Skip to main content

मराठीतले काही उच्चार.

लेखक स्वतन्त्र यांनी गुरुवार, 10/03/2011 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीत काही शब्दांचे वेगवेगळे उच्चार वेगवेगळ्या प्रकारे लोक करतात. उदा.:- 'बसणार' चा उच्चार 'बश्णार' असे करतात.तर काही 'बसणार' असेच करतात. तसेच असणार-अश्णार 'च','ज' चा उच्चार देखील वेगवेगळा करतात. तर अशा काही शब्दांचे स्वच्छ मराठीत योग्य उच्चार कोणते आहेत यावर माहितगारांनी प्रकाश टाकावा.

गुरुवारचा शेर

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 10/03/2011 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
शाम है जाम है ; सुबह है जाम है दोपहर मे भी जाम है ; इधर भी जाम है ; उधर भी जाम है नजरीया ये आम है ; जहां देखू जाम है . . . . . . . ट्रॅफीक जो बढ गया है ;अब रस्ता ये आम है

उठवू नका मज आता

लेखक निनाव यांनी गुरुवार, 10/03/2011 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
उठवू नका मज आता, मी उरलो जिवंत नाही करू नका चर्चा माझी, कुणाच ज्याची खंत नाही उकरा न शोधा राख माझी, मी अजुन थंड नाही सोबत माझ्या जळले ह्रदय आता ते शिल्लक नाही कैदेतुन वेदनांच्या सुटले आजवर कुणीच नाही नाहीच मी मज आठवण्यात काही एक अर्थ नाही भेटु असे पुन्हा कधी तरी वेगळे आपले मार्ग नाही तुझ्या वरी निष्ठेचे परिणाम कुणासही वेगळे नाही रस्त्यावर उडलो धूर होऊनी आता सावली नाही दिसलो कुठे भासच असावे मी उरलो जिवंत नाही

मुलाखत

लेखक निनाद यांनी गुरुवार, 10/03/2011 05:01 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी विकिवर काम करतांना मुलाखत हा लेख लिहित आहे. हा लेख लिहितांना असे वाटले की मिपावरही याची चर्चा व्हावी. त्या निमित्ताने काही अजून चांगले मुद्दे त्यात अंतर्भूत करता येतील. इथेही कदाचित काही सदस्यांना त्याचा उपयोग होईल. शिवाय काही भाग मला लिहायला जमले नाहीत. ते खाली दिले आहेत. त्या विषयीही चर्चा व्हावी ही अपेक्षा. ही चर्चा करतांना हे मुद्दे तुम्ही स्वतःच मराठी विकीच्या मुलाखत या पानावर नोंदवले तर अजून आवडेल.

चिकन विंग्स्

लेखक सानिकास्वप्निल यांनी गुरुवार, 10/03/2011 03:20 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः ६ चिकन विंग्स् २ टेस्पून आले-लसूण वाटून १/२ टीस्पून लिंबाचा रस १/२ टीस्पून खाण्याचा लाल रंग ( ऐछिक) १ कप टोमॅटो सॉस १ टीस्पून लाल तिखट १/२ टीस्पून हळद १/२ टीस्पून कुटलेली काळीमिरी १ कप मैदा / कॉर्न्फ्लवर मीठ चवीनुसार तेल पाकृ: चिकन विंग्स् ला वाटलेले आले-लसूण, लिंबाचा रस, हळद आणी काळीमिरी चोळून ठेवावी. लाल तिखट, खाण्याचा लाल रंग आणी मीठ लावून एकत्र करणे. मैदा आणी टोमॅटो सॉस एकत्र करून ही पेस्ट चिकन विंग्स् ला लावून , झाकून ४-५ तास मुरू द्यावं. पॅनमध्ये तेल तापवून मंद गॅसवर हे चिकन विंग्स् चांगले तळून घ्यावेत. हवे असल्यास जास्त तेलात ह

निर्नामक

लेखक गोगोल यांनी गुरुवार, 10/03/2011 02:17 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही कुणीच नाही. आम्हाला चेहरा नाही. आमची ओळख नाही. आम्हाला धर्म नाही. आम्हाला जात नाही. आम्हाला पेशा नाही. आम्हाला देश नाही. आम्हाला लिंग नाही. आम्हाला वय नाही. आम्हाला कुठलीही बंधने नाही. आम्हाला कुठलाही उद्देश नाही. आम्हाला एकत्र करणारा फक्त एकच समान धागा .. आम्ही सर्व बंधने झिडकरून देतो आणि मनमुक्त वागतो. आम्ही तुमच्यातीलच आहोत. पण आम्हाला आमची गुप्तता प्रिय आहे. आमचे भेटायचे एकच असे ठिकाण नाही. आम्ही आंतरजालावर भेटतो. कधी आय आर सी चॅट वर, कधी फोरम्स वर, तर कधी विकी वर. आम्ही अनामिक आहोत. आम्ही विस्कळित आहोत. आम्हाला कुणीही नेता नाही.