हे तुमच्या हिरव्या माजाचं लक्षण आहे. अहो, त्या बॉबिटने चॉपिट केल्याला खूप दिवस झाले. नवीन पाशवी धागे वाचले नाहीत का तुम्ही? ते वाचलेत तर नाही म्हणणार बंगळुरला बीजिंगचा धोका आहे म्हणून.
छे भेदाभेद अमंगळ.
इथे तसा काही भेदाभेद झालेला मलातरी आढलला नाही.
तुम्हाला ते तसे वाटले त्याचे कारण कदाचित इतर धर्मांबद्दल अज्ञान हे एखादे कारण असू शकेल.
इथे सिमी वर टीका करणारे आहेत तसे संघावर , व्हॅटीकन वर टीका करणारेही आहेत.
पण मुद्दाम होऊन कोणी धर्मांधपणे टीका करत नाहीत.
योग्य वाटणारा पर्यायच नाही.
>>धार्मिक भेदभाव दिसून येतो का?
नाही. मिपावर 'मुस्लिम बॅशिंग' असलेले लिखाण खूप असते. पण ते धार्मिक भेदभावातून आलेले नसते. ते मनातल्या स्टिरिओटाईपची प्रतिक्रिया असते. म्हणजे तसे लिखाण करणारा एकही सदस्य प्रत्यक्ष व्यवहारात तसे मनात धरून वागणार नाही असे वाटते.
लैंगिक भेदभाव तर लिखाणातही कधी दिसत नाही.
मिपावर 'मुस्लिम बॅशिंग' असलेले लिखाण खूप असते. पण ते धार्मिक भेदभावातून आलेले नसते.
मला वाटतं ते मर्ढेकरांच्या गणपत वाण्याच्या स्वप्नरंजनासारखं 'या जागेवर बांधिन माडी' असतं. तो 'दिल को बेहेलाने के लिये खयाल अच्छा' असतो. कळफलक बडवणे आणि लाठ्या काठ्या घेऊन कोणाला तरी प्रत्यक्ष बडवणे यातलं पहिलं खूप कमी रिस्की असतं.
"....कळफलक बडवणे आणि लाठ्या काठ्या घेऊन कोणाला तरी प्रत्यक्ष बडवणे यातलं पहिलं खूप कमी रिस्की असतं...."
~~ असे असले तरी, राजेश जी....दुसर्यातील रिस्क घेतल्याने झालेले नुकसान (बहुतांशी शारीरिक) भरून निघण्याची किमान काही तरी शक्यता असते; पण कळफलकातून आलेली शलाका प्रसंगी हृदय विदीर्ण करून टाकते त्यावर कोणतीही बाय-पास प्रभावी ठरत नाही.
'रिस्क फॅक्टर' सापेक्ष आहे.....आघात करायचाच असेल तर त्यासाठी लाठीच हवी असते असेही नसते.
इन्द्रा
माननीय कसाब आनि त्याच्या बंधुंनी जर का नुसते कळफलक बडविले असते तर माझ्यासारख्या सामान्य लोकांनी दुर्लक्श केले असते. पण त्यांनी गोळीबार केला त्यामुळे आम्ही कळफलक बडवित आहोत.
मागचे जाउ द्या, पण इथुन पुढे देखिल ते केवळ कळफलक बडवित असतील तर व्यक्तिश मला ते मान्य आहे. त्यांच्या कळफलकातून आलेल्या शलाकेने आम्हि आमचे हृदय विदीर्ण करून घेनार नाहि, उलट त्यांचा सन्मानपुर्वक विचांरांनी सामना करु.
".....उलट त्यांचा सन्मानपुर्वक विचांरांनी सामना करु....."
~~ हा विचार स्तुत्य आहे आणि देव करो असेच होवो.
जग सध्या कायमस्वरूपी शांततेच्या शोधातच आहे. पण तो शोध बंदुकीच्या नळीतून शोधणे शहाणपणाचे कदापिही ठरणार नाही.
