कैरीचे फ़ुटे (गोड लोणचे)
आज सकाळीच मंडईत गेले होते तो तिथे ह्या महाराणीचे आगमन झालेले दिसले,
ह्या हंगामातील पहिली कैरी.........पाहूनच तोंडाला पाणी सुटले.
मग काय घेतली पटकन....हो संपायला नको....आणी घरी आल्या आल्य़ा चालू झाले लगेच काम.
प्रथम कैरी स्वच्छ धुवुन - पुसुन घेतली.
त्याच्यावरील साले काढून टाकली, त्याच्या अगदी बारीक फ़ोडी केल्या.एक वाटी फ़ोडी असतिल तर एक वाटी
चिरलेला गुळ, मिरची पावडर- मिठ चविनुसार, घालून सगळे एकत्र करुन ठेवले.
मिसळपाव
व्हेजिटेबल ऑ ग्रातिन ही खूप हॉटेलात मिळणारी डीश आहे. खूपदा ह्यात अननस पण घालतात (नवरतन कोरमा नामक गोड भाजी सारखा). भाज्या बेक करतात आणि त्यावर व्हाईट सॉस आणि चीज घालतात. माझ्या आजे सासू बाईंना 'ह्यात काही लाल तिखट वगैरे' घालत नाहीत का असं प्रश्न पडला होता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता पण मूळ कृतीत लाल तिखट नसते.
कश्मीरी चिकन करी....
साहित्य ;- चिकन १ कि., २ टी स्पून बदाम काप,१/२ कप दही , कांद्याची पेस्ट दिड वाटी, ४-५ लवंगाची भुकटी ,४-५ हिरवी इलायची ,आल लसून पेस्ट २ चमचे, २ टमाटर बारीक कापलेले, गरम मसाला १/२ चमचा,
६-७ काश्मिरी लाल मिरच्यांची पेस्ट (नसेल तर आपली नेहमीची चालेल ),मीठ बस ........
गार्निशिंग साठी कोथिंबीर आणि तळलेले काजू
कृती :- चिकन स्वछ धुवून घ्या ,
(एरवी आपण चिकन करताना आधी ते शिजवून नंतर फोडणी करतो पण काश्मिरी चिकन मसाल्या मध्येच पूर्ण शिजवून