चांदोबा मासिक
लेखनप्रकार
लहानपणी (आणि मोठेपणीसुद्धा) आवडीनं वाचावं असं आपल्या सगळ्यांच्या आवडतीचं मासिक 'चांदोबा' आता आंतरजालावर उपलब्ध झालं...
हा त्याचा दुवा
वाचने
17040
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
धन्यवाद मराठेसाहेब.
पूर्वी गोगोल यांनी हा दुवा दिला होता. जो माझ्या प्रीतीच्या दुव्यांमध्ये टाकला होता. मग त्या संस्थळावर काहीतरी बदल केले गेले आणि ते लोक लॉगिन मागू लागले होते. आता परत ते संस्थळ सुधारलेलं दिसतय.
In reply to धन्यवाद मराठेसाहेब. पूर्वी by शुचि
पण आता एरर येतोय .
हे बेस्ट झालं. :)
लॉगिन गेलं ते बरं झालं. मी घरातुन हॉस्टेलला जाईपर्यंत सगळे चांदोबा ठेवले होते, मग घर बदलताना काय झालं माहित नाही, आणि तोपर्यंत माझी इंटरेस्ट्ची पुस्तके ही बदलली होती.
वॉव !
सगळ्या गोष्टी परत वाचता येतिल.
'चंपक' सुद्धा असे कुठे मिळते का हो ?
व्वा! खूपच वर्षांचे अंक दिसतायत. लहानपणी अपुरी राहिलेली भल्लूक मांत्रिकाची दीर्घकथा शोधून बघते. धन्यवाद.
आपल्या सगळ्यांच्या आवडतीचं मासिक 'चांदोबा'मराठे साहेब, आपल्याला बहुतेक 'आवडीचं' मासिक म्हणायचं असावं :) किशोर मासिकाचे अंक कुठे वाचायला उपलब्ध आहेत का? कोणाला माहित असल्यास कृपया कळवावे.
आवाज आणि जत्रा कुठे ऑनलाईन (फुकट) वाचायला मिळतील काय ? :)
हे मासीक मराठी भाषेत ओनलाइन मिळत नाही. कुणाकडे जुने चान्दोबा असल्यास अपलोड करावेत आणी चाहत्यान्चा दुवा घ्यावा.
खालील दुव्यावर चंदामामा आहे:
https://archive.org/details/Chandamama_1956-08
मित्रांनो, या वरून सहज आठवले. मी चेन्नईला पोस्टिंगला असताना मुद्दाम वडपलऩी भागातील चांदोबाच्या कार्यालयात भेट द्यायला गेलो होतो. ज्यांच्ये मुळे आमचे बालपण मजेत आणि वाचनाला वळण देणारे ठरले त्या मासिकाचे चित्रकार कोण म्हणून आवर्जून पोहोचलो. वपा, शंकर असे त्यावेळचे कलाकार कसे चित्र काढतात...पहायची उत्सुकता होती... दोघेही तोवर निवृत्त झाले होते. मराठीतून गोष्टींचे भाषांतर करायला तेलगू मजकूर पांडिचेरीला एकांकडे जातो व तो आला की टाईपसेटींग करून अंक सजतो असे त्यावेळी मला तमिळ लोकांकडून भाषांतरकाराच्या मदतीन कळले होते. मला वाटतं एक छोटेखानी लेख दै. पुुढारीत आला होता... असो...
पंचावन वर्षांपूर्वी ज्यांचा चित्रांनी भारून गेलो होतो, ते चांदोबाचे चित्रकार शंकरः


In reply to शंकर by चित्रगुप्त
धन्यवाद सर !
चांदोबा पुन्हा सुरू व्हावे असे फार वाटते! :-(
ते मध्यंतरी एक पैसे घेऊन चांदोबाचे अंक देणारे आले होते त्यांच्याबद्दल काय अनुभव?