इन्द्रा
जग सध्या कायमस्वरूपी शांततेच्या शोधातच आहे. पण तो शोध बंदुकीच्या नळीतून शोधणे शहाणपणाचे कदापिही ठरणार नाही.
तरीही जवळच्या भविष्यात असे शांततापूर्वक काही होण्याची शक्यता दिसत नाही.
"....तरीही जवळच्या भविष्यात असे शांततापूर्वक काही होण्याची शक्यता दिसत नाही."
~~ काही अंशी मान्यही आहे मला....पण शेवटी पेसिमिस्टीक तरी किती काळ राहायचे माणसाने? आज ना उद्या असा एक तरी दिवस....असा एक तरी क्षण येईल की, ज्यावेळी सार्या सुपर पॉवर्सना शांतीच्या नावाने चाललेल्या रक्तसांडाकडे पाहून उपरती होईल, युद्धाची विफलता कळेल....अर्थात तो पर्यंत फार वेळदेखील झाला असेल, पण काहीतरी मिळविण्यासाठी मानवाला काहीतरी किंमत द्यावीच लागेल...फक्त ती जबरी सिद्ध होऊ नये, इतकेच.
इन्द्रा
कळफलक बडवणे आणि लाठ्या काठ्या घेऊन कोणाला तरी प्रत्यक्ष बडवणे यातलं पहिलं खूप कमी रिस्की असतं.
धाग्यात जी चर्चा झाली ती प्रामुख्याने भारतातील ऐतिहासिक गोष्टींची होती. त्यामध्ये मुस्लिमांची कृष्ण्कृत्ये प्रामाणिकपणे नमूद करणे हे मूळ धाग्यांमधील आणि काही सदस्यांच्या प्रतिसादातील चिथावणीखोर वक्तव्याला उत्तर देण्यास आवश्यकच होते. ते उत्तर संस्थळावर टंकण्यासाठी कळफळक बडवणे भाग होते. यात कोणाला लाठयाकाठ्याने बडवण्याचा प्रश्न कुठे आला ?
उठसूठ मुस्लिमधार्जिण्यांशी स्युडो-सेक्युलरपणाची चढाओढ कशाला ?
'मुस्लिम बॅशिंग'
मला नाही तसे वाटत. कुठल्याही अयोग्य गोष्टीवर टीका करणारे धागे लगेच निघतातच. हिंदु धर्मातील अनिष्ट रुढींवर टीका करणारे धागे निघतच नाहीत का? हिंदु संकल्पनांची खिल्ली उडवणारे प्रतिसाद येतच नाहीत का? तसेच ते मुस्लीम समाजाबाबत सुद्धा येतात. जर चुकीच काही असेल तर टीका होणारच.
आणि इथे येणार्यांन फक्त टीका करणारे हिंदुच दिसत असतील पण तुमच्यासारखे मुस्लिमांच्या बाजुने बोलणारे विचारवंत दिसत नसतील तर तो त्या लोकांचा दोष आहे ना. आपण काय करु शकतो त्याला?
म्हणजे दंगलींमध्ये हजारो हिंदु मेले तर ते चालेल पण त्याविरोधात धागे काढले की मिपाकर मुस्लिमविरोधी? का? मिपाकरांनी कलामांची स्तुती केली तर त्याच्याकडे काणाडोळा करायचा. पण कसाब किंवा अफजल किंवा अझहर यांच्यावर टीका केली तर ती मुस्लिम समाज संपवण्याची मनिषा बाळगुन केली असे म्हणायचे. असे का?
कोण्या एका धर्माला टारगेट करुन मिपावर टीका होत असेल तर मला वाटते सर्वात जास्त टीका हिंदु धर्मातील प्रथांवर होते. पण हिंदु त्याबद्दल आरडाओरडा करत नाहीत. गळे काढत नाहीत. आणि मुळात या टीकेवरुन मिपावर धार्मिक भेदभाव दिसुन येतो असे गळे काढत नाहीत. अनिष्ट प्रथा असतील तर बहुतेकांना त्या प्रथा अनिष्ट आहेत हे मान्य असते. जर ते मान्य नसेल तर ते समंजसपणे स्वतःची भूमिका मांडत असतात (या मुद्द्यावर कदाचित दुमत होउ शकते :) ). पण म्हणुन या टीकेचा संदर्भ घेउन धार्मिक भेदभाव दिसुन येतो असे कोणी म्हणल्याचे पाहण्यात नाही.
