राष्ट्रगीत चालु असतांना अशी हालचाल करणे हे अवमान म्हणुनच गणले जाते. त्यामुळे बसुन रहाणे, खाणे हे जितके अवमानकारक तितकेच अशा प्रकारची अवमानना होऊ नये म्हणुन हालचाल करणे हे सुद्धा अवमानकारकच. एक गुन्हा होऊ नये म्हणुन तसाच दुसरा गुन्हा करणे समर्थनीय नाही. आणि सदर गुन्हा त्याग वगैरे तर अजिबातच नाही.
उलटपक्षी सदर राष्ट्रगीत संपल्यानंतर असे जिथे घडले असेल तिथल्या संयोजकांच्या सहाय्याने जवळील पोलिसस्टेशनमधे राष्ट्रगीत अवमाननासंबंधी फिर्याद दाखल करुन त्या व्यक्तीला कायदेशीर बडगा दाखवणे जास्त योग्य. त्याप्रकारच्या कृत्याला बसलेली कायदेशीर चपराक वस्तुस्थितीसह स्थानिक वर्तमानपत्र, तसेच इतर माध्यमांतुन मांडणे आणि इतर जनतेला योग्य तो संदेश पोहोचवणे हे जास्त योग्य.
आणि हे करणे उत्कट देशप्रेमाच्या अभावापोटी शक्य नसल्यास किमान आपल्यापुरते तरी आपण ज्या देशाचे सुदैवाने वा कसेही, जन्माने वा ऐच्छिक वा कसेही नागरीक आहोत त्या देशाच्या राष्ट्रगीत आणि तत्संबंधी कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन जाणते वा अजाणतेपणी होणार नाही याची काळजी घेतली तरी पुरे.
बॉर!! आता थोडं गंभीरपणे...
जर कोणी खरोखरच असं बसून राहिलेले आढळले तर आहे तिथूनच आमचा जोरदार आवाज टाकून त्याला उभे राहायला सांगू....नाहीच राहला /ली उभा /उभी तर मग राष्ट्रगीत संपल्यावर एक छोटीशी भेट घेऊ आणि बाकी काय reaction मिळते त्यावर अवलंबून....आजारी, अपंग वगैरे असेल तर सूट नाहीतर बूट...आणि हे नुसतं लिहिण्यातले आम्ही नाहीत याची खात्री कुर्ल्यात जाऊन करू शकता...अजुन काही?
आणि हे नुसतं लिहिण्यातले आम्ही नाहीत याची खात्री कुर्ल्यात जाऊन करू शकता...अजुन काही?
ही खात्री कुर्ल्यात गेल्यावर कशी होईल ह्याबाबद कृपया ब्रिफ मधे सांगावे .. औत्सुक्य ताणाना प्रतिसाद. येत्या रैवारी कुर्ल्यात जाण्याचा योग आहे :)
चलो कुर्ला .. (निळा हत्ती)
साधारणपणे फालतू लोकांना चाप लावायचा प्रयत्न झालेला होता आता हे तुम्ही कुठे शोधायचे ते तुम्हीच ठरवा...पण साधारणपणे कुर्ला पुर्वेच्या शाखेत(कशाची शाखा हा प्रश्न असेल तर सोडुन द्या) जर आता आमच्यावेळेसचे जर कोणी असेल तर सांगू शकतात...आता आम्हीच तिथून जाऊन बराच काळ झालेला आहे...
ह्म्म्म .. म्हणजे खात्री करुन घेता येण्याचे चाण्स फारंच कमी दिसतात.
असो , दया कुर्ला मे जितने भी ठिकाण है .. वहा जाके पता लगाव की ये शिल्पा सच कह रही है या झुट...
-एसिपी प्रद्युमन
गुड न्युज,
टार्या आनि मी येत्या रैवारी कुर्ल्यात ट्रीपला जानार आहे, तिथे जौन लौव्ह्गड चे फोटो काढुन टाकनार आहे.
