारत पहाण्यासाठी. कारण, वागत असतो कधी कधी आपण धृतराष्ट्रा प्रमाणे , जन्मजात आंधळे असल्या सारखे किंवा स्वतःच बांधुन घेतो स्वत:च्याच डोळ्यांवर पट्टी गांधारी सारखी, पतिव्रतेचा आव आणून.....!!!
काव्यरस

नाताळ खाऊ : चॉकलेट ट्रफल्स

लेखक स्वाती२ यांनी शनिवार, 18/12/2010 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
नाताळ म्हटला की इथे वेगवेगळ्या प्रकारच्या डेझर्टसची एकच गर्दी होते. वेगवेगळ्या प्रकारचे केक्स, पाय, कुकीज आणि विविध प्रकारची चॉकलेटं. त्यातलाच माझा आवडता प्रकार म्हणजे ट्रफल्स. तोंडात टाकताच विरघळणारे आणि बनवायलाही अगदी सोप्पे. तसेच बेसिक रेसिपीत फ्लेवरिंग किंवा वरुन लावायचे कोटिंग बदलून वेगवेगळ्या प्रकारचे ट्रफल्स करता येतात.

स्नेहाच्या ठिकाणाचे कामसंबंध

लेखक सन्जोप राव यांनी शनिवार, 18/12/2010 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
"स्नेहाच्या ठिकाणीच कामसंबंध येणार, बाळीशा." काड्यापेटीतली काडी तंदूरी चिकन चघळावं तशी चघळत हणम्या म्हणाला. "ही पुनरावृत्ती आहे. टॉटॉलॉजी. स्नेह नसेल तर कामसंबंध कसे येणार? आणि आले तरी त्रास नाही का होणार?" "हणम्या, काही भलतंसलतं वाचू नकोस. तुला 'काम' या शब्दाचा एकच अर्थ माहिती आहे, हा लेका तुझा दोष आहे. काम म्हणजे कर्म. मराठीत सांगायचं तर वर्क. इथं अर्थ हा असा आहे." हणम्यानं काडी उलटी करुन तोंडात घातली आणि काडीवरचा गूल लॉलिपॉपसारखा चोखायला लागला. हणम्याबरोबर जगायचं म्हणजे अशा गोष्टींची सवयच करुन घ्यावी लागते. पण हणम्याचे हे असे 'वन ट्रॅक माईंड' आहे. 'काम' या शब्दाचा त्याला एकच अर्थ ठाऊक आहे.

फुला पानांची नक्षी (रांगोळी)

लेखक जागु यांनी शनिवार, 18/12/2010 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
ही मी काढलेली दिवाळीतील रांगोळी आहे. ह्या रचनेसाठी शेवंती, झेंडू, त्याच्या पाकळ्या, गुलछडी गावठी गुलाबाच्या पाकळ्या, हिरवी पाने वापरली आहेत. जसे सुचले तशी रचत गेले फुल. गुलछडीच्या नैसर्गिक बाक आलेल्या देठांमुळे मला मध्ये गुलछडीचे चक्र करता आले आणि वर दोन फुले एकमेकांना फ्रिहॅन्डकरुन पाकळ्या करता आल्या.

निरुपयुक्त

लेखक नगरीनिरंजन यांनी शनिवार, 18/12/2010 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
सुटकेस घेऊन पुरू पुढच्या दाराशी आला आणि क्षणभर थबकला. मंद आवाज करीत एका लयीत सरकते दार उघडत असताना त्याने वळून घराकडे एक नजर टाकली. घर अगदी शांत आणि स्तब्ध होतं. अंजली आणि प्रांजल दोघेही घरी नव्हते. इतरवेळी किणकिणणारा होममॅनेजरचा आवाजही बंद होता. जणू त्याच्या अस्तित्वाची दखल घेण्याची गरज त्या यंत्रालाही वाटत नव्हती. तो घरातून बाहेर पडतोय हे आधीच अपेक्षित असल्याप्रमाणे होममॅनेजरने सगळे दिवे, एसी वगैरे बंद केलं होतं. स्वीपर रोबोज, शेफ रोबोज वगैरे काम संपवून क्लॉजेटमध्ये विसावले होते. घरात एक थंड आणि निर्विकार शांतता भरून राहिली होती. पुरुची नजर एकेका वस्तूवरून फिरू लागली.