मुस्लीम भारतचा गौरवशाली इतिहास समजुन घेण्यासाठी आम्ही आतुर आहोत. तुळजापुर, पंढरपुर, सोमनाथची पाडलेली मंदिरे आणि कृरपणे विटंबना केलेल्या मुर्त्या नक्की कुठल्या वैभवाची साक्ष देतात हे आम्हाला कळत नाही. हे आम्ही धर्मांध असल्याचे लक्षण असु शकत नाही.
चुक आहे तर टीका होणारच. महानतम कार्य केले तर स्तुती होणारच. जर कुणी कलामांना नावे ठेवत असेल तर सांगा. झाकीर हुसैन चांगले तबलावदक नाहीत असे म्हणत असेल तर सांगा. ते मुस्लिमे बॅशिंग नक्की होइल. पण सद्यपरिस्थितीत असे काही होते हे मान्य नाही.
दुर्दैवाने यात 'इतर' असा कौलात सहसा आढळून येणारा पर्याय नाही. मी वरील कोणत्याही विकल्पांना स्पर्श करीत नसून मला फक्त धाग्यातील विषयाशी नाते जोडायची कामना असते. प्रतिसादासाठी प्रतिसाद हा इथला धर्म नसून विचारातील सखोलता, समाजजीवनाशी त्याची असलेली बांधिलकी यास प्राधान्य द्यावे असे म्हणतो. साहित्य, कुटुंब आणि सांस्कृतिक संपन्नता दर्शविणारे विपुल लेखन सातत्याने येत असताना त्या प्रवाहाची गंगोत्री कुठली हे शोधण्याचा प्रयत्न करणे अपरिपक्वतेचे लक्षण आहे.
डॉ.यू.म.पठाण सारखी गुणी व्यक्ती, संत वाङ्मय आणि मराठी साहित्याचे गाढे अभ्यासक, जेव्हा 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना' चे अध्यक्ष म्हणून निवडले जातात (तेही पुण्यासारख्या शहरात) त्यावेळी मतदारांनी (जे खुद्द साहित्याशीच निगडीत असतात) त्यांचा धर्म न पाहता त्यांची विद्वत्ताच पाहिलेली असते हे तुम्हालाही मान्य असेल. इथे तुमच्या धाग्यातील विकल्प क्रमांक ४ कडील विचार लागू नक्कीच होतो. डॉ.पठाण यांना मत देणार्याने त्यांच्या जातीचा, धर्माचा अजिबात विचार केलेला नव्हता. मिपादेखील अशा पध्दतीच्या संमेलनाचे छोटेसे का होईना प्रतिबिंबच आहे.
मिसळपाव या संस्थळावर तुम्ही म्हणता तसा [काही प्रमाणात] ट्रेंड असेलही पण त्याचे प्रमाण तांदळात असलेल्या कोंड्याइतपतच; जो 'दुर्लक्ष' नावाच्या सुपाने झाडून टाकता येतो. इथे तांदूळ महत्वाचे माना... कोंड्याला अवास्तव महत्व दिल्यास भाताची चवच बदलेल.
