Skip to main content

पुन्हा...

लेखक अभिषेक९ यांनी रविवार, 11/09/2011 00:50 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा ब्लास्ट मी हादरलो, आम्ही हादरले, सारा भारत हादरला पण 'ते' विचकट हसले... राक्षसी रावण, कंस, बकासुर, पुतना.. सुद्धा लाजले, रडवेले झाले.. 'आमचा असुरी पणा असला नव्हता हो' मिडिया गरजले रक्ताळलेले फोटो - बटबटलेला सूर मी भडकलो, आम्ही भडकलो, सारा भारत भडकला पण त्यांचा TRP वाढला नारायण-नारायण म्हणत नारद मात्र आपल्या आधुनिक रूपाने थक्क झाला सरकार सरसावले दहशतवादी हल्ला - RDX - राष्ट्र - धर्म - जेहाद मी आलो, आम्ही आलो, सारा भारत एकत्र आला पण त्यांची पोळी शेकली ब्रम्हा -विष्णू - महेशाचे आर्जव करत इंद्र मात्र या लोकशाहीत विस्कळीत झाला श्रीराम ते अण्णा... ...

निर्वात--पोकळी

लेखक स्व यांनी रविवार, 11/09/2011 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
मी काय करतोय? मला काय करायचय? खरं तर मला काय करायचय ह्याचाशी तुम्हाला काय करायचय? कर्महीन आणि निरुद्देश जीवन घालवणे हे विध्वंसक कार्यापेक्षा उत्तम नाही का? की जरासे विध्वंसक आणि रजो-तम गुणी झालेले चालेल पण कर्म करणे योग्य? कशासाठी काय केले पाहिजे?ही वेळ काय करायची आहे? मी असा एका निर्वातात बसुन काय करतोय? एका रिकामटेकडेपणाने ही मनोपोकळी व्याप्त केली आहे का?हे रिकामपण चांगले की वाइट? वाइट असेल तर कुणासाठी? इतरांसाठी की माझ्याचसाठी? कुणी काहीच प्रतिसाद का देत नाही? मी एकटाच तासनतास पुन्हा पुन्हा सगळ्यांना संपर्क तरी किती करु? सगळे का टाळताहेत? काय झाले आहे? कुठे आहेत आई-बाबा?

सचेतन

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 11/09/2011 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
आज साधारण १वर्षापूर्वी माझा मावस भाऊ (वय-२४) बाइक वरुन पडून अपघाती दिवंगत झाला.असे प्रसंग अनेकांवर येतात,हे प्रसंग विसरत तर नाहीतच,पण स्वतःच्या मनाची समजुत कशी घालावी हेही कळत नाही...त्यामुळे या कवितेला सत्याचा आधार आहेच,पण त्याही पेक्षा हे अश्या प्रकारचं कटु वास्तव स्वीकारावं कसं हा प्रश्न मला छळत होता ...तो सोडवायला मला जमला की नाही?मला कळत नाही.
काव्यरस

प्रेरणा

लेखक आळश्यांचा राजा यांनी शनिवार, 10/09/2011 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
“सर गेल्या वेळी आपल्या जिल्ह्यातून १९ आदिवासी तरुण आर्मीत भरती झाले होते. यावेळी किमान ८० जण तरी गेल्याशिवाय मला चैन पडणार नाही!” बारीक बाबू कलेक्टरांना म्हणत होते. बारीक बाबू, म्हणजेच टुकू बारीक, हे होते पीए आय टी डी ए अर्थात प्रोजेक्ट ऍडमिनिस्ट्रेटर ऑफ इंटिग्रेटेड ट्रायबल डेव्हलपमेंट एजन्सी. अतिशय सिन्सिअर आणि विश्वासार्ह अधिकारी. या नक्षलग्रस्त जिल्ह्यात अधिकाऱ्यांच्या बदल्या व्हायच्या, पण फक्त जिल्ह्यातून बाहेर. आत यायला कुणी तयारच नसायचं. कुणाची बदली झालीच तर कुठेना कुठे काहीतरी वशिलेबाजी करुन बदली रद्द व्हायचीच व्हायची.

