Skip to main content

साडीखरेदीला येताय नं?

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 18/07/2011 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
कालच मी साडी खरेदीसाठी गेले होते. आताशा पावसाळा चालू आहे. पावसाळ्यात कपडे, साड्या, चपला, कुकर आदींवर फ्लॅट डिस्कांउंट सेल निरनिराळ्या दुकांनात चालू होतात. कधी ५० टक्यांपर्यंत तर कधीकधी काही ठिकाणी पुर्ण ५०% डिस्कांउंट सेल लागतात. रस्त्याने जातांना मला तसल्या दुकानांवरील पाट्या पाहून ड्रायव्हरला 'गाडी तेथल्यातेथे उभी कर', असे सांगावे लागते. नाहीतरी आमच्या ह्यांना माझे 'सेल खरेदीचे' वेड माहीतच आहे. नविनच लग्न झाले त्यावेळी सुरूवातीला ते माझ्या बरोबर खरेदीला येत. पण नंतर नंतर त्यांचे माझ्याबरोबर येणे कमी झाले अन आमच्या भिशी क्लबातल्या एखाद्या मेंबरचे येणे माझ्याबरोबर वाढले.

शेअर मार्केट मधील टिप्स...कितपत भरवसा ठेवावा?

लेखक JAGOMOHANPYARE यांनी सोमवार, 18/07/2011 08:56 या दिवशी प्रकाशित केले.
शेअर मार्केट मधील टिप्स...कितपत भरवसा ठेवावा? ट्रेडिंग करताना आपल्याला स्वतःहून स्क्रिप्स निवडणे काही वेळेला शक्य नसते, इंटरनेट्वर बर्‍याच जाहिराती दिसतात जे एस एम एस द्वारे टिप्स देण्याचा उद्योग करतात.. अशा टिप्स किती भरवश्याच्या असतात? कुणाला चांगल्या टिप्स देनारा माहीत आहे का? बहुताम्शी वेलेला हे लोक इन्ट्रा डे आणि एफ एन ओ मधील टिप्स देतात.. स्पेशल निफ्टीसाठीही काही जणाम्ची सोय असते. असा काही कुणाला अनुभव आहे का? खास करुन वॅल्यु नोट्स डॉट कॉमवर बर्‍याच जाहिराती दिसतात.. काही ब्रोकरही अशी सुविधा पुरवतात..

देल्ही बेलीज फार बीभत्स आहे काय??

लेखक ईश आपटे यांनी रविवार, 17/07/2011 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
आजच एका वृत्तपत्रात वाचल, रमेश देव ह्यांनी आपल्या मुलाच्या देल्ही बेलीज ह्या महान कलाकृती बद्द्ल नाराजगी व्यक्त केली. व हा घाणेरडा प्रकार काय आहे असा त्याला जाब विचारला. भारतीय सेन्सॉरचा मी ही काही फॅन नाही. दिग्दर्शकाला पूर्ण स्वातंत्र्य असल पाहिजे ह्या मताचा मी आहे. व प्रौढ विनोद व बोल्ड प्रणय दृष्ये हिन्दी व मराठी चित्रपटात दाखवली गेली पाहिजेत ह्या मताचा मी आहे. पण देल्ही बेलीज हा कलात्मकते मध्येच कमी पडतो , व त्यामुळे निव्वळ शिवीगाळ व संडास दाखवण्याकरता चित्रपट काढलाय असा समज होतो.

च तु र्भु ज

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी रविवार, 17/07/2011 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रवेश १ला स्थळ : महिपतराव पाटलांचा प्रशस्त वाडा आणि त्यासभोवतालचा परिसर) प्रसंग : महिपतरावांची एकुलती एक कन्या हेमांगी चा विवाह संपन्न होत आहे. लग्नसमारंभात काम करणारी नोकरमंडळी आणि त्यांना सूचना देणारे यांची लगबग चालु आहे. मंद आवाजात वाद्ये वाजत आहेत. वातावरणात एक प्रसन्नता भरून राहिली आहे. महिपतराव : (मोठ्याने ओरडून) आरं रामा, शिवा, गोविंदा. कोणी हाय का तिकडं? कुठं मेलेत समदे? हितं अजून किती कामं करायची बाकी आहेत. वावरात खुर्च्या मांडायच्यात. माईक अन् स्पीकर अजून आले नाहीयत. ........ ..... (स्वगत / प्रेक्षकांना) मंडळी आज तुमच्या भाषेत ते नर्वसनेस का काय म्हणत्यात ना..

पिंकी, परी आणि मोर -

लेखक विदेश यांनी रविवार, 17/07/2011 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
परीने विचारले, पिंकीच्या कानात - ' यायचं का तुला आंब्याच्या वनात ? मोराचा पिसारा छान पहायला मोरासंगे खूप खूप नाचायला !

मौज वाटली वाचून

लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी रविवार, 17/07/2011 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज सकाळी एक बातमी वाचली की म्हणे उपमुख्यमंत्र्यांनी वाढदिवस साजरा करू नका असे सांगितले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर 22 जुलै रोजीचा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. कुणीही माझा वाढदिवस साजरा करु नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात उपमुख्यमंत्र्य...ांनी म्हटले आहे की, मुंबईतील बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांच्या मृत्यूमुळे मला तीव्र दु:ख झाले असून 22 जुलै रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मी घेतला आहे.

स्थलांतर

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 17/07/2011 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
काळा, शिशु होतो तेव्हा खादाड मी राऊ होतो उनाड मी काऊ होतो बडबडी मी चिऊ होतो स्वच्छंदी मी पक्षी होतो काळा, युवक होतो तेव्हा सशा सारखा मी देखणा होतो हरणासारखा मी चपळ होतो चित्यासारखा मी आक्रमक होतो उमदा मी प्राणी होतो काळा, प्रौढ होतो तेव्हा राबणारी मी मुंगी होतो साठवणारी मधमाशी होतो जाळी विणणारा कोळी होतो कष्टकरी मी कीटक होतो काळा, तुझ्यामुळे मी वृद्ध झालो शिशू-युवक-प्रौढ