तुम्ही 'कुराण' वाचले असेल गृहीत धरतो... (इथेही मी 'तुमचे कुराण' हा शब्दप्रयोग केलेला नाही हे लक्षात घ्या. कारण गीता, कुराण, बायबल, ग्रंथसाहिब, झेंद अवेस्ता हे ग्रंथ समस्त मानवी समुदायाचे आहेत. फक्त ज्याला जे जास्त भावते तो ते स्वीकारतो आणि आपल्या मगदुराप्रमाणे त्यांच्या नावामागे धर्माचे लेबल लावतो इतकेच....शिकवण तर ग्रंथाची एकच असते)...तर या ग्रंथाच्या प्रवचनात असे आढळेल की, मनुष्य जेव्हा कुराणात लेखनात्मक रचना शोधू लागतो व तेथे ती न आढळल्यास तो ग्रंथाच्या पृष्ठांवर भरकटू लागतो. त्याच्या गोंधळाचे कारण म्हणजे त्याने वाचन सुरू करण्यापूर्वीच मनी ग्रह केलेला असतो की 'आपण धार्मिक विषयावरील एक ग्रंथ' वाचण्यासाठी बसलो आहे. 'धार्मिक विषय' आणि 'ग्रंथ' या दोन्ही गोष्टीसंबंधी त्याची कल्पनाही तीच असते जी सामान्यत: 'धर्म' आणि 'ग्रंथ' संबंधी जनमनात आढळते. लेखनाला एक झालर त्याने वाचनापूर्वीच लावल्याने आणि मग त्या झालरी अनुषंगाने ती छाया पानावर न दिसल्याने त्याची निराशा होत राहते. हा साचाच त्याच्या ज्ञानप्राप्तीच्या मार्गावरील मोठा अडथळा ठरू शकेल.....जो आंसमा शख्स यांच्याबाबतीत इथे होऊ शकतो.
येथील पुष्कळसे सदस्य येथील एकदोन धाग्यांच्या वाचनानंतर (सहभागाशिवाय) शंकाग्रस्त बनत असतात, त्यांची दिशाभूल होण्याचे मुख्य कारण म्हणजे काहीवेळा येथे प्रतिसादात आपल्या मुद्याच्या पुष्ठ्यर्थ वापरली जाणारी उग्र भाषा. याला उत्तर देतादेखील येते पण त्याची खरेतर आवश्यकता नाही. वर म्हटल्याप्रमाणे 'योग्यवेळी थांबणे' ही मात्रा तुम्ही वापरली तर कौलातील शंकांना तुमच्या मनी स्थान राहाणार नाही.
इन्द्रा
प्रतिसाद आवडला.
बहुसंख्य, अल्पसंख्य कोण काय म्हणतेय यापेक्षा 'कट्टर/दुषीत' मतांना मिपावर विरोध होत नाही हे आसमां शख्स यांना पटले की नाही याच खुलासा ते/त्या च करु शकतील.
इंद्रसाहब,
मी येथे सदस्य होणार नव्हतो पण तुमचे लेखन वाचून झालो.
यु म पठाण साहब यांच्या विषयी काय बोलावे? तुमचे म्हणणे पटले. त्यात न पटण्यासारखे काही नाही.
मी काही प्रतिसाद दिले तेव्हा अनेकांनी मी कोण हे चाचपायला सुरुवात केली. म्हणून मी कौल काढला. यात कुठे थांबायचे कळले नसते तर भांडणेच झाली असती.
माझ्या इस्लामी भारत या शब्दांच्या एकत्रीकरणावर लोकांनी वाटेल ते प्रतिसाद दिले. पण त्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य. खुदा त्यांना त्यातून वाचवेल.
माझा अनुभव -
आमच्याकडे कोंबड्यांची कमी नही. मला येथे आलेला अनुभव हा कोंबड्यांच्या भांडणासारखा वाटला. त्यात एक कोंबडी विरुद्ध सर्व कोंबड्या असे असते. पण इतर कोंबड्या त्या कोंबडीला चोची मारतात. पण चोच मारणारी कोंबडी दरवेळी वेगळी असते. प्रत्येक कोंबडी फक्त एकदाच चोच मारते.
म्हण्जे वहीम कुणावरच घेता येत नाही पण एकटा पडलेल्याला वाली पण नाही.
इंद्रा बराच फेमस झालाय. आता त्याला संपादक करायला हरकत नाही.
बाकी तुम्ही आंसमा जो इतिहास शिकला आहे तो नेमका कोणत्या विचारसरणीचा शिकला आहे तो जरा स्पष्ट करा.खरोखर इस्लाम गौरवशाली असता तर जगातील सर्व संपती व ज्ञान इस्लामलोकाशी एकवटले असते.पण तेलाचा पैसा सोडला तर इतर कोणत्याच बाबतीत आज इस्लामी लोक पुढे नाहीत ,असे का?
