प्रेरणा (शिर्षक बदल).
***नवीन शिर्षक कवितेच्या संदर्भास अधिक जवळ आहे असे वाटले, म्हणून हा बदल.***
तु आलीस? - चला बरं वाटलं
कुठे गेली होतीस मला असंच सोडून?
कल्पना तुला काही?
दमलो किती मी होतो तुला इथं तिथं शोधून!
प्राणच गेले होते जणु माझे निघून
थांग पत्ता नव्हता ठाउक कुणा -
पुरता थकलो होतो विचारून!!
मात्र, देव कॄपेनं माझ्या
परतलीस पुन्हा - हायसं वाटलं
तु आलीस!! - चला बरं वाटलं
माझे हातच सुटले होते हाता मधुन
आणिक श्वास सुटले होते श्वासा मधुन
नसती आलीस पुन्हा तु जर
आलीच नसती कधी पुन्हा
तु परतण्यासाठी अगं वेडे
सापडलो तरी असतो का इथे तुला?
कल्पनाच नव्हती तु अशी येशील परत
करशील मजवर प्रेम तसंच
काही-का-होईना..
असो!!
मिसळपाव