हेल्थ फूड्स खरंच हेल्थी असतात?
हल्ली बाजारात सगळीकडे 'हेल्थ फूड्स ' ची धूम आहे. जिथे बघावं तिथे 'कोलेस्टेरोल फ्री' , 'फायबर रिच', 'शुगर फ्री', 'लो कॅल' इ. लेबलं लावून कितीतरी खाण्याचे पदार्थ किंवा संबंधित पदार्थ, दुकानाच्या किंवा मॉल च्या प्रत्येक शेल्फातून आपल्याला खुणावत असतात. ह्यातील बहुतांश प्रोडक्ट एका चमचमीत किंवा एरवी 'unhealthy' समजल्या जाणाऱ्या पदार्थाचा 'देवकृपेन' जणू आपल्याचसाठी बनवलेला आरोग्यपूर्ण अवतार असतो. उ. दा. फ्रायम्स, चीज बॉल, चीझी वेफर, बिस्कीट इ.
सोनेरी पानं
सोनेरी पानं उगीच का होतात सोनेरी ?
हिरवाईचे दिवस जपतात ते कितीतरी
अखेर गळतात.. एक दिवस ते ही
स्वागत पडुन नव्याचे करतात
तरुणाई चे जल्लोषात आगमन मग
करते फुटलेले नवे कोंब मुसमुसलेले
वळते अखेर त्यांचे ही वय एक दिवस
अटळ सत्यच ते सांगुन जातात
सोनेरी झाले म्हणून नव्याची नाही अवहेलना
अवमानात नाही कुठलीच प्रेरणा
उन-पावसाचे वाचलेच संपुर्ण पुस्तक
न बोलता बरेच काही सांगुन जातात
ती सोनेरी पानं.
तत्काळ मदत हवी आहे. (कॅनडा मध्ये)
माझा भाचा नील (वय ३) मुंबईने शिकागो येथे त्याच्या आईबरोबर जात होता. आज त्याचे विमान शिकागो येथे पोचणार होते. त्याचे वडील (म्हणजे माझा मेव्हणा) त्यांना शिकागोला भेटणार होते.
पण नीलला विमानातच अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्याच्या विमानाने जवळच्या विमानतळावर emergency landing केले आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवले आहे. तो आत्ता कॅनडातील Goose Bay येथे आहे. त्याची तब्येत आता स्थीर आहे आणि तो उपचार घेत आहे.
त्याच्या बरोबर फक्त त्याची आई आहे. त्याचे वडील शिकागोला अडकले आहेत आणि त्यांच्याजवळ कॅनडाचा valid visa नसल्याने त्यांना सोमवारपर्यंत Goose bay येथे जाता येणार नाही आहे.
चिकन मसाला आणी बटर रोटी
वषाट
परशा आपल्या शेळ्या घेवुन आज लौकरच आला होता. परश्याने शेळ्या वाडग्यात कोंडल्या. तान्ह्या-पार्हाट्या शेळ्या वेगवेगळ्या बांधल्या. वाडग्याचा झोपाटा पध्दतशीर लावुन झपाझप टांगा टाकीत म्हणजे जवळजवळ पळतच तो घराकडे निघाला.
कधी घरी जाईन अशी अनावर घाई त्याला झाली होती. त्याला कारणही तसेच घडले होते. आज दुपारी ओढ्याला पाणवठ्यावर हिवर्याच्(एक गाव) एक शेळ्यांचं खांड आलं होतं. त्या शेळ्यांचा आणि परशाच्या खांडाचा मेळा झाला होता. त्या गडबडीत हिवर्याच्या खांडातलं एक बकरु चुकून परशाच्या खांडात आलं होतं.
परशा घरी आला त्यावेळेस तात्या, परशाचा बाप ओट्यावर बिडी फुंकीत बसला होता.
तीचे डोळे
" रोखूनी मजला पाहू नका डोळे हे जुल्मी गडे कशीदा मी काढु कशी " असे काहीसे गाणे कधीतरी रेडीओवर ऐकले होते.
ते वय गाणी ऐकून मोहरायचे नव्हते. मग कुठल्यातरी वयात तसे डोळे पाहिले किंचीत पिंगट.... पाणीदार... आणि एखाद्या छान चित्राला फ्रेम असावी अन त्या फ्रेममुळे चित्राला आणखीनच शोभा यावी किंवा सुंदर खडा कोंदणामुळे आणखीनच तसे काजळाच्या फ्रेममध्ये दिसणारे ते डोळे मला अचानक काहीतरी वेगळीच जाणीव देवून गेले.
ती पहिली नजर पुन्हा कधी अनुभवता येणे केवळ अशक्यच. ज्याने अनुभवली त्यालाच हे कळाते. देव भेटल्यापेक्षाही त्या क्षणात काहीतरी जादूभरे असते.
मिसळपाव