कोनाला यायचे आहे का ?
फी ५०० रु अॅड्व्हान्स फकस्त.
तो कट्टर पाकिस्तानी आहे याची मनात नोंद करेन.. आणि राष्ट्रगीत संपले की पुढे जे करायचे ते करेन.
मी नक्की काय करेन हे माहित करुन घ्यायचे असेल तर एकदा माझ्यासमोर तसे वागा... नंतर आपोआप कळेल. कसे?
मी एकदा (मूम्बई) ३०० हा चीत्रपट बघायला गेलो होतो. तेव्हा जेव्हां राष्ट्रगीत सूरू झाले तेव्हां पूढील रांगेतील २ लोक तसेच खूर्चीला चिकटले होते. हे पाहून त्यांच्या शेजारच्या कॉलेज कूमार ने त्यांना ऊठावयाची वीनंती केली होती तर ते तसेच ढीम्म बसून राहीले हे पाहून राष्ट्रगीत संपल्यावर मी ज्याच्या सोबत गेलो होतो त्याला हे कसे काय म्हणून वीचारले तर तो म्हणाला लक्ष देऊ नकोस ते पाकीस्तानी असतील म्हणून दूर्लक्ष केले हेच जर आमच्या शहरात घडले असते तर........?
सगळ्यात आधी , राष्ट्रगीताला मान देऊन उभे राहाणे म्हणजेच देशभक्ती आहे असे नाही. देशभक्ती ही मिसळपाव वर देशहितार्थ लेख लिहुन सुद्धा साधता येते. :) आमचा अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर जास्त भरौसा असल्याणे आम्ही त्याला जाऊन "बाळ / बाकुळे / काका / काकु , राष्ट्रगीत लागलंय हो .. उभे रहा " म्हणनार नाही.
म्हणुन राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रगिताला उभे रहाणे ह्यात संबंध आहे असे बिल्कुल वाटत नाही ;)
हो ... उद्या शिवाजी राजांबद्दल कोणी वाकडा बोलतांना सापडला तर आम्ही हे अभिव्यक्तिस्वातंत्र्य थोडावेळ उतरवुन ठेवतो. :)
एकंदरीत लोकांची राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, राष्ट्राच्या मानचिन्हांप्रती असलेला आदर आणि त्याचे जाहिर प्रदर्शन आणि त्याचे नियम ह्याप्रती भयंकर गल्लत आहे असे दिसते आहे.
चर्चा उत्तम चालु आहे.
बाकी राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज ह्यांचे महत्व, सन्मान आणि त्यांच्याप्रती अपेक्षित आचरण हा गमतीचा आणि वादाचा विषय आहे.
मात्र सदर गोष्टीतुन कुठल्याही प्रकारे 'राष्ट्रभक्ती सिद्ध होते नाही' असे आमचे स्पष्ट मत आहे.
अवांतर : आमच्या खरडवहीत 'झेंड्याची चड्डी' नामक एक अजरामर असा आंतरजालीय वाद झाला होता. इच्छुकांनी माझी, आनंदयात्री , अदिती आणि धमाल मुलगा ह्यांच्या खरडवह्या चाळुन पहायला हरकत नाही :)
तुर्तास इतकेच, बाकी सवडीने :)
- ( 'राष्ट्रप्रेमाबद्दल' कसल्याही मुर्खपणाच्या कल्पना नसलेला ) छोटा डॉन
एकंदरीत लोकांची राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, राष्ट्राच्या मानचिन्हांप्रती असलेला आदर आणि त्याचे जाहिर प्रदर्शन आणि त्याचे नियम ह्याप्रती भयंकर गल्लत आहे असे दिसते आहे.
सहमत आहे. यावर आपण एक विस्तृत लेख लिहुन सर्व मुद्दे भावना, कायदा, त्यातील तरतुदी, उल्लंघन केल्यास होणारा दंड/कारावास इत्यादी बाबींवर प्रकाश टाकावा.
