[ज्योतिष] माझा उत्कर्ष कुठे होईल?
माझा उत्कर्ष केव्हा होईल आणि कुठे होईल? हा ज्योतिषांना कायम विचारला जाणारा प्रश्न.यातल्या "केव्हा"चे उत्तर देण्यासाठी दशा, गोचर ग्रह, चलित ग्रह इत्यादींचा उपयोग केला जातो. तर "कुठे" हा प्रश्न पारंपरिक ज्योतिषात अजब तर्हानी हाताळला जातो. प्रश्नांची उत्तरे पण संदिग्ध अशीच असतात. पाण्याजवळ उत्कर्ष होईल किंव जुनाट अथवा वडलोपार्जित वास्तूत उत्कर्ष होणार नाही इ. इ.
आभासी जग
बरेच दिवस झाले असतील मैत्रीणीला प्रत्यक्ष भेटून
किती महिने गेले असतील अमोरा समोर गप्पा मारुन
हल्ली आपण समाधान मानतो त्या 'online chat' वरंच
e mail करून मित्राला सांगतो "अरे ping केलं होतं मी तिला कालंच"
निवान्त बसून परस्परांची चौकशी करणे कमी झालं आहे
Social Networking sites वरच्या status नाच जणू delegate केलं आहे
एकत्र येउन पत्ते, carrom खेळ्ण्याचे दिवस देखिल जुने झाले
PS3 आणि XBOX वर खेळायलाच वेळ कमी पुरे
आमंत्रणं होतात वेग वेगळे Events create करून
एकमेकांची खेचत अस्तात publically comments मारून
वाढदिवसाच्या शुभेछा offline message टाकून उरकतो
Facebook वर snaps upload करण्यासाठीच photo काढू
निरोप नाही, फक्त आभार!
परवाच्या बाँबस्फोटासह नुकत्याच घडून गेलेल्या क्लेशदायक घटना ऐकल्या; अगतिक, हताश व्हावं अशा जळजळीत कविता वाचल्या, लेख आणि प्रतिसाद वाचले, आणि परदेशात नेहेमीच वाटणारी असहाय्यता उफाळून आली. पण वाईटातून चांगलंही काही घडतं आहे हे दर्शवणार्या काही गोष्टी नजरेला पडल्या. व्यवस्थेतली केवळ छिद्रंच शोधण्यापेक्षा काही आशादायक कणही गोळा करावे, आणि त्या कणांचं जाणीवपूर्वक हव्या त्या ठेव्यात रुपांतर करावं अशी शिकवण देणारे माझे आजोबा आठवले.
दहशतवाद - मी काय करू शकतो?
कोणताही दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संताप दाटून येतो!
सरकारच्या नावाने खडे फोडले जातात,
मिडियाला शिव्या घातल्या जातात,
अमेरिका आणि इस्राएलचा धडा भारताने गिरवावा वगैरे मागण्या होतात,
संतापाच्या भरात, 'संपवा यांना' वगैरे सारख्या कडवट प्रतिक्रिया दिल्या जातात.
यातले काही घडत नाही किंवा घडू शकत नाही म्हणून मग चरफडत बसणं...
पण या पलिकडे जाऊन,
मी माझ्या परीने अगदी छोट्या पातळीवर दहशतवादा विरुद्ध लढण्यासाठी काय करू शकतो?
याविषयी माहिती देऊ-घेऊ या.
- तुमचा उपाय कितीही साधा सोपा असला असला तरी येथे नक्की द्या.
- तुम्ही काय केले हे दिलेत तरी चालेल.
दहशतवाद आणि प्रतिक्रीया
गेल्या दशकापासून भारतास दहशतवादी हल्ल्यांनी ग्रासले आहे. तसे म्हणायचे झाले तर पंजाब प्रश्न जेंव्हा भडकला होता तेंव्हा देखील भारतात अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले होतेच. पण (त्या हल्ल्यांची बाजू न घेता) फरक म्हणाल तर इतकाच होता की त्यांच्यावर (शिखांवर) झालेल्या अथवा त्यांना वाटणार्या अन्यायाने आणि त्यासंदर्भात स्वतःची पोळी टिकवण्यासाठी त्यांना खेळवाणार्या तत्कालीन राज्यकर्त्यांमुळे उठलेला पण मर्यादीत भूभाग आणि राजकीय कारणांवरून उडालेला तो भडका होता. त्यामुळे त्यावर शस्त्र आणि समझौता या तोडग्यांनी पायबंद घालता आला. कारण एकूण शिख समाजाच्या भारताविषयीच्या आस्थेबद्दल कोणी शंका घेऊ शकत नाही.
१३ जुलै २०११ आणि नंतर...
धडाड धुरळा उडतो गगनी
पुन्हा भय जनी दाटते गा
एकमेकां सारे सावरू धावती
निस्तरू पाहती पुन्हा तेच
सुटकेचा कोणी टाकती निःश्वास
कुणाचा प्रवास संपलेला
विव्हळत जागे कोणी वेदनांत
कुठे डोळियांत पाणी साचे
चित्रवाणीवर वृत्त साकळते
जगाला कळते घडले ते
परिस्थिती कोणी सांगे विवरून
काय हो कारण घडे त्याचे
निषेधाचे कुणी पेटवी पलिते
शांत राखा माथे म्हणे कोणी
कुणी म्हणे धन्य धन्य नागरिक
शूर नि सोशिक धैर्यवंत
उलटते रात येता येता नीज
पुन्हा नवा आज उजाडतो
भयशंका मनी दाटल्या घेऊन
चालती गा जन तीच वाट
कुजबुज कुठे संताप थोडासा
अगतिकचासा एक एक
पोट शिकविते धैर्य ते अटळ
अन्य काही बळ नाही तेथे
स्वतःचे मत मांडा
परवा मी एक खूप छान लेख वाचला. "व्यवस्थापन/नेतृत्व/ऑर्गनायझेशन कल्चर" आदि विषयांतर्गत येणारा असा हा लेख होता. त्याचा थोडक्यात गोषवारा पुढीलप्रमाणे -
प्रत्येकाकडे बोलण्यासारख्या काही गोष्टी असतात, प्रत्येकालाच मते असतात. ऑफीसमध्ये देखील "वर्क कल्चर" अगदी संपूर्ण आदर्श कोणालाच वाटत नसते. काही बदल सुचवावेसे वाटत असतातच. पण बहुसंख्य लोक हे आपले मत गुलदस्त्यात ठेवतात, बोलून दाखवत नाहीत. भीती, संकोच, भीड अनेक कारणे त्यापाठी असतात त्याचबरोबर "सवय" हेदेखील कारण असते.
मिसळपाव
