Skip to main content

माझी नवीन चित्रे

लेखक चित्रगुप्त यांनी मंगळवार, 19/07/2011 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
माझी काही नवीन चित्रे: ही चित्रे माझ्या अनेक वर्षांच्या चित्रकलेतील खटाटोपींतून हळूहळू विकसित होत गेलेल्या स्वतःच्या शैलीतील आहेत. चित्र सुरु करताना ते कसे होणार आहे, म्हणजे बरे वाईट असे नव्हे, तर या चित्रात मी काय काय आणि कसे चित्रित करणार आहे, याची काहीही पूर्व कल्पना मला नसते. एक एक चित्र अनेक दिवस चालत रहाते... सुरुवतीला काही अनिश्चित असे रंग-आकार कॅनव्हास वर पसरवून ठेवतो, त्यातूनच कल्पनेला चालना मिळत जाऊन चित्र आकार घेत जाते. असे असले, तरी माझ्या अनेक चित्रात प्राचीन जागा, मंदिरे, राजवाडे, वडाच्या पारंब्या, मातीची घरे, ढग वगैरे असते...

यंदा कर्तव्य आहे??

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 19/07/2011 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
आजच मटामध्ये ही मजेशीर बातमी वाचली आणि मटाची पातळी कुठवर उतरलीय याचे परत एकदा प्रत्यंतर आले. या निमित्ताने काही प्रश्न मनात उभे राहीले. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9282021.cms १) लग्न झाल्यावर कुत्री व मांजरी दिल्या घरीच राहायला जाणार का? २)सासरी गेल्यात तर त्यांच्या पालनपोषणाचा खर्च कोण उचलणार? ३) काही कुत्रे व बोके घरजावई होउन राहणे तयार असल्यास दोघांचेही मालक त्यास तयार होतील काय? ४)लग्न न होणारी कुत्री फिट नसतात काय? ५)आपले लग्नमुहूर्त प्राण्यांसाठी पण लागू असतात काय? ६)कुत्र्या, मांजरांच

वाट पाहीन पण.......

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 19/07/2011 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
मध्ये एकदा प्रवासात बर्‍याच दिवसांनी "वाट बघेन पण एसटीनेच जाइन" ही पाटी बघितली आणि तोंडभर हसू तरळले. त्यात अभिमान होता, 'एस टी ने प्रवास? हे काहितरी काय !' ही कुचेष्टा होती की नॉस्टेल्जिया होता हे माझे मलाच झेपले नाही. कदाचित सगळेच थोडे थोडे असेल. पण एस टी म्हटल्याबरोबर बर्‍याच आठवणी ग्रामोफोनवर झरझर फिरणार्‍या तबकडीसारख्या सुळकन डोळ्यासमोरुन तरळुन गेल्या. लहानपणी एस टी म्हटल्यावर फक्त लाल डबा समोर उभा रहायचा. इतर कुठलीही बस म्हणजे एशियाड असायची. त्या काळात पुण्यासारख्या मोठ्या शहरात रहायचो नाही त्यामुळे पी एम टी नामक बागुलबुवा बद्दल माहिती नव्हती झालेली.

दुर्दैव कि निश्काळजिपणा?

लेखक स्वप्नांची राणी यांनी मंगळवार, 19/07/2011 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
मन सुन्न करणारि बातमि काल पाहिलि..एका धबधब्या मधे पिकनिक साठि एक कुटुम्ब गेले अणि अचानक आलेल्या पाण्या च्या लोण्ध्यात सगळे वाहुन गेले. खर तर त्या धबधब्या च्या काठावर सगळिकडे वार्निन्ग च्या पाट्या लावलेल्या आहेत्.... ह्या घटनेला दुर्दैवि म्हणावे कि त्यान्चा निष्काळजि पणा? आपण सगळेच अति उत्साहात कधि कधि अश्या चुका करुन जातो का? मला आठवतय जेव्हा मि ट्रेक्किन्ग ला जायचे तेव्हा 'अनोळखि' पाण्याच्या जागि पाणि प्यायला किन्वा पोहायला उतरायचे नाहि अश्या स्पश्ट सुचना दिल्या जायच्या अणि त्यान्चे पालनहि केले जायचे.

दोन चारोळ्या -

लेखक विदेश यांनी मंगळवार, 19/07/2011 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
"प्रेम" मी डाफरता तू शांत रहावे तू ओरडता मी गप्प बसावे- मौनातच नजरांनी हसावे बहुधा हेच ते 'प्रेम' असावे ! "बदला" काल कावळा दारी 'काव'ला

पुढील तपास सुरु आहे...

लेखक जयनीत यांनी सोमवार, 18/07/2011 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
गावात बलात्काराची घटना घडली. आरोपी फरार होता. जनमानस संतप्त होते. पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. पोलिसांची लोकां प्रती सहानुभूती होतीच. कठोर कारवाईचे आश्वासन मिळाले. जाणकारांच्या मते कितीही कठोर कारवाई झाली, तरीही आरोपीला जास्तीत जास्त सात वर्षे शिक्षा होणार होती. काय! फक्त सात वर्षे? अशांना तर भर चौकात ठेचून काढायला हवे.

होतकरू झाड

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 18/07/2011 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
होतकरू झाड मला कळाली पुन्हा नव्याने, नव्या पिकांची नवीन भाषा कठीण मातीत रूजणार्‍या, नव्या बियांची नवीन भाषा नशीब आहे विचित्र मोठे, कुणास रुजण्यास खडक-धोंडे कठोर पाषाण भेदणार्‍या, नव्या मुळांची नवीन भाषा     &n