आंसमा शख्स ताई/भाऊ,
वैयक्तिक घेऊ नये,
इथे असा OPEN FORUM मध्ये चर्चा करताना काही कटू अनुभव येणारच, हेच कटू अनुभव आयुष्य नव्याने जगायला एक वेगळी अनुभूती देतात. भविष्यात जेव्हा जेव्हा आपल्याला अश्या प्रकारचा सामना करावा लागेल , तेव्हा तेव्हा आपण कृपया शांतपणे विचारपूर्वक आपली भूमिका मांडावी. आपण योग्य पद्धतीने आपली भूमिका मांडण्यात सफल झालात तर नक्कीच हि भेग एक दिवस मिटून जाईल.
अल्ला, कृष्ण, कि येशू, कोणताच देव आपला माता-पिता (आणि त्यामुळे माथ्याला लागलेले धर्माचे लेबल) ठरविण्याचा अधिकार आपल्याला देत नाही, आपल्या समूहाकडे बघण्याचा दृष्टीकोन थोडासा वेगळा आहे, पण आपल्या सारख्यांनी जर पुढाकार घेतला तर नक्कीच हे बदलू शकते.
किडे सगळ्याच तांदुळात असतात, तांदुळाचा विचार करा, किड्यांचा नको.
आणि इतर विषयावरच्या चर्चेवर बिनधास्त धिंगाणा घाला .............जग आपलेच आहे.
आसमां,
मुळात कौलच चुकीचा वाटला, "मिपावर" या शब्दाचा अर्थच कळाला नाही. हा एक ओपन फोरम आहे. यापेक्षा भारतात्/पाकिस्तानात/अमेरीकेत/जगात धार्मिक भेदभाव दिसुन येतो का? असा काही प्रश्न असता तर समजता आला असता.
पण मिपावर या शब्दामुळे गल्लत होते आहे.
असो,
आधीही एका ठिकाणी लिहिले होते ते पुन्हा..
जात,धर्म, समुदाय हे एका कंपुप्रमाणे असतात (and vice versa). कंपु हा हळुहळु तयार होत जातो, एकाला एक जोडुन. मग एकदा कंपु तयार झाला की माज येतो आणि कंपु मोठा झाला की तो ईतर कंपुंना आव्हान देत फिरतो. अर्थात आपोआपच दुसर्या कंपुबद्दल तेढ निर्माण होते. हा बहुदा प्राणिस्वभाव असावा.
बाकी तुमचा वैयक्तीक/सांप्रदायिक राग तुम्ही बहुदा सभ्य मार्गाने इथे असा काढत असाल कारण तुमचा कंपु इथे नाही.. ;)
राग नसावा.
बाकीचे कितीहि शेपूट घालू देत...मी मात्र धर्मांध / कळपाने हल्ला करणाऱ्या मुसलमानांच्या विरुद्धच आहे...
आणि तुम्ही मुसलमान अजिबात वाटत नाहीत...
जुन्या बाटलीतली नवीन दारू वाटतेय...अचानक अयोध्या निकालानंतरच कसे काय मुस्लीम आय डी आले एकदम? असो.
श्री/सौ. आंसमां शख्स,
कोणतीही व्यक्ती अमुक एक धर्म पाळते किंवा तमुक जातीत जन्मली म्हणून तिचा तिरस्कार केला जाणे अयोग्य हे मान्य आहे. पण म्हणून कोणत्याही धर्मावर टीकाच करु नये सगळे धर्म चांगलेच आहेत अशा भूपाळ्या गाण्यात कोणता शहाणपणा आहे ?
आपण जी व्यक्ती धर्म/जात/देश यांचे प्रतिनिधित्व करतो तो धर्म/जात/देश यांच्यातील चांगल्या गोष्टींचा अभिमान वाटला पाहिजे आणि वाईट गोष्टींची लाज वाटली पाहिजे. असा परखडपणा तुम्हाला मान्य आहे काय?