हॉट विंग्स्

लेखक गणपा यांनी शनिवार, 18/12/2010 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आज बर्‍याच दिवसांनी तुमच्या सेवेसी परत हजर होतोय. :) नाताळ तोंडावर आलाय. अमेरिका युरोप सारख दणक्यात नसल तरी इथेही नाताळाची हवा जोर धरु लागलीये. नविन वर्षाच्या पार्ट्यांचे आत्तापासुनच मनसुबे रचले जाताय. नाच गाणी खाणं आणि पिणं नुसता जल्लोश असणारे एका आठवड्या नंतर. टारुने एका धाग्यात बार्बेक्युसाठी काय पदार्थ करता येतील अस विचारल होत. तेव्हा पासुन डोक्यात चिकन विंग्स् फडफडत होते. अनायसे काही मित्र जमायचेहोते काल, तर म्हटल करुन पाहु. जमलेच बरे तर तुम्हाला नव वर्षाच्या स्वागतासाठी अजुन एका पदार्थाची सोबत. तसे हे विंग्स् वेगवेगळ्या पद्धतीने करता येतात.

अळूचा कंद किंवा कांदा

लेखक जागु यांनी शनिवार, 18/12/2010 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
खालील अळूचा कंद हा अळकुड्यांपेक्षा बर्‍याच मोठ्या आकाराचा असतो. लांबी साधारण रताळ्या एवढी आणि त्यापेक्षा बराच जाडाजुडा असतो. अळकुडीचे मोठे रुप कदाचीत हा कंद असावा. अजुन प्रत्यक्षात मी ह्याचे झाड पाहीले नाही पण पेणला हे कंद जास्त मिळतात. मी आत्तापर्यंत ह्या कंदाचा उपयोग आमटीमध्ये घालण्यासाठीच केलाय. नुसती बटाट्यासारखी भाजीही करता येते ह्याची. हा कंद सोलुन पाहीला की आतुन थोडा गुलाबी छटा आलेला असतो. अळूच्या मुळीसारखा हा चिकट होत नाही. थोडा कडकच असतो. चवही वेगळीच असते.

तो......

लेखक utkarsh shah यांनी शनिवार, 18/12/2010 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रभर इकडुन तिकडे तळमळणे चालु होते त्याचे.रात्रभर झोप लागली नाही. सामान्य माणसासारखे आपण जमिनीवरच झोपतो, जुनाच ब्लॅक अँड व्हाईट T.V. वापरतो, अजुन पण तोच जुना Motorola च मोबाईल वापरतो, साधी कार वापरतो एवढंच नाही तर इतर कलाकारांसारखे विग लावून हिंडत नाही. तरी सुद्धा आपण एवढे अस्वस्थ का हे काही त्याला कळलं नाही. तरी त्यानं झोपण्यापूर्वी एकदा नाही तर दोनदा इन्फिनिटीला झिरोनं डिव्हाईड करून बघितलं होतं आणि दोन्हीवेळा उत्तर सारखंच आलं होतं! काय बरं झालं असेल?

भारताला लष्करे तैयबा सारख्या दहशतवादी संघटनांपेक्षा अतिउजव्या हिंदू गटांकडून अधिक धोका आहे. इति. युवराज.

लेखक गांधीवादी यांनी शनिवार, 18/12/2010 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी नेहमीप्रमाणे **** तारे तोडण्यात प्रसिद्ध असलेले माननीय युवराज (भावी पंतप्रधान) यांनी भारतात/जगात हिंदूंना त्यांची जागा दाखवून दिल्याबद्दल त्यांचे शतश: धन्यवाद. त्यांचे आभार मानावे तितके कमी. 'आज भारताला सर्वात मोठे धोका आहे तो केवळ हिंदू दहशतवाद्यानाकडून' असे सांगून त्यांनी हिंदूंची जी कानउघाडणी केलेली आहे ती नक्कीच प्रशंसेस पात्र आहे. ज्यांना खोटे वाटते त्यांनी घराबाहेर येऊन बघावे, तर काय दिसते. प्रत्येक हिंदू आज हातात तलवार, मशीनगन घेऊन उभा असतो. रोज हजारो लोकं चौका-चौकात मारली जातात. रात्री ८ नंतर कोणीही घराबाहेर पडू शकत नाहीत. कोणीही कोणाचाही कधीही कत्तल करू शकतो.