हरवलेली डायरी...
ती जुनी डायरीच सापडत नाहिये आज मला
बघितली आहे का कुणी?
इथेच तर ठेवली होती मी..
खिडकी जवळ,
रायटिंग टेबल वर काल रात्री
निजण्या पुर्वी...
काल रात्र खूपच हवा होती
अन खिडकी राहिली होती उघडी
खोली तर गार पडली होतीच
अन मला अशी काय झोप होती लागली...
कुणास ठाउक काय घडले रात्री
न कळले मज काही
किती पानं फड्फडली असतील वार्यानं
वाचले गेले असेल सर्व काही...
माहीत नाही काय काय हरवले आहे
त्या डायरी सोबत...
जुने पत्ते होते काही.. आणि काही नावं
विसरु नये कधीच.. त्या साठी लिहिलेली..
आत्ता आठ्वत नाहीत नीट..
मिसळपाव