मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझा देश ..!!

प्रकाश१११ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
माझा देश मला प्रिय आहे येथे कोठेही हागता मुतता नि थुंकता येते येथे स्वातंत्र्याची रेलचेल आहे जिसकी काठी उसकी भैस आहे पकडला नि पुरावा नसला तर त्याचा सन्मान आहे असा माझा देश आहे माझा देश मला प्रिय आहे येथे पक्ष बदलता येतो कधी.. केव्हाही ..!! पण घटस्फोट नाही घेता येत पटकन कारण येथे महिलांना मान आहे स्त्री ही क्षणाची पत्नी नि अनंत काळची मातां आहे असा माझा देश आहे माझा देश मला प्रिय आहे हा गांधी टोपीचा देश आहे हा हाफ प्यांटचा देश आहे हा विळयाचा देश आहे हा निळ्याचा देश आहे हा आस्तिकांचा देश आहे हा नास्तिकांचा देश आहे असां माझा देश आहे माझा देश मला प्रिय आहे मृत जनावरांच्या शरीरावर माश्या घोगावत असतात तशी जथ्या-जथ्यांनी माणसे घोगावत असतात लचके तोडत असतात गावाच्या अवयवाचे तरी प्रत्येकाचे आयुष्य ग्रह ताऱ्यांनी बांधून ठेवलेले असते आणि प्रत्येकाच्या मनात कुठला तरी जो हवा तो देव असतो असा माझा देश आहे माझा देश मला प्रिय आहे येथे अनेक बाबा आहे भक्त तर अनेक आहेत बाबांचे महाल नि भक्त उघड्यावर कण्हतो आहे भक्तांचे दुख पदरात घेऊन बाबा महान होत आहेत असा माझा देश आहे माझा देश मला प्रिय आहे असा माझा देश आहे त्याची माझी संगत सात जन्माची पक्की आहे कसाका असेना देश माझा आहे नि मी त्याचा अगदी अगदी आपला आहे म्हणून मला तो प्रिय आहे हा माझा देश आहे भारत माझा प्राण आहे …..!!

वाचने 2276 वाचनखूण प्रतिक्रिया 4

कच्ची कैरी 30/01/2011 - 14:48
माझा देश मला प्रिय आहे येथे पक्ष बदलता येतो कधी.. केव्हाही ..!! पण घटस्फोट नाही घेता येत पटकन कारण येथे महिलांना मान आहे स्त्री ही क्षणाची पत्नी नि अनंत काळची मातां आहे असा माझा देश आहे माझा देश मला प्रिय आहे एकदम खरी आहे ही गोष्ट!