चर्चा उत्तम चालु आहे.
आपण आल्याने अधिकच चांगली होत आहे.
बाकी राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज ह्यांचे महत्व, सन्मान आणि त्यांच्याप्रती अपेक्षित आचरण हा गमतीचा आणि वादाचा विषय आहे.
सहमत आहे. याविषयी वेगवेगळ्या देशांमधे वेगवेगळे आचार, विचार आणि कायदे आहेत. एखाद्या देशात एखादा कायदासंमत आचार/विचार प्रचलित नसल्यास त्या देशातले सुबुद्ध नागरीक त्या देशाच्या कायदे बनवणार्या संस्थेमार्फत आपणास हवे ते बदल करुन घेण्यासाठी झटत असतात. अन्यायकारक वाटणार्या किंवा असणार्या तरतुदींवर विचारविनिमय करुन अशा तरतुंदीमधे बदल करुन घेतले जातात. याअर्थाने कोणत्याही क्षणी त्या देशात लागु असलेली राष्ट्रगीत, ध्वज इत्यादी संबंधीची आचरण मार्गदर्शक सूत्रे आणि कायदे त्या देशातील बहुसंख्य जनतेस मान्य असण्याची/ नसण्याची शक्यता समसमान असते. काही जणांना त्यातील काही तत्वे अन्यायकारक, जाचक किंवा निर्बुद्धपणाची वाटली तरी त्यांना जनमताचा रेटा वाढवुन अपेक्षित बदल करवुन घेणे शक्य असते. मात्र असा बदल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत लागु असलेल्या तरतुदी जाहिररित्या पाळणे भाग असते. आणि यामधे देशप्रेम, राष्ट्रप्रेम याचा काहीही संबंध नाही.
मात्र सदर गोष्टीतुन कुठल्याही प्रकारे 'राष्ट्रभक्ती सिद्ध होते नाही' असे आमचे स्पष्ट मत आहे.
सहमत आहे. मामा जागेवर नसतांना आम्ही सिग्नलवर कधीच उभे रहात नाही. सिग्नल पाळणे कायद्याने बंधन कारक आहे असे म्हणतात. बर्याच वेळा आमच्याकडून कायदा मोडला जातो. याचा अर्थ आम्हाला देशाबद्दल प्रेम नाही असा होत नाही. :)
आपल्यापेक्षा वयाने मोठ्यांना नमस्कार करणे, ते आल्यावर उठून उभे राहून अभिवादन करणे हे आपल्या संस्कृतीतआदर दाखवण्याचे प्रकार आहेत....असे न केल्याने तसा काहीच फरक पडत नाही...त्यांचा कोणत्याही बाबतीतला मोठेपणा कमी होत नाही किंवा तुम्ही मोठे होत नाहीत...पण एक आचार आहे...
तसेच झेंडावंदनाला उभे न राहणे, झेंड्याची चड्डी घालणे किंवा राष्ट्रगीतासाठी उभे न राहिल्याने तसा काहीच फरक पडत नाही पण तसेच दुसर्या देशातल्या कुणी आपल्या झेंड्याबद्दल वागले तर आपल्याला चालेल का?
आणि असा मान देणे हा show ऑफ नाही हे माझं मत..
जन गण मन हे राष्ट्रगीत आहे हेच आम्हाला मान्य नाही.
ते फार वेगळ्या (आणि नको त्या) कारणासाठी / व्यक्तीसाठी लिहिलेले स्वागतगीत अथवा स्तुतीकाव्य आहे. मिपाचे धुरीणी अजुन प्रकाश टाकतीलच.
ते फार वेगळ्या (आणि नको त्या) कारणासाठी / व्यक्तीसाठी लिहिलेले स्वागतगीत अथवा स्तुतीकाव्य आहे. मिपाचे धुरीणी अजुन प्रकाश टाकतीलच.
पुर्वी माझेही मत असेच होते.
