पोपटाची सदिच्छाभेट
सध्या परिसरात पोपट बहरले आहेत. माझ्या आणि रामदासशेठच्या घरादरम्यान असलेल्या वृक्षराजीत सकाळी सकाळी पोपटांचे थवेच्या थवे इकडुन तिकडे उडत असतात. आमच्या इमारतीच्या परिसरातील लाल तुर्यांच्या फुलांच्या झाडावर या पोपटांची नजर असते, त्यांना ही फुले खायला विशेष आवडत असावीत. फांदीवर बसुन उलटे लटकत चोचीने फुले खुडणारे पोपट रोज पाहावयास मिळतात.
मिसळपाव