Skip to main content

झरण

लेखक रामदास यांनी मंगळवार, 12/04/2011 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
लिहीतो आहे ते चर्‍हाट आनि पाल्हाळच आहे पण जसं आठवतं आहे आणि आठवतं आहे तोपर्यंत लिहावंच असं म्हणत लिहीतो आहे . म्हणजे ही गोष्ट डोंबीवलीची आहे. फक्त चार फलाट असलेले स्टेशन होते तेव्हाची. तेव्हा दिवा हे गुंड लोकांचं गाव आणि भांडूप तडीपारांचं गाव असं म्हटलं जायचं. नवडोंबीवली नावाची सोसायटी उभी राहत होती तेव्हा डोंबीवलीच्या घरांना भयगण्ड झाला नव्हता आणि दरवाजाच्या बाहेर लोखंडी जाळीचे सेफ्टी डोर नव्हते.

मेघस्पर्षी

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 12/04/2011 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळचा ७.३० चा गजर झाला आणि "तो" नाइलाजाने उठला. त्या आधी सव्वासातचा आणि सातचा गजरही वाजुन बंद झाला होता. कुंभकर्णापुढे नगारे वाजवले तरी तो उठणार नाही हे सरावाने माहिती झाल्यामुळे घरच्यांनीही दुर्लक्ष केले. उठताना त्याचा हात चुकुन उशीला लागला आणि स्वतःचीच लाळ हाताला लागली. झोपताना खंडाळ्याच्या बोगद्यासारखे सताड उघडे असलेले तोंड, त्यातुन आघाडीच्या सरकारमधुन आतबाहेर करणार्‍या प्रादेशिक पक्षांसारखे आतबाहेर करणारे डास आणि तोडातुन लिटर दीड लिटर बाहेर पडणारी लाळ या सगळ्याचीच त्याला किळस यायची. स्वतः बद्दल त्याला न आवडणार्‍या अनेक गोष्टींपैकी ती एक होती.

मेघस्पर्षी

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 12/04/2011 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळचा ७.३० चा गजर झाला आणि "तो" नाइलाजाने उठला. त्या आधी सव्वासातचा आणि सातचा गजरही वाजुन बंद झाला होता. कुंभकर्णापुढे नगारे वाजवले तरी तो उठणार नाही हे सरावाने माहिती झाल्यामुळे घरच्यांनीही दुर्लक्ष केले. उठताना त्याचा हात चुकुन उशीला लागला आणि स्वतःचीच लाळ हाताला लागली. झोपताना खंडाळ्याच्या बोगद्यासारखे सताड उघडे असलेले तोंड, त्यातुन आघाडीच्या सरकारमधुन आतबाहेर करणार्‍या प्रादेशिक पक्षांसारखे आतबाहेर करणारे डास आणि तोडातुन लिटर दीड लिटर बाहेर पडणारी लाळ या सगळ्याचीच त्याला किळस यायची. स्वतः बद्दल त्याला न आवडणार्‍या अनेक गोष्टींपैकी ती एक होती.

मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा, मुंबई २०११ नावनोंदणी

लेखक KanchanKarai यांनी मंगळवार, 12/04/2011 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, २०११ सालातील एक ब्लॉगर्स मेळावा दादर, मुंबई येथे ५ जून २०११ रोजी सायंकाळी ५:३० ते रात्रौ ८:३० या वेळात आयोजित करण्याचे ठरवले आहे. मेळाव्याच्या संयोजक आहेत ब्लॉगर सौ. कांचन कराई व आयोजक असतील ब्लॉगर श्री. महेंद्र कुलकर्णी, श्री. सुहास झेले व श्री. विशाल रणदिवे. या मेळाव्यासाठी प्रत्येक सहभागी सदस्याकडून वर्गणी रू १००/- रोख अपेक्षित आहे. ही वर्गणी मेळाव्याच्या दिवशीच आयोजकांकडे जमा करता येईल. मेळाव्याची रूपरेषा, स्थळ व वेळ यांचा समन्व्य साधता यावा म्हणून जास्तीत जास्त ७५ सदस्यांनाच नावनोंदणी करू देण्याचे बंधन आयोजकांवर आहे.

जय श्रीराम...!!!

लेखक प्यारे१ यांनी मंगळवार, 12/04/2011 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
प्रभू रामचंद्र की जय! रामनवमीच्या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम राम जन्मले. सर्वार्थाने आदर्श एक माणूस आणि त्याचे चरित्र म्हणूनही जर रामचरित्राचा वापर केला तरी आपली नैय्या पार व्हावी एवढी शक्ती त्यामध्ये आहे. रघुकुलवीर श्रीराम आपल्या कृपेने समस्त लोकांचे सर्वार्थाने कल्याण करोत हीच प्रार्थना. श्रीराम जयराम जयजय राम। श्रीराम जयराम जयजय राम। श्रीराम जयराम जयजय राम। श्रीराम जयराम जयजय राम। श्रीराम जयराम जयजय राम।