हे राष्ट्रगीत टोगोरांनी पंचम जॉर्ज (अधिनायक) साठी लिहीले असे वाटत असले तरी तसे नाही. कायनॅटीक च्या फिरोदीयांनी त्यावर प्रकाश टाकुन ते कसे नाही ते सांगीतले आहे. पंचम १९१९ मध्ये आले होते. हे गीत १९११ मध्ये लिहीले होते.
मला स्वतःला (व अनेकांना) वंदे मातरम् हे राष्ट्रगीत म्हणुन आवडले असते. पण एकदा आपण राष्ट्रगीत म्हणुन स्विकारले म्हणुन मानतो. ते प्रार्थने सारखे आहे सारखे बदलले तर त्यातली ताकद जाते (हा विषय अजुन वेगळा आहे - लिहीन त्या बद्दल) असे माझे मत.
मी कोलकत्याला पोस्टींग मुळे राहीलो होतो व रबिंद्रनाथ ह्यांची प्रतिभा केवढी मोठी होती त्याने भारावुन गेलो.
हा जगातला एकमेव असा लेखक आहे ज्याने दोन राष्ट्रांना राष्ट्रगीत दिले - आपले व बांगलादेश ला.
कळावे
पंचम १९१९ मध्ये आले होते. हे गीत १९११ मध्ये लिहीले होते.
पंचम जॉर्ज हिंदुस्थानच्या सम्राट्पदी आपल्या स्वतःच्या राज्यारोहण/मुकुटधारणसमारंभप्रसंगी दिल्ली दरबारास जातीने उपस्थित राहिले नव्हते काय? आणि त्याच दौर्यात हिंदुस्थानची राजधानी अधिकृतपणे कलकत्त्याहून दिल्लीस हलवण्यात आली नव्हती काय?
पंचम जॉर्ज यांचा राज्यारोहणसमारंभ १९११ साली झाला होता, असे वाचल्याचे आठवते. (चूभूद्याघ्या.)
अर्थात, केवळ यावरून रबीन्द्रनाथ ठाकुर यांनी 'जनगणमन' हे 'भो पंचम जॉर्ज भूपा'स उद्देशून(च) लिहिले होते अथवा नव्हते, असे काहीही निर्विवादपणे सिद्ध होऊ नये. रबीन्द्रनाथांचा तसा उद्देश होता अथवा नव्हता हे केवळ रबीन्द्रनाथच सांगू शकतील. त्यांचा तसा उद्देश असेलही अथवा नसेलही; कदाचित तसा उद्देश असू शकेल, उलटपक्षी त्यांनी हे गीत 'भारतभाग्यविधात्या ईश्वरा'स उद्देशूनही लिहिले असू शकेल आणि 'भो पंचम जॉर्ज भूपा'चा नेमक्या त्याच वेळी दौरा हा एक योगायोग - आणि 'त्यांनी हे गीत भो पंचमास उद्देशून लिहिले' ही एक वावडी - असेही असू शकेल. नेमके काय ते तेच जाणोत - त्याने काहीही फरक पडू नये.