मध्यंतरी मी मुसलमान धर्मावर सडकून टीका केली तर एका मिपा सदस्याने मला शिवराळ,गलिच्छ इ-मेल पाठवायला सुरुवात केली. मी हिंदू धर्मावरसुद्धा टीका करतो हे त्या सदस्याने हेतूपूर्वक नजरेआड केले. अशा लोकांना लंबे करणॅ ही फार कठीण गोष्ट नाही. पण मला त्यात रस वाटत नाही.
च्यायला मला वाटले बॉबी डार्लिंग किंबा बेगम नवाझीश अली वर लेख आहे ! श्या !!
आजकाल मिपावरचे जेष्ठ आणि समंजस सदस्य देखील अशा प्रकारच्या लेखनाची दखल घेउ लागलेले बघुन धक्का बसला. आम्हाला राहुन राहुन अशावेळी चप्पलवाल्या अभ्यंकरांची आठवण येते :)
मिपावर
आय. टी - नॉन आय्.टी,
हिरवा माज -इतर माज
देव मानणारे ( अंधश्रद्ध ) - देव न मानणारे ( पुरोगामी , विज्ञानवादी )
संस्कृती रक्षक - संस्कृती भक्षक
गांधीवादी-गोडसेवादी
कांग्रेस्वादी - संघवादी
निवासी-अनिवासी
संपादक्-सभासद
विरजण-श्रीखंड
पतित पती - पीडणार्या पत्नी
पॉपकॉर्न
इ. इ. इ. असे बरेच वैचारिक (!) कंपु आहेत ...
सगळेजण इमाने इतबारे आपापली बाजू प्राण हातावर घेउन लढवत असतात, तुम्हीही तुमची बाजू मांडा की , रडीचा डाव कशाला खेळताय.
अजून थोडी भर घालतो. अतिपरिचयात्अवज्ञा न्यायाने तू या कंपूंकडे दुर्लक्ष केलं आहेस! :-)
उर्मट - विनयशील
उद्धट - सालस
संवेदनशील - असंवेदनाशील
बाकी , एकच मनुष्य 'समय की मांग के अनुसार' वेगवेगळ्या कंपूत असू शकतो असा एक अहवाल आहे.
--असुर
आसमां तै / भौ
सध्या ज्या भूतं-खेतं-आत्मे थिमवर सर्वपित्री अमावस्येच्या मुहूर्तावर लिहिलेल्या कविता एक विशिष्ट समुदायाची ( हिंदू ) चेष्टा करण्याचा प्रकार आहे असं तुमचं मत आहे का ?
जर उत्तर 'नाही' असेल तर का ते सांगाल का?
असे बळेच वाटून घेतल्यास दिसून येतो.. कुठल्याही गोष्टीकडे त्रयस्थ नजरेने बघून विचार केल्यास सगळे आरशासारखे स्वच्छ दिसेल.. आपण ज्या धर्मात जन्मलो त्यातील सगळ्याच गोष्टी डोळे आंधळे ठेवून चांगल्या आहेत असे मानून चालल्यास फार त्रास होतो व त्याची परिणीती अश्या प्रकारचा कौल येण्यात होते.. मिपावर भेदभाव तर कधीच होत नाही व त्यापुढे जाऊन मी हे म्हणेल कि ज्या ज्या व्यक्ती या भारतात स्वतःला "हिंदू-मुस्लीम" ई. धर्माचे म्हणुन घेण्याआधी स्वतःची ओळख "भारतीय" अशी करून देतात त्या त्या व्यक्तींना या देशाचे प्रेमही मिळाले आहे.. पुजनीय अब्दुल कलाम किंवा बॉलीवुडची खान चौकडी यांना कुणीही धर्माच्या आधारावर प्रेम नाही दिले..
कमळास स्वतःची ओळख जगाला दाखवून देण्यासाठी ज्या चिखलात जन्म झाला त्यातून वर यावेच लागते... चिखल अंगावर घेऊन कमळ वर आल्यास त्यात कसले सौंदर्य ?
