Skip to main content

पु.ल. आणि अत्रे-एक दर्पण

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 09/05/2011 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या कवितेच वर्गिकरण मि हास्य रसात केलय,पण मुलत: तो असला नसला तरि फारसा फरक पडणार नाहि.कारण हास्यरस हा या दोन माणसान्च्या व्यकक्तित्वाचा अविभाज्य घटक होता.दर्पण हे या कवितेच न्निवळ नाव नसुन तो खरच या कवितेचाहि स्वभावधर्म आहे...हास्यवेदाचार्य-आचार्य अत्रे आणि हास्ययज्ञनारायण-पु.ल.देशपान्डे...यान्ना अर्पण... १)कधि कधि मि पु. ल.न्चा,कधि कधि मि अत्र्यान्चा.प्रश्न उरतो मधे फक्त वेलान्ट्या आणि मात्रान्चा२)पु.ल.म्हणत भगवन्त ना,तो तुमच्या साथ आहे.अत्रे म्हणत भगवन्त ना,तो तुमच्या 'आत' आहे.३) म्हणजे पु.ल न्च खद्य हे,दहि आणि भात होते.
काव्यरस

प्रेम आणि मरण

लेखक ajay wankhede यांनी सोमवार, 09/05/2011 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
निघालो क्षितिजा स गवसणी घालायला अश्वमेघ सोडला दिग्विजयी व्हायला सळसळते रक्त, धगधगते मन, चौफेर उधळले वारू मनाचे सर केले अवघड मनोरे स्वन्प्नांचे रणधुमाळीत या सार्‍या विसरलो सखे “प्रेम” काय चीज असते ते इतका बे दर्दी कसा झालो कळलेच नाही कळलेच नाही तुझ्या डोळ्यातील भाव नकळतच झेलत राहिलो प्राक्तनाचे घाव जगण्याचे संदर्भ हि विसरलो मरणा च्या वाटेवर नि आज ...जीवनाच्या वळणावर एकटाच अजेय परतीचा प्रवासी दमलेले थकलेले प्रारब्ध.. जीवन कुठेच थांबत नाही हे हि खरेच थांबलास तर संपलास हे हि खरेच पण चुकणार नाही आता जीवंतपणीच घेणार अनुभव मरणाचा करणार “प्रेम” तुटून आता परतीच्या वाटेवरील लेऊन घेण

दोन लार्ज -एक सिमॉल ..

लेखक रामदास यांनी सोमवार, 09/05/2011 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
मी ज्या बारचा आश्रयदाता आहे त्या बारला फिफ्टी प्लस बार म्हणायला हरकत नाही. इथे फारशी गर्दी नसते.माझ्या वयाची माणसं फक्त दारु पिण्यासाठीच येतात. गप्पा नाहीत- बिझीनेस डील्स नाहीत.दारु पिणे आणि रिघणे. वेटर दोन पेगचा कोटा एकदाच काय तो टेबलवर आणून ठेवतो आणि टिव्ही बघत बसतो. संभाषणही फारसं काही नसतं .आठवड्यातून एकदाच एक प्रश्न विचारतो. उत्तर मिळालं की दुसर्‍या दिवशी शंका विचारतो. पावणेअकराला चखण्याची डिश न विचारता उचलून ठेवतो. अकराला दहा मिनीटे असताना बिल गोळा करतो . अकरा वाजता रीक्षा बोलावतो.

काका पुतण्याच्या कारकीर्दीचा नवा अध्याय

लेखक हुप्प्या यांनी सोमवार, 09/05/2011 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8201986.cms रिझर्व बँकेने राज्य सहकारी बँकेचा ताबा घेऊन तडफदार युवा नेते अजितदादाजीराव पवार यांच्या दादागिरीला चाप लावला आहे. केंद्र सरकारने हे केले आहे म्हणजे त्याचे कर्ते करविते कोण असणार हे सांगायला नको. जिनकी इजाझत के बिना परिंदा भी पर नही मारता अशा थोर लोकांच्या प्रेरणेनेच हे केले गेले आहे. पण काका पुतण्याच्या प्रतिक्रियेत फरक आहे. पुतण्या संतापाने गुरगुरतो आहे तर काका सबुरीची भाषा करतो आहे.

Photography.

लेखक nishant यांनी सोमवार, 09/05/2011 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
काल टिपलेलि कहि छायाचित्र: Photobucket ट्युलिप्चे फूल Photobucket ट्युलिप्चे फूल

लिहिण्यास कारण की -

लेखक विदेश यांनी सोमवार, 09/05/2011 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
तहानभूक विसरून , नित्याची कामं बाजूला ठेवून , किंवा हातातली कामं करत करत दूरदर्शन संचापुढे ठिय्या मांडून बसणारे किंवा येता जाता न चुकता दूरदर्शन संचाकडे नजर टाकणाऱ्याचे अभिनंदन करण्याची आवश्यकता नाही ! कारण सदैव ही माणसे चिंतातुर चेहऱ्याने वावरत असतात.त्याच त्याच बातम्या २४ तास ऐकून जगाचे काय आणि कसे होणार याची काळजी त्यांना पडलेली असते! मालिकेतील पात्राच्या दु:खात दूरदर्शन पुढची माणसे समरस होतात, पण त्यांना घरातील पात्रांच्या सुखदु:खात काडीइतका रस घ्यावा वाटत नाही! हातात असलेली कामं निपटून दूरदर्शन संचातील ' पाक-क्रीडा ' पहावयास काय हरकत आहे?