आणि समजा अगदी त्यांनी ते 'भो पंचमा'स उद्देशून लिहिले (आणि काँग्रेसच्या अधिवेशनात सादर केले) असले, तरी त्यातही काही गैर आहे असे वाटत नाही. खुद्द काँग्रेसच्या तत्कालीन अधिवेशनांत 'राजनिष्ठेचा ठराव' हा एक भाग असे, असे वाटते. आणि 'हिंदुस्थानच्या रहिवाश्यांची ब्रिटिश साम्राज्यांतर्गत न्याय्य हक्कांसाठी प्रातिनिधिक सभा आणि चळवळ' असे काँग्रेसचे त्या सुरुवातीच्या काळातले स्वरूप लक्षात घेता, हेही साहजिकच होते. 'संपूर्ण स्वराज्याच्या मागणी'पर्यंतचा काँग्रेसचा प्रवास हा त्यामानाने बर्याच नंतरचा असावा. (चूभूद्याघ्या. आणि काहीश्या वेगळ्या विषयावर बोलायचे झाल्यास, गांधींचीही अगदी सुरुवातीची भूमिका ब्रिटिश साम्राज्याशी एकनिष्ठतेची - परंतु ब्रिटिश साम्राज्यांतर्गत समान वागणुकीच्या अपेक्षेची आणि हिंदी लोकांच्या ब्रिटिश साम्राज्यांतर्गत न्याय्य हक्कांच्या मागण्यांची आणि त्यासाठी प्रसंगी लढ्याची - होती, असे वाटते. आणि तत्त्वतः त्यात काही गैर होते, असेही नाही. परंतु हे होत नाही आणि होणे नाही असे अनेक प्रयत्नांती लक्षात आल्यावर मग 'चले जाव'च्या मागणीप्रत येणे प्राप्तच होते. असो.)
दुसरी गोष्ट म्हणजे, रबीन्द्रनाथांनी हे गीत 'भो पंचमा'स उद्देशून लिहिलेले असण्याची शक्यता जरी मानली, तरी 'भारतभाग्यविधात्या ईश्वरास' उद्देशून असण्याचा अर्थही फिट्ट बसतो हे लक्षात घेता, त्या (दुसर्या) अर्थाने हे गीत भारताचे राष्ट्रगीत म्हणून योजण्यातही काही गैर नसावे. तसे पहायचे झाल्यास 'सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा' या गीतासही भारतात राष्ट्रगीताच्याच तोडीचा मान आहेच की! आणि त्या एका गीताचा अर्थ लक्षात घेता त्यात काहीही गैर नाही. मग भले त्या गीताच्या कर्त्याचे जागतिक इस्लामवादाबद्दल (Pan-Islamism अशा अर्थी) आणि ('पाकिस्तान' हा शब्द त्याने भलेही वापरला असो-नसो, पण) 'पाकिस्तान-संकल्पने'च्या मागणीबद्दल काही का विचार आणि भावना असोत. मग 'सारे जहाँ से अच्छा' चालते, तर 'जन गण मन'नेच काय घोडे मारले आहे?
(अवांतरः रबीन्द्रनाथांनी हे गीत 'भो पंचम जॉर्ज भूपा'स उद्देशून लिहिलेले नव्हते, तर ते एक देशभक्तिपर गीत होते, हे दाखवू पाहणारा श्री. पु.ल. देशपांडे यांचाही एक लेख पूर्वी वाचनात आल्याचे आठवते. बहुधा 'वंगचित्रे'मध्ये. खात्री नाही.)
राष्ट्रगीताचा मान सगळेच ठेवतातच..तस्मात तो शारिरिक किंवा मानसिक दृष्ट्या अक्षम असेल असं गृहित धरून दुर्लक्ष करेन.
मला उभे रहा वैगरे सान्ग्याची गरज आहे असे वाटत नाही. राष्ट्रगीत कुठेही व कधीही ऐकु आले कि मी आपसुकच उभी रहाते व तुम्हीही ही तसेच करत असाल अशी खात्री बाळगते. तसेच संस्कार मनावर लहानपणापासुनच झाले असावेत.
** मला थोडा राग येईल पण मी पुढे काही करणार नाही. **
याला वोट केले आहे.
--------
येथे मी काय करेन असेच पर्याय लिहिले आहेत. मी आतापर्यंतच्या माझ्या अनुभवावरुन हे दिले आहे, मी काय करेन या पेक्षा मी काय केले हे देत आहे.
माझ्या समोरचा बसल्याने काही गोंडस चेहरे न्याहाळायला मदत होत असेल तर मी अश्यांना बसण्यास प्रोत्साहन देईन. (टार्या सारखे मित्र बरोबर असतील तर दमदाटी करुन बसायला सांगेन ;-) )
बसलेली व्यक्ती काहीतरी चविष्ट खात असेल आणि त्यातील वाटा मिळायची शक्यता असेल तर मीही शेजारी जाउन बसेन.