वावर

लेखक पेशवा यांनी मंगळवार, 12/04/2011 05:55 या दिवशी प्रकाशित केले.
असे पुरुष, पहिल्यांदा मेहेंदीने सजलेले हात आणतात तेव्हा बराच काळ ठेवतात त्यांना सजवलेल्या मखरातून असूयेने बघणाऱ्या नजरांचा काउंटर जितका जास्त तितकी असते त्यांची अभिमानाची लिंग-कॉलर ताठ असे पुरुष, शिकवलेले असते त्यांना लहानपणापासून पाहिलेले असते त्यांनी, काका, मामा आणि बापाला सफाईदारपणे आणलेले हात वापरताना... साला ते चुकत नाहीत शेंडीला गाठ मारून घोकतात सगळ्या ऋचा घेतात कानमंत्र बापच्या मांडीवर
काव्यरस

बुवा लोकांचे मटण

लेखक इरसाल यांनी मंगळवार, 12/04/2011 00:50 या दिवशी प्रकाशित केले.
आज दुपारी अचानक ढग दाटून आले आणि थोडा पाऊस पण पडला. छान वाटले. ऑफिस मधून जरा लवकर पळायचा विचार होता पण शक्य झाले नाही. मी घरी आल्यावर थोड्याच वेळात ही पिल्लूला घेवून 'कन्या बसायला' शेजारी घेवून गेली. कारण सध्या इथे नवरात्री चालू आहेत न. म्हटलं चला आज सौ.ला स्वयंपाकापासून आराम देवूया. काय बनवावे बरे......सोयाबीन वड्या दिसल्या. चला बुवा लोकांचे मटण………………….. बेत फिक्स ....... बाजूला भ्रमण ध्वनीवर 'गंध फुलांचा गेला सांगून' गाणं ऐकत होतो. मूड बनत गेला आणि त्याच बरोबर स्वयंपाकही. जे काही बनवल्याचे चीज झाल्याचे मागाहून कळले.

सरसरणारे यौवन तुझे ते

लेखक निनाव यांनी मंगळवार, 12/04/2011 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
सर सर सर सर थेंब गालावर ओले मोती ते ओघळणारे पडता पडता थेट तुझ्यावर मन माझे ते जळणारे थांबायचे? सरकायचे? प्रश्न त्यास पडले भिजवायचे-लाजवायचे मनी असे ठरले केसांमधुनी ओठांवरती थेंब ते कोसळणारे श्वासांमधल्या गंघामधुनी प्रेम ते दरवळणारे बोलायचे? न बोलायचे? प्रश्न त्यास पडले भुलवायचे, भिजवायचे मनी असे ठरले लाजत लाजत गुलाबी मनावर नाजुक इतुके ओठ लाजणारे येताच जवळ मी होत बांवरे गोड भितीनं ते थरथरणारे स्पर्शायचे? फुलवायचे? प्रश्न त्यास पडले पाहायचे, साठवायचे मनी असे ठरले उन्मद लाटा हरवुन वाटा किनार्यावर आदळणारे सोडत बंधन हळुच सारे तन तुझे आज पाघळणारे नेसायचे? सावरायचे?

पत्रमैत्री

लेखक कलंत्री यांनी सोमवार, 11/04/2011 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या बर्‍याच तरुणाना पत्रे (पोस्टकार्ड, पाकिटे, पत्रिका, मनी आर्डरी) काय असतात, ती कशी असतात्, ती पत्रे कोण लिहित आणि त्याच बरोबर त्या पत्रांचा आणि ती पत्रे आणणार्‍या डाकमित्राची वाट कशी पाहिली जात याची कल्पना ही आजकाळच्या बर्‍याच लोकाना नसेल. कोणे एके काळी नातेवाईक, मित्र आणि आतेष्टांसाठी पत्र आणि त्याचे आदानप्रदान कराणारा पोस्ट्मन ( डाकमित्र) याचे स्थान अबाधित असे होते. काळाच्या महिमा असा की पत्राची जागा संगणकीय पत्रांनी, मोबाईलच्या लघुसंदेशा नी पटकावली. तरी कधीतरी एखादे पत्र यावे, आपल्या नातेवाईकांची ख्यालीखुशाली कळवावी, वाट पहावी असे कोणाला कदाचित वाटतही असेल. यासर्व लोकासाठी

(का केली दाढी ही अशी...?)

लेखक पक्का इडियट यांनी सोमवार, 11/04/2011 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - http://misalpav.com/node/17606 खरं सांगायचं तर..... आज-काल दाढी करयची देखील खुप भीती वाटते । कारण.... कुठलीशी गालावरली बट, नकळतच राहूनच जाते । दाढीचे केस मग, सहजा-सहजी तुटत नाहीत । भावनांचे पीळ त्या केसांतले, काहीकेल्या सुटत नाहीत । सुटले पीळ तुटले केस तरी, ते जखमा देउन जातात । जखमा त्या डोळ्यांत अपुल्या, ओलावा ठेउन जातात । ओलावा त्या डोल्यांतला, लपवू पाहता लपत नाही । डोळ्यांची मिटली झापडे तरी, थेंब खाली पडल्या वाचून राहत नाही । आणि मग...! का केली दाढी ही अशी...?
काव्यरस