लेखकसोनल कर्णिक वायकुळयांनी रविवार, 03/04/2011 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या रेताड रखरखाटात
कोणास ठाऊक कशी चिकटून बसलीत ही पाती
आणि कोण सोस त्या वा-याला सुद्धा
ह्या जळजळाटात स्वतः तापत फुंकर घालण्याचा तरी
मृगजळाला सुद्धा भास व्हावा मोरपिसांच्या रंगांचा?
ह्या वेडेपणाच तू नाव आहेस कि कारण हे माहित नाही पण
तुझा हात इथे फिरलाय हे नक्की…
लेखकयुयुत्सुयांनी रविवार, 03/04/2011 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
काल वल्डकप जिकल्यानंतर स्टेशियम वर जो उन्माद बघायला मिळाला त्यात एक घॄणास्पद गोष्ट बघायला मिळाली. हरभजनसिंग आणि युवराजने राष्ट्रीय ध्वज चेहेर्यावरचा घाम पुसायला तसेच नाक पुसायला वापरला. सचिनने तर स्वत:ला राष्ट्रध्वजामध्ये शाली सारखे लपेटून घेतले होते. ही गोष्ट कितीजणांच्या लक्षात आली कुणास ठाऊक?.
लेखकसुधीर काळेयांनी रविवार, 03/04/2011 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
माननीय प्रतिभाताई आणि माननीय मनमोहन सिंग यांना पाठविलेले पत्र
(मूळ इंग्रजी निरोप खाली दिलेला आहे)
मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो कीं आपल्या सर्वांच्या लाडक्या सचिनला आता आपल्या देशाचा सर्वोच्च मुलकी सन्मान "भारतरत्न" देऊन आपण गौरविले पाहिजे.
त्याचे चकित करणारे विक्रम सर्वांनाच माहीत आहेत. पण त्याचे सहकारी खेळाडू त्याला किती मानतात आणि त्याच्यावर प्रेम करतात हे आपणही काल पाहिलेले आहेच.
लेखकमन१यांनी रविवार, 03/04/2011 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार.
नुकतच स्वातंत्र्यवीरांचं "सहा सोनेरी पाने" जालावरुन उतरवुन घेउन वाचलं.
हे "सहा सोनेरी पाने" म्हणजे म्हणजे भारताचा इतिहास नव्हे तर इतिहासाची समिक्षा आहे. इतिहासाबद्दलची सावरकरांची कमेंट्री आहे.(जसं Discovery Of India नेहरुंच्या दृष्टिकोनातल्या प्राचीन ते अर्वाचीन भारतीय घटना आणि समाज मानसाबद्दलच मत -संग्रह होय.)
इतिहासाबद्दल भाष्य करताना ह्या पुस्तकात त्यांनी बर्याचदा " हिंदु पदपादशाही" ह्या त्यांच्याच पुस्तकाचा उल्लेख केलाय. पण हे पुस्तक काही मला जालावर सापडलं नाही.
लेखकअर्धवटयांनी रविवार, 03/04/2011 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या सामन्याच्या मानकर्यांसाठी आणि अर्थात आमच्या लाडक्या सचिनदेवासाठी हे कवन...
गदीमांचे गीतरामायणातील मूळ काव्य इथे मिळेल. काल रात्रभर नाचुन विजयाच्या उन्मादातच लिवलं गडबडीत आहे, मीटर तपासू नये. काही कडव्यांचा क्रम बदलला आहे, पण मुळ चालीवरच म्हणता येइल. (उद्या वेळ मिळाला की.. " देवहो, बघा 'माही'लीला...
लेखककुंदनयांनी रविवार, 03/04/2011 02:02 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही आम्ही सर्व जनता विश्वचषक अंतिम सामन्याचा आनंद लुटत असताना , मुंबईतील कायदा व सुव्यवस्था राखणार्या मुंबई पोलिस दलाला प्रचंड तणावाखाली काम करावे लागलेले असणार आहे.
ही सर्व जबाबदारी समर्थपणे पार पाडल्याबद्दल त्यांना सलाम.
या संबंधीची एक बातमी "इथे"
लेखकविजुभाऊयांनी रविवार, 03/04/2011 01:16 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय क्रिकेट संघाने १९८३ नंतर आज वर्ल्ड कप जिंकला.
विश्वचशक स्पर्धेतील गेल्या तीन मॅचेस मध्ये ऑस्ट्रेलीया पाकिस्तान च्या चित्तथरारक लढतीनंतर फायनल ला श्रेलंकेविरुद्ध महत्वाची मॅच जिंकून भारताने विश्वचषक जिंकला आहे.
भारतीय संघातील सर्व खेळाडुंचे अभिनन्दन.
भारतीय संघ पुर्वी चांगल्या अवस्थेतून अडचणीत येण्यासाठी प्रसिद्ध होता.
पण या विश्वचषक स्पर्धेत मात्र भारतीय संघ अडचणीवर मात करून अत्यंत टेन्स सिच्यूएशन असतानाही तणावावर मात करून जिंकू शकतो हे दाखवून दिले.
आजच्या मॅचमधले तुम्हाला आवडलेले काही क्षण सांगा.
मला आवडलेले काही
१) धोनीने मारलेला शेवटचा षटकार...त्यावेळेस चेंडूसिक्सरसाठी त्याच्या च