मलाही बसायचा चानस मिळणार नसेल तर मत्सरामुळे त्याला हिणवुन उभे रहायला सांगेन नाहीतर मीही बसेन.
मी तत्क्षणी त्याच्याजवळ जाऊन
म्हणजे राष्ट्रगीत चालू
In reply to मी तत्क्षणी त्याच्याजवळ जाऊन by शिल्पा ब
हो...असा त्याग करावाच लागतो.
In reply to म्हणजे राष्ट्रगीत चालू by अवलिया
राष्ट्रगीत चालु असतांना अशी
In reply to हो...असा त्याग करावाच लागतो. by शिल्पा ब
बॉर!! आता थोडं गंभीरपणे... जर
In reply to राष्ट्रगीत चालु असतांना अशी by अवलिया
आणि हे नुसतं लिहिण्यातले
In reply to बॉर!! आता थोडं गंभीरपणे... जर by शिल्पा ब
साधारणपणे फालतू लोकांना चाप
In reply to आणि हे नुसतं लिहिण्यातले by टारझन
ह्म्म्म .. म्हणजे खात्री करुन
In reply to साधारणपणे फालतू लोकांना चाप by शिल्पा ब
कराच...आम्ही पन तेहरानमधुन एक
In reply to ह्म्म्म .. म्हणजे खात्री करुन by टारझन
बोला मॅडम, फोन पायजे, अव,
In reply to कराच...आम्ही पन तेहरानमधुन एक by शिल्पा ब
गुड न्युज, टार्या आनि मी
In reply to आणि हे नुसतं लिहिण्यातले by टारझन
आपण अल्यालाल्याच रोडीज मिळवले
In reply to आणि हे नुसतं लिहिण्यातले by टारझन
पहिले उत्तर
तो कट्टर पाकिस्तानी आहे याची
http://timesofindia.indiatime
In reply to तो कट्टर पाकिस्तानी आहे याची by अवलिया
म्हातारी माणसं
In reply to http://timesofindia.indiatime by नरेशकुमार
कडक प्रतिसाद. जियो.
In reply to तो कट्टर पाकिस्तानी आहे याची by अवलिया
मी असे केले तेव्हा त्यांनी
In reply to कडक प्रतिसाद. जियो. by बबलु
सहमत
In reply to तो कट्टर पाकिस्तानी आहे याची by अवलिया
सगळ्यात आधी , राष्ट्रगीताला
बाकी आपण सौता णुसतं उभंच
In reply to सगळ्यात आधी , राष्ट्रगीताला by टारझन
गल्लत होते आहे ...
एकंदरीत लोकांची राष्ट्रभक्ती,
In reply to गल्लत होते आहे ... by छोटा डॉन
आपल्यापेक्षा वयाने मोठ्यांना
In reply to एकंदरीत लोकांची राष्ट्रभक्ती, by अवलिया
माझा प्रतिसाद नीट वाचला तर
In reply to आपल्यापेक्षा वयाने मोठ्यांना by शिल्पा ब
जन गण मन हे राष्ट्रगीत आहे
जन गण
In reply to जन गण मन हे राष्ट्रगीत आहे by परिकथेतील राजकुमार
शंका
In reply to जन गण by रणजित चितळे
राष्ट्रगीताचा मान सगळेच
http://www.misalpav.com/node/
In reply to राष्ट्रगीताचा मान सगळेच by पर्नल नेने मराठे
थन्क्स
In reply to http://www.misalpav.com/node/ by नरेशकुमार
** मला थोडा राग येईल पण मी
माझ्या समोरचा बसल्याने काही
जर थेटर
पन..
मग काय वंदे मातरम लावतात?
In reply to पन.. by मी-सौरभ
सिनेमागृहात राष्ट्रगीत का