चित्रकथेच्या स्वरूपात अण्णांचे भ्रष्टाचारविरोधी "बिल"

लेखक सुधीर काळे यांनी शनिवार, 10/09/2011 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
(१) २G, राष्ट्रकुल स्पर्धा वगैरेसाठी (२) पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसेन्स वगैरेसाठी (३)सरकारी कार्यालयांतील किरकोळ कामांसाठी

माहेरी जायची मला झाली आता घाई

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 10/09/2011 07:10 या दिवशी प्रकाशित केले.
माहेरी जायची मला झाली आता घाई
डायवर दादा रं डायवर दादा जोरात गाडी चालीव की रं माहेरी जायची मला झाली आता घाई रं गेले व्हते मी बाई मागल्या दिवाळीला पुरं व्हत आलं आता वरीस त्या सणाला आखाजी संपून आता दसरा आला की रं माहेरी जायची मला झाली आता घाई रं बा माझा कसा आसलं शेतात राबूनी थकला आसंल घाम कष्टाचं गाळूनी यिचारपुसं त्याची समक्ष करू दे की रं माहेरी जायची मला झाली आता घाई रं आयी माझी हाये जनू बाभळीचं लाकूड सौंसाराच्या आगीसाठी जळतीया भुरभुर कधी भेटती ती मला आसं मला झालं रं माहेरी जायची मला झाली आता घाई र

झट्पट आप्पे

लेखक नव-वधू यांनी शनिवार, 10/09/2011 06:20 या दिवशी प्रकाशित केले.
- २ वट्या मुगाची डाळ (सालीसकट or सालीशिवाय) दोन तास भिजत घाला. - दोन तासानन्तर डाळ साधारण दुप्पट होइल. - जास्तिचे पाणी काढुन हि डाळ, २ मिरच्या, २ लसुण पाकळ्या, १/२ इन्च आल, बारीक चिरलेलि कोथिम्बिर, चविनुसर मीठ आणि किन्चित हिन्ग घालुन mixer मधुन वाटुन घ्या. - हे मिश्रण जाड्सरच राहु द्या. - आता वरुन थोडे जीरे, बरिक चिरलेला कान्दा घालुन आप्पे-पात्रामधे आप्पे बनवा. मी हे Maggie Hot n Sweet Ketchup बरोबर serve केले.

(माझे लेख दान केले)

लेखक निनाद यांनी शनिवार, 10/09/2011 05:50 या दिवशी प्रकाशित केले.
गंगाधर मुटे यांची अस्तित्त्व दान केले ही सुंदर गझल पाहिली आणि आमच्या अस्तित्त्वाची आठवण झाली. मुटे साहेबांची क्षमा मागून... असणेच आज माझे, नसण्यासमान केले माझ्याच बायकोने माझे लेख दान केले मागेच विसरलेल्या एकाच आयडीने अकाऊंट आज माझे, डुआयमान केले हळवा नकोस होऊ, मित्र मला म्हणाले संतप्त बायकोनी, जरी उपटून कान नेले चंचूप्रवेश होता घरी हळुवार पावलांनी तो वास येता, बायकोनी त्रस्त दिनमान केले वाचाळ बायकोला वैतागलो पुरेसा सेक्रेटरीसह जाणारै, बुक विमान केले ठेचल्या शरिराला मी चाचपतो अजूनी सासर्‍याने हाडांना माझ्या चूर्णासमान केले भेटले त
काव्यरस

झटपट कलाकंद

लेखक सानिकास्वप्निल यांनी शनिवार, 10/09/2011 04:53 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १ कॅन कंडेन्सड मिल्क १ डबा रिकोटा चीज १ टीस्पून वेलचीपूड १ टीस्पून रोज वॉटर / इसेन्स (ऐच्छिक) सजावटीकरता पिस्ता-बदामाचे काप नोटः कंडेन्सड मिल्क व रिकोटा चीज चे प्रमाण एकास-एक (१:१) असावे. . पाकृ: एका मायक्रोवेव्ह सेफ बाऊल मध्ये कंडेन्सड मिल्क आणी रिकोटा चीज घेऊन चांगले एकत्र करणे.

एक 'वजनदार' धागा...

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 10/09/2011 01:16 या दिवशी प्रकाशित केले.
....... तसे या लेखाचे पूर्ण शीर्षक - "गॅलिलिओचा बाप, चित्रकला, संमोहनशास्त्र, संगीत, गवंडीकाम, होमियोपाथी, ज्योतिषविद्या, न्यूटन, ताजमहाल आणि (ब्रम्हचर्यव्रताचरणमुक्तेच्छुंसाठी उपयुक्त -) एक वजनदार धागा" असे आहे. ... गोंधळलात ? अहो,या सर्व गोष्टींमध्ये एक समान धागा आहे, तोही एक वजनदार धागा.