Skip to main content

जाहिरातीच्या --चा घोव....

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 31/03/2011 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
जाहिरातीच्या --चा घोव....
रंगलेल्या सामन्यात जाहिरातींचे मांजर आडवे ... कधी शाहरुख ओठांचा चंबू करून मैत्रिणीची वाट पाहतोय... तर ३ अंडामन टीटी खेळताना उच्छाद मांडतायत.....चित्र नेहमीचेच आहे... पण काल ते प्रकर्षाने खटकले शिवाय आपण जिंकलेल्या मॅचचे महत्व वेगळेच....

भिऊ नकोस ...

लेखक नगरीनिरंजन यांनी गुरुवार, 31/03/2011 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
फुलपाखरांमागे धावताना, कधी झोक्यावर हिंदोळताना पावसात भिजून आणि ओल्या मातीत खोपे करताना दगडधोंडे उचकताना अन् काट्याफुफाट्यात हिंडताना कळलंच नाही की तो आहे आणि हळूच कानी म्हणतो आहे "भिऊ नकोस ... पण मी तुझ्या पाठीशी आहे." नवी नव्हाळी फुटताना, सगळं जग फुलताना नवी शिखरे चढताना, सागर पालथे घालताना छातीने पर्वत फोडताना अन् लाथेने पाणी काढताना दुर्लक्ष केलं उद्दामपणे जरी कळलं तो म्हणतोच आहे "भिऊ नकोस ...
काव्यरस

बेदखल

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी बुधवार, 30/03/2011 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
धुराच्या ढगात वेढलेला, आणि चारी बाजूनी घोंगावणा-या चारचाकी यंत्राच्या गोंगाटात, डांबराच्या तापलेल्या रस्त्यांवरच्या करड्या मळकट पट्ट्यांना ओळख देत तल्लीन झालेला तो रंगारी… त्यांनी ह्याला कि ह्यानी त्यांना बेदखल केलंय, हे ओळखण तसं कठीणच. जपणा-या माणसांपेक्षा मुकाट खपणा-या बिन हृदयाच्या यंत्रांची जंत्री वाढली कि हे अस व्हायचंच…

इटालियन लज्जत ... पांढरा पास्ता.

लेखक विनीत संखे यांनी बुधवार, 30/03/2011 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
संजीव कपूर छाप पांढरा पास्ता (दोन-तीन जणांसाठी) साहित्य मॅकरोनी पास्ता (पाव किलो ते तीनशे ग्राम) पास्त्याचे विविध प्रकार इथे आहेत... http://www.archimedes-lab.org/pastashape.html चीज ...

पारंपारिक प्रतिस्पर्धी

लेखक मृत्युन्जय यांनी बुधवार, 30/03/2011 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही कधी साप आणि मुंगुसाला भांडताना बघितले आहे? दोघेही जीव खाउन लढतात. कारण ती अस्तित्वाची लढाई असते. आजवर कधी पाहण्याचा योग आला नसेल तर आज बघा. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २.३० मिनिटांनंतर २ देशातले २२ खेळाडु साप आणि मुंगुसासारखे लढणार आहेत. हा केवळ त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न नाही आहे तर २ देशांच्या अस्मितेचा सुद्धा प्रश्न आहे. आजचा भारत - पाकिस्तान सामना हा तिसर्‍या महायुद्धापेक्षा सुद्धा जास्त महत्वाचा आहे. याआधी विश्वचषकाच्या इतिहासात हे २ देश कधीही उपांत्य फेरीच्या सामन्यात समोरासमोर आले नाहीत. याआधी कधीही त्यांची लढाई अस्तित्वाची लढाई नव्हती.

किस्सा पटवारी का...

लेखक चिगो यांनी बुधवार, 30/03/2011 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
धागा प्रेरणा : http://www.misalpav.com/node/17449 गुजरातच्या "भु-खंड संगणकीकरण" बद्दल माहीती देतांना एका अधिकार्‍याने सांगितलेला हा किस्सा :
एकदा चिफ सेक्रेटरी (राज्यातील सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी) कुठल्याशा दौर्‍यासाठी एका गावातून जात होते. रस्त्यात काही गाई-म्हशी आडव्या आल्या आणि चुकून एका गाईला त्यांच्या गाडीचा पुसटसा धक्का लागला. झालं, गुराखी लोकांनी गाडीभोवती कोंडाळं केलं आणि भांडायला लागले. ड्रायव्हरने खुप समजावून सांगितलं, की अरे बाबांनो, मोठे साहेब आहेत. अमुक नी तमुक...

विश्वचषक २०११ भारत वि. पाक दुसरे सेमिफायनल

लेखक प्रशांत यांनी बुधवार, 30/03/2011 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
भारत वि. पाक हा सामना बघण्याची उत्सुकता सर्वांना असते त्यात आजचा सामना म्हणजे विश्वचषक २०११ चे दुसरे सेमिफायनल त्यामुळे प्रत्येकाने सामना बघण्यासाठी विषेश तयारी केली असेलच.. आपल्या पंतप्रधानांनी तर हा सामना बघण्यासाठी फारच विषेश तयारी करत त्याच्या खास......... आमंत्रण दिलेले आहे.. तर आजचा सामना बघ्याण्यासाठी तुम्ही काय काय आणि कशी तयारी केली... सामना चालु झाल्यानंतर सामन्याचे धावते वर्णन आपण आपल्या मिपाच्या खास शैलित करुच..

भिऊ नकोस ...

लेखक विश्वेश यांनी बुधवार, 30/03/2011 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
स्वतापुरते लढायचे बळ तेवढे आता गाठीशी आहे ... आठवते म्हणाला होतास "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ..." तुझ्या ह्या आश्वासनाने केले होते भितीना दफन ... अन उभा ठाकलो लढाया जगाशी बांधून डोईवर कफन माहित नव्हते माझी लढाई नशिबाच्या काठीशी आहे .... आठवते म्हणाला होतास "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ..." लढलो अनेक समरे काही जिंकलो काही हरलो लढता लढता लोटली वर्षे, परंतु मागे नाही फिरलो ... हरलो शेवटी वयाकडून, माहित नव्हते गाठ साठीशी आहे ... आठवते म्हणाला होतास "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ..." गळाले सगळे बळ, अन गळाल्या सगळ्या आशा आलास समोरून चालत अन दिलास पुन्हा दिलासा ... दाखवलास मज आरसा माझ्याच भ