In reply to ते मध्यंतरी एक पैसे घेऊन by आदूबाळ
पैसे घेऊन चांदोबाचे अंक देणारे वाल्यांना मी फोन केला होता, ते १० रु. प्रति अंक घेऊन पीडीएफ देतात. पुण्यात आहेत. कुणाला हवा असल्यास माझ्याकडे फोन नं.आहे.
इथे जी साईट आहे, त्यावर इंग्रजी अंक आहेत, त्यामुळे मराठीसाठी त्यांचेकडून घेता येतील.
जुन्या अंकांच्या प्रती कुठे मिळतील का - विकत किंवा रद्दी म्हणून?
यावरून आठवले की ६३-६४ च्या सुमारास शाळकरी वयात कोकणात एका उन्हाळ्याच्या सुट्टीत गेलो असताना तिथे एका भल्या मोठ्या पेटीत चांदोबाचे अगदी सुरवातीपासूनचे पाहून अलिबाबाच्या गुहेतील संपत्ती पाहून ४० चोरांना जसा हर्ष झाला असेल तसा माझा प्रकार झाला. गेलो होतो हापूस आंबे खायला मिळाला जुळ्या बहिणी अन अनेक गोष्टी, दीर्घ कथांचा मधुर सुरस... ती भलीमोठी पेटी जणू माझी वाट पहात होती!
In reply to जुने अंक by शशिकांत ओक
ती पेटी आता कुठे आहे ते सांगू शकाल?
निदान, त्या पेटीपर्यंत पोचायचा नक्शा वगैरे...! ;)
In reply to सर by चांदणे संदीप
पावस जवळचे गोळप गाव, शाळा मास्तरणींची खोली..
http://shashioak.weebly.com/3-peek-at-my-blogs---social-media--23502367234623662350234323702344-23462381235223252366235823672340-23542375232623441.htmlमाझ्याकडे चंदामामा हे हिन्दी मासिक १९४९ ते २००६ सर्व महिन्यांचे अंक उपलब्ध आहेत RAR format मध्ये.कोणाला हवे असल्यास मी मोफत देण्यास तयार आहे.
In reply to चंदामामा हिन्दी मासिक by उमेश माधवराव मसलेकर
मला द्या RAR format
In reply to चंदामामा हिन्दी मासिक by उमेश माधवराव मसलेकर
मला सुद्धा RAR Format मध्ये देण्याची विनंती आहे.
In reply to चंदामामा हिन्दी मासिक by उमेश माधवराव मसलेकर
मला हवा आहे , प्लिज मदत करा
In reply to चंदामामा हिन्दी मासिक by उमेश माधवराव मसलेकर
मला हवेत
क्या बात है! दुव्यासाठी मनःपुर्वक आभार.
थोडंसं अवांतर, साधारण 1997,98 च्या सुमारास 'किशोर' मधे 'चार्ली अॅण्ड चाॅकलेट फॅक्टरी' चा क्रमशः अनुवाद प्रकाशित होत असे. नंतर हे इंग्रजी पुस्तक व त्यावर बेतलेले दोन्ही चित्रपट पाहिले. पण या अनुवादाची मजा वेगळीच होती.
मला सुद्धा RAR Format मध्ये देण्याची विनंती आहे.
मला सुद्धा RAR Format मध्ये देण्याची विनंती आहे.
खूप दिवसांपूर्वी पहिला होता हा दुवा, अजूनही तितकेच फ्रेश वाटते वाचायला! व्वा, धन्यवाद शेअर केल्याबद्दल!
मला सुद्धा RAR Format हवेत
मला सुद्धा RAR Format हवेत
किशोर चे अंक सुद्धा आता ऑनलाइन उपलब्ध झाले आहेत.
http://kishor.ebalbharati.in/Archive/
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बुम्मा अधिरिंदी... धिम्म्मे तिरिगिंदी... ;) :- JawaanIn reply to किशोर चे अंक सुद्धा आता by मदनबाण
मदनबाणसाहेब, खूप खूप धन्यवाद या दुव्याबद्दल!!
Sandy
धन्यवाद मराठेसाहेब. पूर्वी