प्रतिक्रिया
सुधारणा
लिंगभेद ???
In reply to सुधारणा by आंसमा शख्स
हिरवा माज
In reply to लिंगभेद ??? by मिसळभोक्ता
बरेच जण टोपण नावाने वावरत
In reply to हिरवा माज by राजेश घासकडवी
छे भेदाभेद अमंगळ. इथे तसा
In reply to लिंगभेद ??? by मिसळभोक्ता
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म
In reply to छे भेदाभेद अमंगळ. इथे तसा by विजुभाऊ
योग्य पर्याय नाही
म्हणजे?
In reply to योग्य पर्याय नाही by नितिन थत्ते
हे पण वाचा
In reply to म्हणजे? by आंसमा शख्स
सहमत.
In reply to योग्य पर्याय नाही by नितिन थत्ते
सहमत
In reply to योग्य पर्याय नाही by नितिन थत्ते
रिस्क फॅक्टर
In reply to सहमत by राजेश घासकडवी
त्यांचा सन्मानपुर्वक विचांरांनी सामना करु.
In reply to रिस्क फॅक्टर by इन्द्र्राज पवार
शोध
In reply to त्यांचा सन्मानपुर्वक विचांरांनी सामना करु. by गांधीवादी
<<<जग सध्या कायमस्वरूपी
In reply to शोध by इन्द्र्राज पवार
किंमत
In reply to <<<जग सध्या कायमस्वरूपी by शिल्पा ब
राजेश घासकडवी
In reply to सहमत by राजेश घासकडवी
'मुस्लिम बॅशिंग' मला नाही
In reply to योग्य पर्याय नाही by नितिन थत्ते
शब्दाशब्दाशी सहमत.
In reply to 'मुस्लिम बॅशिंग' मला नाही by मृत्युन्जय
ब्यशिन्ग...
In reply to योग्य पर्याय नाही by नितिन थत्ते
कुराणाची शिकवण....
प्रतिसाद आवडला
In reply to कुराणाची शिकवण.... by इन्द्र्राज पवार
+१
In reply to प्रतिसाद आवडला by सहज
पटले
In reply to कुराणाची शिकवण.... by इन्द्र्राज पवार
हम्म............
In reply to पटले by आंसमा शख्स
आंसमा शख्स, कोमंबडी च उदाहरण
In reply to पटले by आंसमा शख्स
आंसमा शख्स ताई/भाऊ, वैयक्तिक
In reply to पटले by आंसमा शख्स
आसमां, मुळात कौलच चुकीचा
In reply to पटले by आंसमा शख्स
आंसमाजी मगदुम साहेबाचा
बाकीचे कितीहि शेपूट घालू
बाकीचे कितीहि शेपूट घालू
In reply to बाकीचे कितीहि शेपूट घालू by शिल्पा ब
श्री/सौ. आंसमां शख्स, कोणतीही
च्यायला मला वाटले बॉबी
मिपावर आय. टी - नॉन
अगदी अगदी वैचारिक आणि
In reply to मिपावर आय. टी - नॉन by पुष्करिणी
यशोतै, अजून थोडी भर
In reply to अगदी अगदी वैचारिक आणि by यशोधरा
>>अतिपरिचयात्अवज्ञा न्यायाने
In reply to यशोतै, अजून थोडी भर by असुर
खव जिंदाबाद!
In reply to >>अतिपरिचयात्अवज्ञा न्यायाने by यशोधरा
किंबहूना असल्याच विषयांवर
In reply to मिपावर आय. टी - नॉन by पुष्करिणी
आसमां तै / भौ सध्या ज्या
शॉल्लेट्ट
In reply to आसमां तै / भौ सध्या ज्या by पुष्करिणी
भूतांना धर्म नसतो ..हॅ हॅ हॅ
In reply to शॉल्लेट्ट by ३_१४ विक्षिप्त अदिती
मिपावर धार्मीक भेदभाव आणि लिंगभेद दिसून येतो का?
कोंबड्या पण मिपा मिपा खेळतात?
धागाकर्त्याने भेदभाव या